ameesha patel badly trolled memes viral bigg boss 13 malkin | Bigg Boss 13 : ओव्हरअ‍ॅक्टिंग की दुकान! युजर्स म्हणाले, हिला हाकला!!
Bigg Boss 13 : ओव्हरअ‍ॅक्टिंग की दुकान! युजर्स म्हणाले, हिला हाकला!!

ठळक मुद्दे सोशल मीडियावर अनेक युजरनी अमिषाला ट्रोल करत, मजेदार कमेंट केल्या आहेत.

बिग बॉस 13’ला अधिकाधिक इंटरेस्टिंग बनवण्याच्या नादात मेकर्सनी नव-नवे प्रयोग केलेत. यातलाच एक प्रयोग म्हणजे, बिग बॉसची मालकीण. होय, मेकर्सनी अभिनेत्री अमिषा पटेल हिला ‘बिग बॉस’च्या घराची मालकीण म्हणून इंट्रोड्यूस केले. पण उणापुरा आठवडा होत नाहीच तो अमिषाची ओव्हर अ‍ॅक्टिंग पाहून लोक कंटाळले. सुरुवातीच्या दोन दिवसांत अमिषाने ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांनी टास्क दिलेत. यादरम्यान स्पर्धकांनीही मस्ती केली. मात्र अमिषाचे वारंवार घरात येणे, प्रेक्षकांना रूचले नाही. हेच कारण आहे की, अनेकांनी अमिषाला ‘बिग बॉस’मधून हाकलण्याची मागणी केली आहे.
अमिषा ‘बिग बॉस’च्या घरात व्यत्यय आणते, असे काहींचे मत आहे तर काहींनी अमिषाची ओव्हरअ‍ॅक्टिंग कमालीची इरिटेटिंग असल्याचे म्हटले आहे.  सोशल मीडियावर अनेक युजरनी अमिषाला ट्रोल करत, मजेदार कमेंट केल्या आहेत.
‘बिग बॉस चाहते हैं की अमिषा पटेल ओव्हर अ‍ॅक्टिंग ना करे,’ असे एका युजरने लिहिले. तर अन्य एका युजरने ‘ओ स्त्री कल आना’ अशा मजेदार शब्दांत अमिषाला ट्रोल केले. अनेकदांनी मजेदार मीम्स शेअर केलेत.
‘कहो ना प्यार है’ सिनेमातून अमिषाने रूपेरी पडद्यावर  दणक्यात एंट्री घेतली होती. हृतिक रोशन आणि अमिषा या दोघांचाही हा पहिला सिनेमा होता. पदार्पणाच्या सिनेमातच दोघांनाही सुपरडुपर यश मिळाले आणि सिनेमा सुपरहिट ठरला होता. मात्र या सिनेमानंतर  अमिषाची जादू फिकी पडली आणि रातोरात मिळालेले अमिषाचे स्टारडम काहीसे कमी होवू लागले.  म्हणायला गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये  तिने चांगल्या भूमिका साकारल्या. तरीही तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. आता तर तिला काम मिळणेही बंद झाले आहे. 

 


Web Title: ameesha patel badly trolled memes viral bigg boss 13 malkin
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.