बिग बॉस १३चा किताब जिंकल्यानंतर सिद्धार्थ शुक्ला व त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सोशल मीडियावर सातत्याने सिद्धार्थचा ट्रॉफीसोबतचा फोटो पहायला मिळतो आहे. त्यानंतर आता सिद्धार्थचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. सिद्धार्थचा हा व्हिडिओ जिममधील आहे. या व्हिडिओत सिद्धार्थ जिममध्ये घाम गाळताना दिसतो आहे. सिद्धार्थच्या या व्हिडिओची सध्या खूप चर्चा होताना दिसते आहे. 


सिद्धार्थ या व्हिडिओत एक्सरसाईज करताना दिसतो आहे. सोबतच आपल्या चाहत्यांना एक मेसेजही देतो आहे. या व्हिडिओत तो आपल्या चाहत्यांना सांगतो आहे की, या विजयासाठी तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे.


या व्हिडिओत सिद्धार्थ आधीपेक्षा फिट दिसतो आहे. या शोच्या दरम्यान सलमान खानने कित्येकदा त्याला वजन घटवण्याबद्दल सांगितले होते. भाईजानचे म्हणणे सिद्धार्थने सीरियसली घेतल्याचे पहायला मिळतंय. 


या व्हिडिओशिवाय सिद्धार्थ आणखीन एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. नुकतेच ट्विटरवर इंडियाने आपला एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टनुसार बिग बॉस १३ डिजिटल माध्यमत खूप हिट ठरला आहे.


या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, बिग बॉस १२ साठी ४.१ कोटी ट्विट केले गेले होते. यावर्षी १ जानेवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत १०.५ कोटी ट्विट करण्यात आले आहे. यादरम्यान जास्त ट्विट सिद्धार्थसाठी करण्यात आले होते. 

Web Title: After Bigg Boss 13 Finale Sidharth Shukla Gym Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.