ग्लॅमर इंडस्ट्रीत आजही तुमच्या दिसण्याला जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे अभिनयाबरोबर सुंदर दिसणेही तितकेच महत्त्वाचे. त्यामुळे ग्लॅमर इंडस्ट्रीत एंट्री करण्यापूर्वीच अनेकजण मेकओव्हर करताना दिसतात. टीव्ही अभिनेत्री कांची सिंहनेही मेकओव्हर करत ग्लॅमरस लुक मिळवला आहे. तिचे जुने फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायर झाले आहे. यांत तिचा अगदी साधारण लूक पाहायला मिळत आहे. 

तिचा हा फोटो पाहून ती हिच कांची सिंह का जिला आपण टीव्हीवर अगदी ग्लॅमरस अंदाजात पाहातो? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. तसेच कांची सिंहने मेकओव्हरवर खूप मेहनत घेतल्याचे तिचे जुने फोटो पाहून त्याचा अंदाजा येईलच. सोशल मीडियावर नजर टाकताच तुम्हाला कांची सिंहच्या नवीन अंदाजातले फोटो पाहून तिच्यावर फिदा नाही झाले तरच नवल. आता ती आधीपेक्षा खूप सुंदर दिसत असल्यामुळे तिच्या प्रत्येक फोटोंवर तिचे चाहते घायाळ होत असल्याचे पाहायला मिळते. 


'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत कांची झळकली होती. ही मालिका सोडल्यानंतर आता तिला मुख्य भूमिका असलेल्याच मालिकेत काम करायचे असल्याचे तिने म्हटले होते. एकाच पद्धतीचे काम करण्यापेक्षा वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्यात रस असून जो पर्यंत आपण त्याच गोष्टी करत राहणार तो पर्यंत दुस-या संधी मिळणार नाही. त्यामुळे तिने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेला राम राम ठोकला. 


कांची आणि टीव्ही कलाकार रोहन मेहरा यांच्या अफेरअचीही चर्चा रंगत असते. रोहन मेहराही 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत झळकला होता. याच मालिकेच्या सेटवर या दोघांची लव्हस्टोरी रंगत असल्याचे बोलले जायचे. मालिकेतू दोघांनी एक्झिट घेतली मात्र त्यानंतर त्या दोघांचे नाते अजून बहरले असल्याचे बोलले जाते. दोघांच्याही बिझी शेड्युअलमधून वेळ काढत हे दोघे एकमेकांना भेटत असतात. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress Kanchi SIngh who has changed so much in the last 10 years will be surprised to see her previous look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.