कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात. सुंदर दिसणं आणि उत्तम आरोग्य असणं कोणाला बरं नाही आवडणार..... या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात आरोग्य उत्तम राखणं सगळ्यात कठीण काम. त्यासाठीच टीव्ही अभिनेत्री आशका गोराडियाने योगा करण्याचा पर्याय निवडत स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते. इतकेच काय तर ती योगामध्येही वेगवेगळे एक्सप्रिमेंट करत असते. न्यूड इज नॉर्मल असा हॅशटॅग लिहून त्याचं समर्थनही ती करताना दिसली होती.  ती  फिटनेस फ्रिक आहे हे जगजाहीर आहे. 

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आशका गोराडिया नेहमी सोशल मीडियावर तिचा नवरा ब्रेंट गोबलसोबत योगा करतानाचे फोटो पहायला मिळते. मात्र आता तिचा एक फोटो व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला फोटो पाहून चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रीया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. आशकाच्या या फोटोनेही सा-यांचे लक्ष वेधले आहे.काहींना तिचा हा बोल्ड अंदाज कमालीचा आवडला असून काहीच तासांत या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत.

समोर आलेल्या फोटोमध्ये  ती नवरा ब्रेंट गोबलसोबत योगा करताना दिसतेय. आशकाने आपल्या इंस्टाग्रामवर योगा करतानाचा एक व्हिडिओ शेअर करत असते.आशकाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हॉट व सेक्सी योगा मूव्समधील फोटो पहायला मिळतील. आशका आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही.

 

आशकाच्या फिट राहण्यामध्ये योगविद्येचे मोलाचे योगदान असल्याचे ती सांगते.तिच्या या फोटोंमुळे तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. लाईक्स आणि कमेंट्सचा ओघ तर आजही तिच्या फोटोंवर सुरु असतो.


मध्यंतरी आशका गोराडिया आणि पती ब्रेंट गोबले एका बीचवर रोमान्स करताना दिसले. बीचवर ब्रेंट आशकाला उचलतो आणि एक स्टंट करतो. यानंतर दोघे लिपलॉक करतानाही व्हिडिओत दिसत आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओच्या बॅकग्राऊंटला एक रोमॅन्टिक गाणं प्ले होत आहे. या व्हिडिओनेही सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता.

आशकाने 2016 मध्ये ब्रेंटला डेट करणे सुरु केले होते आणि याचवर्षी दोघांनी साखरपुडा केला होता. दोघांनी 4 डिसेंबर 2017 ला लग्न केले होते.
आशकाने 'कुसुम' , 'क्योंकि सास भी कभी बहू थी' , 'कहीं तो होगा' , 'विरुद्ध' , 'मेरे अपने' , 'सात फेरे' , 'लागी तुझसे लगन' अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aashka Goradia is famous for Nude yoga, Again Caught Attention new pic with husband Brent Goble; fans go Aww-dorable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.