Actor Swapnil Joshi likes Nitish Bhardwaj's Shri krishna character | 'एक नंबर'... स्वप्नील जोशीला स्वतःच्या भूमिकेपेक्षा आवडतो नितीश भारद्वाज यांचा 'श्रीकृष्ण'

'एक नंबर'... स्वप्नील जोशीला स्वतःच्या भूमिकेपेक्षा आवडतो नितीश भारद्वाज यांचा 'श्रीकृष्ण'

कोरोना काळातही श्रीकृष्ण जन्माष्टमी घरोघरी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अशात सर्वांच्या लाडक्या श्रीकृष्णावर आधारित मालिकांची आठवण झाली नाही तर नवल. श्रीकृष्णावर आधारित वेगवेगळ्या मालिका गेल्या काही वर्षात गाजल्या. तर श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे कलाकारही नेहमीसाठी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या भूमिका अनेक कलाकारांनी मालिकांमध्ये आणि सिनेमात साकारल्या आहेत. काहींना बाल श्रीकृष्ण लक्षात आहे तर काहींना तरूण. अनेक कलाकार तर त्यांनी अनेक वेगवेगळी कामे केली असली तरी श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळेच नेहमीसाठी लक्षात आहेत. 

सध्या जन्माष्टमीचा जल्लोष आहे. अशात लोकमतच्या ट्विटर पेजवर आम्ही प्रेक्षकांना त्यांना सर्वात जास्त भावलेला श्रीकृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता कोणता? असा प्रश्न केला होता. प्रेक्षकांनी त्यांना आवडलेली भूमिका तर सांगितलीच. पण यात स्वत: श्रीकृष्णाची भूमिका साकारणाऱ्या स्वप्नील जोशीने त्याला श्रीकृष्णाची भूमिका साकारलेला आवडता कलाकार कोण याचं उत्तर दिलं आहे. 

प्रेक्षकांना आम्ही चार पर्यात दिले होते. ज्यात नितीश भारद्वाज स्वप्नील जोशी, सौरभ राज जैन आणि सुमेध मुडगळकर यांनी साकारलेल्या भूमिकांचा समावेश केला. प्रेक्षकांच्या या पोस्टवर भरभरून कमेंटही येत आहेत. पण यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं अभिनेता स्वप्नील जोशी याच्या कमेंटने. स्वप्नीलने लोकमतची ही पोस्ट रिट्विट करून नंबर १ अशी कमेंट केली आहे. म्हणजे त्याने हे सांगितले की, त्याला नितीश भारद्वाज यांनी 'महाभारत' मालिकेत साकारलेला श्रीकृष्ण अधिक भावला.

स्वप्नील जोशीने साकारलेली श्रीकृष्णाची भूमिका चांगलीच गाजली होती. आजही त्याची ती भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. तरी सुद्धा त्याला नितीश भारद्वाज यांनी साकारलेली भूमिका आवडते ही खास बाब आहे. त्याहून खास बाब ही आहे की, ते जाहीरपणे तसं मान्य करतात. काही असो दोघांनी साकारलेल्या श्रीकृष्णाच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत हे महत्वाचं.

हे पण वाचा :

श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे सर्वदमन बॅनर्जी आता कसे दिसतात-काय करतात?

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actor Swapnil Joshi likes Nitish Bhardwaj's Shri krishna character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.