Actress kishwar merchant flaunt a baby bump on social media | अभिनेत्री किश्वर मर्चंटने सोशल मीडियावर बेबी बम्पॅ केले फ्लॉन्ट, म्हणाली- हे इतके सोपे नाही

अभिनेत्री किश्वर मर्चंटने सोशल मीडियावर बेबी बम्पॅ केले फ्लॉन्ट, म्हणाली- हे इतके सोपे नाही

'बिग बॉस 9'मधील कपल किश्वर मर्चंट आणि सुयश राय हे लवकरच आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी त्यांनी गेल्या महिन्यात सोशल मीडियावर शेअर केली होती. किश्वरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बेबा बम्प फ्लॉन्ट करताना फोटो शेअर केला आहे.  ''हा सुंदर प्रवास अर्ध्यापेक्षा जास्त पूर्ण झाला.  विश्वास ठेवू शकत नाही पण ते इतके सोपे नव्हते. या अवस्थेत आपण कधीकधी खूप आनंदी, कधी भावनाप्रधान, कधी चिंताग्रस्त असतो. कधीकधी तुमचा मूड बदलतो जो मला वेडा करीत आहे. तरीही मला सुयाशबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळत आहे याचा मला आनंद आहे.'' 

पुढे ती लिहिते, मला नेहमीच प्रेग्नेंसीचा माझा वेळ वेगळा हवा होता. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे मी पती आणि कुटुंबासमवेत वेळ घालवू शकते. मला माझ्या आईवडिलांचे प्रेम मिळत आहे. याशिवाय मावशी माझ्या सर्व गोष्टींची काळजी घेतात. माझे सासरे व्हिडिओ कॉलद्वारे माझ्याशी जोडलेले आहेत. माझे मित्र जे माझ्याबरोबर नाहीत परंतु नेहमीच माझ्याशी बोलतात. 'अशी नोट किश्वरने या फोटोसोबत लिहिली आहे.  किश्वरच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटी कमेंट करतायेत. 

कहां हम कहां तुम अभिनेत्री किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांचे 2016 मध्ये लग्न झाले.सुयश आणि किश्वर 2016 मध्ये लग्न बंधनात अडकले. २०११ मध्ये 'प्यार की ये एक कहानी' शोच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. हळूहळू मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. सहा वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न केलं. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress kishwar merchant flaunt a baby bump on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.