Actor Gaurav Chopra's mountain of grief collapses, parents' umbrella lost in ten days | अभिनेता गौरव चोप्रावर कोसळला दुःखाचा डोंगर, दहा दिवसांत हरपले आई-वडिलांचे छत्र

अभिनेता गौरव चोप्रावर कोसळला दुःखाचा डोंगर, दहा दिवसांत हरपले आई-वडिलांचे छत्र

छोट्या पडद्यावरील अभिनेता गौरव चोप्रावर दुःखाचे डोंगर कोसळला आहे. दहा दिवसांमध्ये त्याने आई वडिलांचे छत्र हरपले आहे. १९ ऑगस्ट रोजी त्याच्या आईने या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर लगेच १० दिवसांमध्ये म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी त्याच्या वडिलांचे निधन झाले. आई-वडिलांच्या निधनामुळे गौरवला खूप मोठा धक्का बसला आहे. ही माहीती खुद्द गौरवनेच सोशल मीडियाच्या माध्यमावर दिली आहे.

गौरव चोप्राने इंस्टाग्रामवर वडिलांचा फोटो पोस्ट करत लिहिले आहे, 'श्री स्वातंत्र चोप्रा.. माझे हिरो, माझे आयडॉल, माझी प्रेरणा... मला ही गोष्ट समजण्यास २५ वर्षांचा काळ लागला. सर्व वडील तुमच्यासारखे नसतात. ते माझ्यासाठी स्पेशल होते. त्यांचा मुलगा असणे माझ्यासाठी एक वरदान आहे.'


पुढे म्हणाला, '१९ ऑगस्ट रोजी आईने जगाचा निरोप घेतला तर २९ ऑगस्ट रोजी वडिलांचे निधन झाले. आता मला एकटे असल्यासारखे वाटत आहे. माझे हे एकटेपण दुसरे कोणीही भरून काढू शकत नाही.'


याशिवाय आईच्या निधनाची बातमी देखील त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. गेल्या तीन वर्षांपासून त्याची आई कर्करोगाशी झुंज देत होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actor Gaurav Chopra's mountain of grief collapses, parents' umbrella lost in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.