अनिरुद्धच्या रिअल लाइफमधील ही आहे 'अरुंधती', अशी सुरू झाली होती लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 07:00 AM2021-09-14T07:00:00+5:302021-09-14T07:00:00+5:30

अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळीची खऱ्या आयुष्यातील पत्नी लाइमलाइटपासून दूर असते.

This is Aniruddha's real life 'Arundhati', the love story started | अनिरुद्धच्या रिअल लाइफमधील ही आहे 'अरुंधती', अशी सुरू झाली होती लव्हस्टोरी

अनिरुद्धच्या रिअल लाइफमधील ही आहे 'अरुंधती', अशी सुरू झाली होती लव्हस्टोरी

Next

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेमध्ये नवनवीन ट्विस्ट येताना पहायला मिळतात. या मालिकेत नुकतेच अनिरुद्धने संजनासोबत लग्न केल्याचे पहायला मिळाले. देशमुखांच्या समृद्धी बंगल्यात सध्या संजना आणि अरुंधती या दोघी राहताना दिसत आहेत. त्यामुळे मालिका एका नव्या वळणावर आलेली पहायला मिळते आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. या मालिकेतील सर्व कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक असतात. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळीने साकारली आहे. मिलिंद गवळीची पत्नी दीपा लाइमलाइटपासून दूर असते. मात्र त्यांची लव्हस्टोरी खूप हटके आहे.

मिलिंद गवळीने आपल्या पत्नीला सर्वप्रथम जळगाव रेल्वे स्टेशन वर पाहिले आणि पहिल्या नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. तेव्हा मिलिंदला ही मुलगी कोण आहे हेदेखील माहिती नव्हते. तिच्या विषयी संपूर्ण माहिती नव्हती. त्यामुळे ही गोष्ट जळगाव रेल्वे स्टेशनवर थांबली होती. परंतु, पुन्हा या दोघांची भेट एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभात झाली. त्यानंतर मिलिंदने हा विषय सोडला नाही. तिची सर्व माहिती काढली. नंतर तिचे नाव दीपा आहे असे कळले.


दीपाची माहिती मिळाल्यानंतर त्याने आपल्या कुटुंबियांना सांगितले. दीपा ही त्यांच्या नात्यातलीच आहे त्याला काही दिवसांनी समजले. मिलिंदच्या घरचे दीपाला मागणी घालण्यासाठी तिच्या घरी गेले. त्यावर दिपाच्या घरच्यांनी एक अट ठेवली होती. ती अट म्हणजे जावई सरकारी नोकरीवाला हवा होता.

मिलिंद दीपाच्या प्रेमात असल्यामुळे त्याने त्यांची अट मान्य केली. मिलिंद स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आणि त्यानंतर तो परीक्षाही पास झाला. सरकारी नोकरी लागल्यानंतरच या दोघांचे लग्न झाले. दीपा आणि मिलिंद यांना एक मुलगी आहे. तिचे लग्न झाले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: This is Aniruddha's real life 'Arundhati', the love story started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app