after 'Ratris Khel Chale 2' this another serial going to off air | 'रात्रीस खेळ चाले २'नंतर आणखी एक मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

'रात्रीस खेळ चाले २'नंतर आणखी एक मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चाले २ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता आणखीन एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पण त्या जागी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रात्रीस खेळ चाले 2 मालिकेनंतर आता कोणती मालिका निरोप घेणार आहे, हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहे. तर ही मालिका म्हणजे मिसेस मुख्यमंत्री. काही दिवसांपूर्वी मिसेस मुख्यमंत्री या मालिकेच्या नव्या भागांचे चित्रीकरण सुरु झाले होते. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे सुमी आणि समर पुढचे काही दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. १२ सप्टेंबर रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे.


मिसेस मुख्यमंत्री या मालिकेच्या जागी लाडाची मी लेक ग ही नवीन मालिका प्रेक्षकांना दिसणार आहे. ही मालिका १४ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकताच मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला असून, प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेत मिताली मयेकर आणि स्मिता तांबे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: after 'Ratris Khel Chale 2' this another serial going to off air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.