तरीही सोशल मीडियावर माझ्या वजनाबद्दल प्रश्न विचारणारे आहेतच, अन्विता फलटणकरने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 11:49 AM2021-06-05T11:49:29+5:302021-06-05T11:53:52+5:30

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेमुळे स्वीटू म्हणजेच अन्विताची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. तिच्या चाहत्यावर्गातही वाढ होत आहे. तिच्याविषयी जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांनाही प्रचंड रस असतो.

Anvita Phaltankar Expresses Her Sadness Regarding Fans Commenting About Her Fat Look | तरीही सोशल मीडियावर माझ्या वजनाबद्दल प्रश्न विचारणारे आहेतच, अन्विता फलटणकरने व्यक्त केली खंत

तरीही सोशल मीडियावर माझ्या वजनाबद्दल प्रश्न विचारणारे आहेतच, अन्विता फलटणकरने व्यक्त केली खंत

googlenewsNext

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकर हिने तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अन्विता फलटणकर एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. मालिकेचा एकंदरीतच असलेला विषय आणि स्वीटूची व्यक्तिरेखा ही बऱ्याच मुलींसाठी खूप रिलेटेबल आहे. 

वजनदारपणा बद्दल आपलं मत व्यक्त करताना स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकर म्हणाली, "मालिकेचा विषय साधारण त्याबद्दल असला तरीही सोशल मीडियावर वजनाबद्दल बोलणारे, विचारणारे आहेतच. कधीकधी खूप उदास वाटत असल्यावर या गोष्टींचा कुठेतरी फरक पडतो. पण मी आधीपासून अशीच आहे. त्यामुळे मी या परिस्थितीला हाताळायला शिकले आहे. 

आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे 'मी सुंदर आहे का?' हा प्रश्न मला पडलेला आहे. पण माझ्या आयुष्यात काही माणसांनी मला खूपच सकारात्मकता दिली. मी सगळ्यांना हेच सांगेन की, तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुमचं असणं महत्त्वाचं आहे."

या मालिकेमुळे स्वीटू म्हणजेच अन्विताची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. तिच्या चाहत्यावर्गातही वाढ होत आहे. तिच्याविषयी जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांनाही प्रचंड रस आहे. रवी जाधवने दिग्दर्शित टाईमपास सिनेमात प्रथमेश परब, केतकी माटेगावकर, भाऊ कदम आणि वैभव मांगले यांच्या मुख्य भूमिका होत्या. सिनेमात केतकीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत अन्विता झळकली होती. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तसेच तिने गर्ल्स या सिनेमात देखील आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.  

सोशल मीडियावरही अन्विता प्रचंड सक्रिय असते. चाहत्यांसह ती संपर्कात असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यास विविध अंदाजातील फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो.रसिकही तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स देत पसंती देत असतात. अन्विता रिअल लाइफमध्ये मनमौजी आणि धम्माल मस्ती करणारी आहे.

Web Title: Anvita Phaltankar Expresses Her Sadness Regarding Fans Commenting About Her Fat Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.