‘जस्सी जैसी कोई नही’ या मालिकेतून भरघोस प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री मोना सिंगने आपल्या भूमिकेने रसिकांचे मनोरंजन केले. या मालिकेमुळे लोकप्रिय टिव्ही अभिनेत्रींच्या यादीत मोना सिंग गणली जाते. मालिकेनंतर मोनाला सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. ‘थ्री इडियट्स’, ‘झेड प्लस’ आणि ‘उटपटांग’ या चित्रपटांमध्ये मोनाने काम केले आहे. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुकही झाले.  


इंडिया टिव्हीच्या रिपोर्टनुसार मोना सिंग लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मोना इन्वेस्टनेंट बँकरशी लग्न करणार आहे. यापेक्षा जास्त माहिती मिळू शकली नाही. रिपोर्टनुसार, मोनाने शोच्या मेकर्सना तिच्या शूटिंगच्या शेड्यूलमध्ये बदल करण्यास सांगितला आहे. 15 डिसेंबरच्या आसपास मोनाचे शूटिंग पूर्ण होणार आहे त्यानंतर ती मोठ्या सुट्टी घेऊन लग्न करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोना आमिर खान आणि करिना कपूरसोबत लाल सिंह चड्ढामध्ये देखील दिसण्याची शक्यता आहे.


सध्या मोना एकता कपूरची मालिता हमसफरच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या मालिकेत प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला आहे. मोनासोबत यात रोहित रॉय आणि गुरदीप कोहली मुख्य भूमिकेत आहे. मोना या मालिकेचे शूटिंग लवकरच संपवण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहे.


याआधी मोना ‘बँड ऑफ बॉइज’ फेम अभिनेता करण ओबेरॉयला डेट करत होती. करणशी ब्रेकअप झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालशीही तिचे नाव जोडले गेले होते.     

२०१३ मध्ये मोनाचा एक अश्लिल एमएमएस समोर आला होता. या एमएमएसमुळे तिच्यावर जोरदार टीकाही झाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ती नैराश्यामध्ये गेल्याच्या चर्चा सुरु होत्या. काही दिवसांमध्येच मोनाने हा व्हिडीओ फेक असल्याचा म्हटले होते. कुणाच्या तरी शरीरावर माझा फोटो चिटकवून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे तिने स्पष्टीकरण दिले होते.

Web Title: Actress Mona singh all set for wedding bells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.