सुंदर आणि फीट दिसणं यासाठी आशका गोराडीया खूप मेहनत घेते . ती दिवसाची सुरुवात योगा ने करते . स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दिवसातून 108 वेळा सूर्य नमस्कार करते. ती नियमितपणे आष्ठांग योगही करते. तिचे योगाचे काही फोटोज इटनेरनेटवर भरपूर वायरल झाले होते. 'कुसुम', 'बालवीर' आणि 'डायन' यासारख्या मालिकांनंतर आशका गोराडिया सध्या तिच्या आयुष्याती  निवांत क्षण एन्जॉय करत आहे.

 

ती सध्या कोणत्याच मालिकेत झळकत नसली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिच्या विविध अंदाजातील फोटो पाहयला मिळतील. तिचा प्रत्येक अंदाज तिच्या चाहत्यांना आवडतो. तिच्या या फोटोंना भरघोस लाईक्स आणि कमेंटस चाहते करत असतात.

 

विशेषत:अलीकडेच समुद्रकिनार्‍यावर योगा करतानाची तिचे फोटो व्हायरल झाली होते.ज्यामध्ये ती आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसली होती. सध्या तिच्या बोल्ड लूकनेच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही महिन्यांआधी आशकाने टॉपलेस होत योगा करताना दिसली होती.


आशकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये समुद्राच्या लाटांसह  खेळताना दिसत आहे.या फोटोसह यावेळी फोटोग्राफरचेही सोशल मीडियावर विशेष कौतुक होत आहे. दुसर्‍या फोटोत आशकाने हिरव्या रंगाची फ्लोरल बिकिनी परिधान केली असून योगा करत आहे.

वर्षाच्या सुरूवातीस टीव्ही अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही तिची वाहवा करत आहेत.आशका गोराडियाने 2017 मध्ये अमेरिकन व्यावसायिक ब्रेंट गोबलशी लग्न केले आहे. हे लग्न ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही परंपरेनुसार पार पडले होते. आशका आज सुखी वैवाहिक जीवन जगत आहे.


काही महिन्यांपूर्वी या कपलचा अंडरवॉटर व्हिडीओ समोर आला होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आशका आणि ब्रेंट रोमँटिक पोजमध्ये एकमेकांच्या जवळ आल्याचे पाहायला मिळत आहे. समुद्रात दोघेही स्लो मोशनमध्ये लिपलॉक करताना दिसतायेत. या व्हिडीओला तिने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे. "Let the kiss always be a #slowmotion moment... let it be a #kiss forever... Can’t help falling in love with you". 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aashka Goradia Appeared In A Green Floral bikini Playing With Waves And Doing Yoga On Beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.