अभिजीत खांडकेकरने आरजे म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो अभिनयक्षेत्राकडे वळला. माझ्या प्रियाला प्रीत कळेना ही त्याची पहिलीच मालिका प्रचंड गाजली. या मालिकेनंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर हे मराठी इंडस्ट्रीमधील क्युट कपलपैकी एक आहेत. अभिजीत आणि सुखदा एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात आणि त्यांच्या फोटोना चाहत्यांनी पसंतीदेखील मिळते. अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नी आणि अभिनेत्री सुखदासोबतचा ट्रेडिशनल लूकमधले फोटो शेअर केला आहेत. फोटोमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. अभिजीत आणि सुखदाचा रोमाँटिक अंदाजातील फोटो पाहून त्याचे फन्सही फिदा झालेत. फोटोवर त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

अभिजीतचा नाटकातील आणि सुखदाच्या डान्समधील एका कॉमन फ्रेंडमुळे दोघांची एकमेकांशी ओळख होती. मात्र दोघं कधीही एकमेकांशी बोलले नव्हते. त्याच काळात अभिजीतची माझिया प्रियाला प्रीत कळेना ही मालिका लोकप्रिय ठरली होती.  ही मालिका पाहून सुखदाने फेसबुकवर अभिजीतचं कौतुक केले होते. यानंतर अभिजीत आणि सुखदा यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं. फेसबुकवरील या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं.


छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा', 'ध्यानीमनी', 'भय', 'ढोलताशे' या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्यात.'क्रिमिनल्स... चाहूल गुन्हेगारांची' ही मराठी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे सूत्रसंचालन अभिजीत करणार आहे. दुसरीकडे सुखदा देशपांडे-खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. 'धरा की कहानी' या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actor Abhijeet Khandkekar shared a photo with his wife sukhada khandkekar in a traditional look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.