Actor Gaurav Chopra fell on the mountain of grief, expressed grief on social media | अभिनेता गौरव चोप्रावर कोसळला दुःखाचा डोंगर, सोशल मीडियावर व्यक्त केलं दुःख

अभिनेता गौरव चोप्रावर कोसळला दुःखाचा डोंगर, सोशल मीडियावर व्यक्त केलं दुःख

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता गौरव चोप्रा याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आईचे कर्करोगामुळे नुकतेच निधन झाले आहे. त्याने सोशल मीडियावर ही माहिती देत आईच्या जाण्याचे दुःख व्यक्त केले आहे.

अभिनेता गौरव चौप्रा याच्या आईचे निधन कर्करोगामुळे झाले आहे. मागील तीन वर्षांपासून त्या कर्करोगाशी सामना करत होत्या. गौरवने सोशल मीडिया पोस्ट लिहित आपल्या आईच्या कणखर वृत्तीचे दर्शन सर्वांना घडवून दिले आहे. 

त्याने आईचे काही फोटो शेअर करत लिहिले की, माझी आई खूप कणखर व्यक्ती होती. पहिला फोटो वर्षभरापूर्वीचा आहे. तीन वर्षे कर्करोगाशी लढताना कधीही न थांबणाऱ्या किमोच्या तीन वर्षेदेखील आमचा आत्मविश्वास वाढवत राहिली. असे सौंदर्य ज्याला कोणत्याही बनावटीची गरज नव्हती. ती खूप वेगळी दिसायची, सगळ्यांची प्रिय व्यक्ती. कोणत्यातरी चाहत्याप्रमाणे तिला पाहून हसत रहायचो.

गौरवच्या या पोस्टवर चाहते सहानुभूतीसह त्याला धीर देताना दिसत आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actor Gaurav Chopra fell on the mountain of grief, expressed grief on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.