अपूर्वाने 'तुझं माझं जमतंय' मालिका या कारणामुळे सोडली, खुद्द तिनेच केला हा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 10:41 AM2021-02-19T10:41:28+5:302021-02-19T10:48:46+5:30

Apurva nemlekar revealed the reason behind leaving tujh maaz jamatanya serial : अपूर्वा नेमळेकर स्म़ॉल स्क्रीनवरील आघाडीची अभिनेत्री, रात्रीस खेळ चाले मधली शेवंता. या शेवंताने स्म़ॉल स्क्रीनवर जादू केली.

Apurva nemlekar leave the series tujh maaz jamatanya for this reason | अपूर्वाने 'तुझं माझं जमतंय' मालिका या कारणामुळे सोडली, खुद्द तिनेच केला हा खुलासा

अपूर्वाने 'तुझं माझं जमतंय' मालिका या कारणामुळे सोडली, खुद्द तिनेच केला हा खुलासा

googlenewsNext

अपूर्वा नेमळेकर स्म़ॉल स्क्रीनवरील आघाडीची अभिनेत्री, रात्रीस खेळ चाले मधली शेवंता. या शेवंताने स्म़ॉल स्क्रीनवर जादू केली. शेवंताची मादकता सगळ्यांनाच भावली. अण्णा नाईक तर तिच्या प्रेमातच पडले. ही मालिका बंद झाल्यानंतर अपूर्वा आता आणखी कुठल्या रुपात आपल्या दिसणार याची तिच्या फॅन्सला उत्सुकता होती. पण ही उत्सुकता फार न ताणता अपूर्वा लगेच तुझ माझं जमतंय या सिरीअलमधून पम्मीच्या रुपात आपल्याला दिसली. ही पम्मीदेखील स़्म़ॉल स्क्रीनवर हिट ठरली.आता ही मालिका सुरू होऊन काही महिनेच झाले असताना अचानक अपूर्वाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. सीएनएक्स फिल्मी टीमशी बोलताना अपूर्वा म्हणाली की, माझ्या पर्सनल रिझनमुळे ही मालिका मी सोडत आहे. एका ब्रेकची मला गरज होती त्यामुळे हा डिसिजन मला घ्यावा लागला.


तुझं माझं जमतंय या सिरीअलच शूटिंग नगरला व्हायचं. या सिरीअलला रामराम ठोकल्यानंतर  सध्या अपूर्वा मुंबईत आहे.काही दिवसांपूर्वीच तिने ही मालिका सोडली ही मालिका तिने का सोडली याची सेटवर वेगळीच चर्चा रंगतेय. अपूर्वाला सेटवर मनासारखी चांगली ट्रीटमेंट मिळत नसल्याचं बोललं जातंय...तसंच डिंसेंबरच्या शूटिंगच्या डेटवरून काही वाद झाला होता असं देखील बोललं जातंय.अपूर्वाने यासगळ्या वृत्ताचं खंडण केलंय.


आता अपूर्वाच्या जागी नवी पम्मी म्हणून प्रतीक्षा जाधवची वर्णी लागली आहे. देवमाणूस मधील मंजुळाच्या भूमिकेत याआधी प्रतीक्षा दिसली होती...तिची ही भूमिका खूपच गाजली होती.

Web Title: Apurva nemlekar leave the series tujh maaz jamatanya for this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.