ठळक मुद्देमाझे पती आणि बिग बॉस मराठी या घरातील सदस्य यांची पार्श्वभूमी खूपच वेगळी आहे. त्यामुळे इतर सेलिब्रेटींना त्यांना समजून घेणे कठीण जात आहेत. सगळे मिळून त्यांना लक्ष्य करत आहेत. या सगळ्यात ते एकटे पडले आहेत.

अनेक लोक एकत्र आले की भांड्याला भांडं लागणारच, शब्दाला शब्द लागणारच आणि गैरसमज होणारच... त्यात बिग बॉसचे घर म्हटले की हे स्वाभाविकच आहे. कारण वेगवेगळ्या क्षेत्रातील १५ कलाकार एकत्र आले म्हणजे एकमेकांचा स्वभाव समजणे, त्यांच्या सवयी समजून घ्यायला वेळ लागतोच. मराठी टेलिव्हिजनवरील दोन लोकप्रिय अभिनेत्री राधा म्हणजेच वीणा जगताप आणि शिवानी सुर्वे यांचे घरामध्ये तसे चांगले जमत होते. पण आता या दोघींमध्ये वाद होताना दिसत आहेत. आणि हा वाद देखील अभिजीत बिचुकले वरून.

“मला नको सांगूस कसं बोलायचं” असं शिवानीच म्हणणे आहे तर वीणाचा मुद्दा आहे किचनमध्ये आरडाओरडा नको. बिग बॉस मराठी सीझन २ सुरू झाल्यापासून अभिजीत बिचुकले हे नाव चर्चेत आहे. साताऱ्याच्या राजकारणात बिचुकले हे नाव चांगलेच प्रसिद्ध आहे. पण बिचुकलेला टार्गेट केले जात असल्याचे त्याच्या पत्नीचे म्हणणे आहे.

अभिजीत बिचुकलेची पत्नी अलंकृता बिचकुलेने टाईम्स ऑफ इंडिया ऑनलाईनशी बोलताना तिची ही खंत मांडली आहे. तिने म्हटले आहे की, माझे पती आणि बिग बॉस मराठी या घरातील सदस्य यांची पार्श्वभूमी खूपच वेगळी आहे. त्यामुळे इतर सेलिब्रेटींना त्यांना समजून घेणे कठीण जात आहेत. मी बिग बॉस मराठी हा कार्यक्रम न चुकता पाहते. तो पाहाताना मला वाटत आहे की, सगळे मिळून त्यांना लक्ष्य करत आहेत. या सगळ्यात ते एकटे पडले आहेत. माझे पती हे प्रचंड हुशार आहेत. पण येथील सेलिब्रेटींना त्याची जाणच नाहीये. त्यांनी अजून माझ्या पतींना चांगल्याप्रकारे ओळखलंच नाहीये असे मला वाटते. 

बिग बॉसमध्ये तर आता ग्रुप पडायला देखील सुरुवात झाली आहे. KVR हा पहिला ग्रुप तयार झाला असून या ग्रुपमध्ये किशोरी शहाणे, वीणा जगताप आणि रुपाली भोसले आहेत. या तिघींनी आता तर गप्पा मारण्यासाठी एक जागा देखील ठरवून ठेवली आहे आणि त्याचे “KVR कट्टा” असे नाव देखील ठेवले आहे. या ग्रुप मध्ये अजून कोणाचा समावेश होईल? या तिघींचा ग्रुप शेवटपर्यंत टिकून राहील? हे बघणे रंजक असणार आहे. 

Web Title: Abhijeet Bichukale’s wife Alankruta said My husband is getting targeted in Bigg Boss Marathi 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.