गायक आदित्य नारायणने त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर पत्नी सोबतचे  सुला वाइनयार्डचे फोटो शेअर केले आहेत. सुला वाइनयार्ड्स महाराष्ट्रातील नाशिकजवळ आहे. 

आदित्यने सुला  वाइनयार्डचा फोटो शेअर करताना लिहिले,  सुला वाइनयार्ड एक्सप्लोर करतो आहे माझी पार्टनर इन क्राईम श्वेता अग्रवालसोबत. आदित्यचा फोटो त्या फॅन्सना खूपच आवडला  आहे. फोटोत कपलमधले जबरदस्त बॉन्डिंग दिसते आहे.

याआधी आदित्य आपल्या पत्नी श्वेतासोबत हनीमूनसाठी गुलमर्गला गेला होता. आता तो दुसऱ्यांदा  सुला वाइनयार्ड गेला आहे. आदित्यने याआधीच सांगितले आहे की, तो तीनवेळा हनीमूनला जाणार आहे. आता शिलिम आदित्य कधी जाणार याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता असेल. 

आदित्य नारायणने गर्लफ्रेन्ड श्वेता अग्रवालसोबत १ डिसेंबरला मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्न केलं. यानंतर त्याने मुंबईतच रिसेप्शन पार्टी ठेवली होती. कोरोनामुळे लग्नात आणि रिसेप्शनला मोजकेच पाहुणे आले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. आदित्य आणि श्वेताची भेट १० वर्षांपूर्वी 'शापित' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. यानंतर दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aditya narayan and wife shweta agarwal second-honeymoon in sula vineyards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.