Aai Kuthe Kay Karte: 'अनिरूद्धची ती सवय काय मोडत नाही'; मिलिंद गवळीची 'ती' पोस्ट आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 03:04 PM2022-01-20T15:04:39+5:302022-01-20T15:08:36+5:30

Aai Kuthe Kay Karte : पुन्हा एकदा मिलिंद गवळी(Milind Gawali)ची इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत आली आहे.

Aai Kuthe Kay Karte: 'What doesn't break that habit of Aniruddha'; Milind Gawali's 'she' post came up for discussion | Aai Kuthe Kay Karte: 'अनिरूद्धची ती सवय काय मोडत नाही'; मिलिंद गवळीची 'ती' पोस्ट आली चर्चेत

Aai Kuthe Kay Karte: 'अनिरूद्धची ती सवय काय मोडत नाही'; मिलिंद गवळीची 'ती' पोस्ट आली चर्चेत

Next

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहेत. या मालिकेतील अनिरुद्ध आणि अरुंधती बऱ्याचदा चर्चेत येत असतात. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali)ने साकारली आहे. तो सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि त्याचे सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत येत असतात. दरम्यान पुन्हा एकदा मिलिंद गवळीची इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत आली आहे.

मिलिंद गवळीने इंस्टाग्रामवर आई कुठे काय करते मालिकेचा लेटेस्ट प्रोमो शेअर करून त्याबद्दलचे त्याचे मत मांडले आहे. त्याने लिहिले की, चिडणारा माणूस weak किंवा helpless असतो". अनिरुद्ध देशमुख हे एक correct example आहे. कधी कधी तर अनिरुद्धच्या वागण्याचं मला हसूच येते, त्याच्या घोढचुकीमुळे त्याची बायको त्याला सोडून गेली, बरं ही त्याची चूक त्यांनी शंभर वेळा कबुलही केले आहे, मग आता सोड ना अनिरुद्ध, करू अरुंधतीला तिच्या आयुष्याचं काय करायचे ते, तू कशाला मध्ये ढवळाढवळ करतोयस ! बरं आता तुझा काही अधिकारच नाही आहे, का स्वतःला त्रास करुन येतोयस आणि बाकीच्या सगळ्यांना त्रास देतोय?


त्याने पुढे म्हटले की, कधीकधी मला अनिरुद्ध ची गंमत पण वाटते, सगळं त्याच्या विरोधात आहे,. आणि हे त्याला पण माहिती आहे, अरुंधती त्याला विचारत नाही, ती खूप खंबीर आहे, हे सगळं त्याला माहिती आहे, बरं हा काही जरी बोलला तरी ती ऐकणार नाही, तिला जे करायचं तेच करणार, हे पण त्याला चांगलंच माहिती आहे, पण अनिरुद्ध ची ही पंचवीस वर्षापासून ची सवय, अरुंधती वर हक्क गाजवायचा, ती सवय काय त्याची मोडत नाही आणि अगदी फार सिरिअसली त्याच्याकडे जर बघितलं नाही, तर मला तर खूप छान वाटतं हा अनिरुद्ध आपल्या एक्स वाइफ बद्दल अजूनही किती पजेसिव्ह आहे, म्हणजे एका वेगळ्या दृष्टीने बघितलं तर अनिरुद्धच अरुंधतीवर अजूनही जीव आहे, प्रेम आहे, व्यक्त करता येत नाही किंवा व्यक्त करायची पद्धत वेगळी आहे, म्हणून ही चिडचिड, म्हणून हा राग,किंवा बऱ्याच लोकांना वाटतं तसंच त्याचं चिडण्याचं कारण वेगळेच असू शकतो. खरं कारण तर नमिता वर्तक यांनाच माहीत असणार.तुम्हाला काय वाटतं?

Web Title: Aai Kuthe Kay Karte: 'What doesn't break that habit of Aniruddha'; Milind Gawali's 'she' post came up for discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app