Actor kunal singh to be seen in ekta kapoor tv serial naagin 4 with nia sharma | 'नागिन 4'मध्ये या अभिनेत्याची होणार दमदार एंट्री!
'नागिन 4'मध्ये या अभिनेत्याची होणार दमदार एंट्री!

 नागिन ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या सिझनला देखील प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आता या मालिकेचा चौथा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टिव्हीवरील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री निया शर्मा नागिनच्या भूमिकेत दिसणार आहे.निया सोबत या मालिकेत जसमीन भसीनदेखील दिसणार आहे.

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार मालिकेत कुणाल सिंगची देखील एंट्री झाली आहे. नागिन4 मध्ये तो एक दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे. याआधी कुणाल साथ निभाना साथियामध्ये दिसला होता. यात त्याने श्रवणची भूमिका साकारली होती. मालिकेत निया शर्मा, जसमीन भसीन बृंदा आणि नयनतारा दिसणार आहेत.  रिपोर्टनुसार बेला आणि माहिरा मुलींच्या भूमिकेत दिसणार आहे.

सध्या या मालिकेचे शूटिंग जैसलमेर, राजस्थानमध्ये सुरु आहे. नागिन मालिकाची सीरिज छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. नागिनच्या प्रत्येक सीझनला पहिल्यापेक्षा अधिक प्रेम मिळताना आता पर्यंत पाहण्यात आले आहे.  

Web Title: Actor kunal singh to be seen in ekta kapoor tv serial naagin 4 with nia sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.