झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका अग्गंबाई सासूबाई मालिकेला सुरूवातीपासून प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला. या मालिकेतील सर्व पात्रांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारणारी प्रज्ञा कारखानीस या पात्राने देखील प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री संजीवनी साठे हिने. तिच्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला तिचे कौतूक वाटेल.

अभिनेत्री संजीवनी साठे मुळची पुण्याची असून कामानिमित्त ती मुंबईत राहते आहे. अग्गंबाई सासूबाई ही तिची पहिलीच मालिका आहे. परंतु तिने अनेक नाटकात काम केले आहे. सुरुवातीला नाटक, एकांकिका स्पर्धेत सहभागी होऊन तिने आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.

पहाता पहाता जमलं हे तिचे पहिले व्यावसायिक नाटक आहे. यासोबतच गुजराती भाषा आत्मसात करून तिने गुजराती रंगभूमीवरदेखील पदार्पण केले. कुहू छु संबळो छे, बलवंत अँड बबली, विरार फास्ट या गुजराती नाटकातही तिने काम केले आहे. परदेशात देखील या नाटकांना तुफान प्रतिसाद मिळाला होता.


आमचं जमलं बरं का, डोळे मिटून उघड उघड, सासूबाईचं असंच असतं या मराठी नाटकातही तिने काम केले आहे.

तसेच काही गुजराती मालिकेतही ती झळकली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aggabai Sasubai Fame Pradnya doing this thing before debut in serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.