झी मराठी वाहिनीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेनं अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील तेजश्री प्रधान, निवेदिता जोशी-सराफ व गिरीश ओक या कलाकारांनी साकारलेल्या पात्रांनी रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे.

गिरीश ओक यांनी या मालिकेत शेफ अभिजीत राजेची भूमिका साकारीत आहेत. त्यांच्या हॉटेलमध्ये मॅडी नामक एक पात्र दाखवण्यात आलं आहे. तिनेदेखील आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांवर चांगलीच भुरळ पाडली आहे. 


अग्गंबाई सासूबाई या मालिकेत मंदोदरी उर्फ मॅडीची भूमिका अभिनेत्री भक्ती रत्नपारखी निभावते आहे.

भक्ती रत्नपारखी हिने या अगोदर काही चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केले आहे. मात्र सध्या तिला ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत मॅडीच्या रूपात खूप लोकप्रियता मिळत आहे. या मालिकेत ती मॅडीच्या रूपात एक विनोदी व्यक्तिरेखा साकारत आहेत.

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत मॅडीच्या भूमिकेसाठी अगोदर वेगळ्या कलाकाराची वर्णी लागली होती. परंतु त्यानंतर भक्ती रत्नपारखी हिला या भूमिकेसाठी घेण्यात आले. तिने ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या शो मधून प्रेक्षकांना खळखळून हसवले.

भक्तीने अक्षय कुमार आणि परेश रावल ह्यांच्यासोबत ‘ओह माय गॉड’ ह्या चित्रपटात काम केलेले आहे. ह्यासोबतच तिने ‘सी कंपनी’, ‘देऊळ’ ह्यासारख्या लोकप्रिय चित्रपटांत काम केलेले आहे. 


भक्तीचा नवरा हा देखील अभिनेता आहे. त्याचे नाव आहे निखिल रत्नपारखी.

निखिलने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांत विनोदी भूमिका निभावल्या आहेत. निखिल रत्नपारखी ‘ओह माय गॉड’, ‘पहेली’, ‘जयंताभाई की लव्हस्टोरी’ यासारख्या हिंदी चित्रपटात काम केले आहे.

त्याचप्रमाणे त्यांनी ‘नारबाची वाडी’, ‘व्हेंटिलेटर’, ‘सुपरस्टार’ या मराठी चित्रपटात काम केलेले आहे. त्याचबरोबर त्याने मालिका आणि जाहिरातीत सुद्धा काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aggabai Saasubai serial fame Maddy aka Bhakti Ratnaparkhi is beautiful in real life, her husband also actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.