यशची Reel आणि Real आई एकाच फ्रेममध्ये; तुम्ही पाहिलं का त्याच्या खऱ्या आईला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 15:14 IST2022-02-15T15:13:50+5:302022-02-15T15:14:55+5:30
Abhishek deshmukh: कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असलेला अभिषेक अनेकदा इन्स्टाग्रामवर त्याचे फॅमेली फोटो वा त्याच्या पाळीव श्वानासोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो.

यशची Reel आणि Real आई एकाच फ्रेममध्ये; तुम्ही पाहिलं का त्याच्या खऱ्या आईला
छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते. या मालिकेने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अरुंधतीसह या मालिकेतील यश, अभि, इशा, गौरी, आई, संजना, अनिरुद्ध या भूमिका साकारणारा प्रत्येक कलाकार लोकप्रिय झाला आहे. यामध्येच मालिकेत यशची भूमिका साकारणाऱ्या अभिषेक देशमुख याने त्याच्या रिल आणि रिअल लाइफ आईचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असलेला अभिषेक अनेकदा इन्स्टाग्रामवर त्याचे फॅमेली फोटो वा त्याच्या पाळीव श्वानासोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याने त्यांच्या पडद्यावरील आणि पडद्यामागील आईसोबत फोटो शेअर केला आहे. खास व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत त्याने हे फोटो शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे.
"आई-यश-आई..Valentine’s Day!! डबल धमाका!!! #आई #onset #abhishekdeshmukh,"असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. यापूर्वीही अभिषेकने त्याच्या आईचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, त्याचा हा फोटो चांगलाच चर्चेत येत आहे. तसंच अभिषेकने शेअर केलेल्या या फोटोमध्ये संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेदेखील दिसून येत आहे.