Abir surti got emtional whe he read fans letter | अबीर सूफी भारावून गेला चाहतीचे पत्र वाचून
अबीर सूफी भारावून गेला चाहतीचे पत्र वाचून

ठळक मुद्देसाई बाबांची भूमिका साकारणारा अबीर सूफी ही पडद्यावर जिवंत केली आहेसाईंच्या भूमिकेबद्दल अबीरला अपार लोकप्रियता मिळाली

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई या  मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. साई बाबांची भूमिका साकारणारा अबीर सूफी ही पडद्यावर जिवंत केली आहे. साईंच्या भूमिकेबद्दल अबीरला अपार लोकप्रियता मिळाली आहे आणि चाहत्यांची असंख्य पत्रे, सोशल मीडियावरून संदेश मिळत असतात. 

संदेशांच्या माध्यमातून अबीरला त्याचे चाहते त्यांचे प्रेम आणि अभिप्राय पाठवत असतात. असाच एक संदेश असा होता, ज्याने अबीरचे लक्ष वेधून घेतले.  त्या चाहतीने लिहिले होते की, तिचा साईंवर विश्वास नव्हता पण तिच्या आईमुळे आता ती नियमितपणे मेरे साई मालिका पाहते आणि तिला या मालिकेतील अबीर सूफीने साकारलेले साई खूप आवडते. या मालिकेच्या तिच्या दैनंदिन जीवनावर इतका प्रभाव पडला आहे, की, ती साईंच्या शिकवणीचे जाणीवपूर्वक अनुकरण करू लागली आहे. पण, याच्यानंतर तिने जे लिहिले होते, ते फारच गोड आणि अबीरला भारावून टाकणारे होते. ही चाहती 8 महिन्यांची गरोदर असून तिचे असे म्हणणे आहे की, जेव्हा जेव्हा ही मालिका प्रसारित होत असते, तेव्हा तिचे बाळ पोटात हालचाल करू लागते. 

या  संदेशाबद्दल बोलताना अबीर म्हणाला, “मला माझ्या चाहत्यांकडून आहे छान छान संदेश नेहमीच येत असतात आणि मी अभिमानाने सांगू शकतो की मला येणार्‍या संदेशांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. पण विशेषतः हा संदेश खरोखर आजवर मिळालेला सर्वात गोड आणि आगळा वेगळा संदेश आहे, ज्यात माझ्या एका चाहतीने हे सांगितले की, जेव्हा ही मालिका प्रसारित होते, किंवा साईंच्या रूपातील माझा आवाज कानावर पडतो, तेव्हा तिचे पोटातील बाळ आतून लाथा मारू लागते. हा निःसंशयपणे साई बाबांचा आशीर्वाद आहे, ज्यातून हे प्रतीत होते की, साई सर्वांचीच काळजी घेत आहेत, मग ती कुणी जिवंत व्यक्ती असो किंवा जन्माला येऊ घातलेले पोटातील बाळ असो.”


Web Title: Abir surti got emtional whe he read fans letter
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.