छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. दुसऱ्या सीझनमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रुपाली भोसलेचे पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जोडीदाराचा फोटो शेअर केला आहे.

रूपाली भोसले हिने इंस्टाग्रामवर जोडीदारासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, अप्रतिम भेट म्हणजे वेळ देणं, प्रेम व अटेंशन देणं. अंकित मगरे. मैं तेरी प्रिन्सेस हूँ.

रुपालीच्या जोडीदाराचे नाव अंकित मगरे असून तो एक बिझनेसमॅन आहे. त्यानेदेखील त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रुपालीसोबतचे फोटो पहायला मिळतात.

रुपालीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाले तर तिचे लग्न लंडनस्थित एका व्यक्तीसोबत झालेले होते. त्याचा अभिनयक्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. तो आयटी क्षेत्रात काम करणारा असून लग्नाच्या काहीच वर्षांनंतर रुपाली भारतात परतली.

रुपालीने बिग बॉसच्या घरात असताना सुरेखा यांच्याशी गप्पा मारताना रुपालीने सांगितले होते की, माझ्या आई वडिलांना सांभाळेल असाच जोडीदार मला हवा आहे. माझे आई-वडील ही माझी प्रायोरिटी आहे. माझ्या भावाने त्यांना सांभाळावे असे मला कधीच वाटत नाही. 


ती पुढे म्हणाली होती की, माझे लग्न झाल्यानंतर मी काही वर्षं लंडनला होते. पण माझ्यासाठी हा अनुभव अतिशय वाईट होता. मी सात वर्षं खूप काही सहन केले आहे. मी नेहमीच कुटुंब आणि घर सांभाळणारी आहे. पण तरीही मला माझ्या नात्यात सुख मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा कोणत्याही नात्यात पडताना मी अनेकवेळा विचार करेन. तसेच माझ्या जवळच्या अनेक मैत्रिणींची लग्न होऊन ती तुटलेली मी पाहिलेली आहेत. त्यामुळे मला लग्नाची भीती वाटते. मी पुन्हा कोणत्या नात्यात अडकेल का याविषयी मला देखील माहीत नाहीये.

Web Title: After the divorce Bigg Boss Fame actress fell in love again ?, see photo of her boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.