Actor advait dadarkar will play the role of Soham in aggambai sunbai | अग्गंबाई सूनबाईमध्ये सोहमची भूमिका साकारणार 'हा' प्रसिद्ध अभिनेता, नाव वाचून व्हाल अवाक्

अग्गंबाई सूनबाईमध्ये सोहमची भूमिका साकारणार 'हा' प्रसिद्ध अभिनेता, नाव वाचून व्हाल अवाक्

अग्गंबाई सासूबाई या मालिकेचा पुढचा भाग म्हणजेच अग्गंबाई सुनबाई लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अग्गंबाई सासूबाई या मालिकेतील बबड्या, शुभ्रा, आसावरी, अभिजीत, आजोबा या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडतात. या मालिकेची कथा देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडते. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून प्रेक्षकांना त्याऐवजी या मालिकेचा दुसरा सिझन पाहायला मिळणार आहे.  या मालिकेत तेजश्री प्रधाननं साकारलेली शुभ्राची भूमिका आता अभिनेत्री उमा पेंढारकर साकारणारये.. शुभ्राचं पात्र नव्या अभिनेत्रींला देण्यात आल्यानंतर सोहम देखील मालिकेतून एक्झिट घेणार का असा श्न सगळ्यांनाच पडलाय. 

त्यामुळे नवा सोहम कोण असणार यावरुन अनेक तर्क वितर्क लावले जातायेत..मालिकेचा पहिलाचं प्रोमो समोर येताच नव्या शुभ्राला पहिल्यानंतर प्रेक्षकांना सोहमला पाहण्याची ही तितकीच उत्सुकता लागलीयं. अभिनेता आशुतोष पत्कीनं बबड्याची भूमिका घराघरात पोहोचवली. प्रेक्षकांनी बबड्याला कित्येकदा शिव्या घातल्या. तर अनेकांनी त्याचा राग राग केला. पण आता बबड्याचं पात्र आशुतोष ऐवजी अभिनेता अद्वैत दादरकर साकारणार आहे. आता आशुतोषची जागा अद्वैतनं घेतली असून लवकरच मालिकेच्या शुटींग सुरुवात होणारये. अद्वैतने मालिकांसोबतच अनेक मराठी नाटकांमध्ये देखील काम केले आहे.माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत त्यानं सौमित्रची भूमिका केली.

अभिनेता आशुतोष पत्की आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान या दोघांनीही मालिकेतून एक्झिट घेतलीयं..त्यामुळे आता नव्या मालिकेत नवा सोहम आणि नवी शुभ्रा तुमच्या भेटीला येणारेय.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actor advait dadarkar will play the role of Soham in aggambai sunbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.