'आई कुठे काय करते' मालिकेसाठी सगळ्यात जास्त मानधन अरुंधतीला मिळते, वाचा इतरांची फि किती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 09:00 AM2021-09-16T09:00:00+5:302021-09-16T09:00:00+5:30

'आई कुठे काय करते' मालिका सुरुवातीपासून रसिकांची आवडती बनली होती. ही मालिका टीआरपी शर्यतीतही अव्वल क्रमांकावर असते. मालिका अतिशय मनोरंजक झाली आहे.

Aai Kuthe Kay Krte Serial Madhurani Prabhulkar aka Arundhati gets highest fees compared to other, check others details here | 'आई कुठे काय करते' मालिकेसाठी सगळ्यात जास्त मानधन अरुंधतीला मिळते, वाचा इतरांची फि किती

'आई कुठे काय करते' मालिकेसाठी सगळ्यात जास्त मानधन अरुंधतीला मिळते, वाचा इतरांची फि किती

Next

सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये चांगली कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणाऱ्या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. अशीच काहीशी बाब समोर आली आहे.'आई कुठे काय करते' मालिकेतल्या कलाकारांविषयी.मानधनाच्या बाबतीत मराठी कलाकारांचे मानधनही इतर कलाकारांपेक्षा कमी नाहीय.

'आई कुठे काय करते' मालिका सुरुवातीपासून रसिकांची आवडती बनली होती. ही मालिका टीआरपी शर्यतीतही अव्वल क्रमांकावर असते. मालिका अतिशय मनोरंजक झाली आहे. दिवसेंदिवस येणाऱ्या रंजक वळणामुळे रसिकही मालिकेला खिळून आहेत. मालिकेतील कलाकारही रसिकांचे तितकेच आवडीचे बनले आहेत. त्यांची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत जात आहे. मालिकेत कलाकार घराघरात पोहचले आहेत.

'आई कुठे काय करते' मालिकेमुळे प्रत्येकाला नवी ओळख मिळाली. त्यांच्या खासगी आयुष्याविषयीही प्रचंड चर्चा रंगत असतात. मालिकेतले कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असतात. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करताना दिसतात. त्यांच्या रिल आणि रिअल लाईफविषयी जाणून घेण्यातही चाहते उत्सुक असतात. मालिकेच्या पुढच्या भागात काय घडणार अशा प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यात रसिकांची उत्सुकता असते. 

अनिरुद्ध आणि अरुंधती अतिशय लोकप्रिय असले तरी इतरांच्याही भूमिका रसिकांचे भरघोस मनोरंजन करतात आणि रसिकही त्यांच्यावर तितकेच प्रेम करतात. संजना ही भूमिकाही लक्षवेधून घेण्यात यशस्वी ठरली आहे. मालिकेत काम करण्यासाठी कलाकारांचे मानधनाविषयी अनेकदा चर्चा रंगतात.प्रत्येक कलाकाराला त्यांच्या क्षमतेनुसार मानधन मिळत आहे. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या क्षमता आणि योग्यतेनुसार मानधन दिलं जातं.

 

जितकी कलाकाराची लोकप्रियता अधिक तितके तगडे मानधन कालाकार आकारतात. सोशल मीडियावरील चर्चेनुसार अरुंधती भूमिका साकारणारी मधुराणी  प्रभुलकरला या मालिकेसाठी प्रत्येक एपिसोड २५ हजार रुपये इतके मानधन मिळते. तर अनिरुद्ध म्हणजे मिलिंद गवळीलाही प्रत्येक भागासाठी  २० हजार इतके मानधन मिळते. तर संजना भूमिका साकारणारी रुपाली भोसलेला १७ हजार रुपये इतके मानधन मिळते.
 

Web Title: Aai Kuthe Kay Krte Serial Madhurani Prabhulkar aka Arundhati gets highest fees compared to other, check others details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app