उपसा सिंचन योजनेस गेल्या साडेचार वर्षांत रुपयाचाही निधी नाही : भारत भालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:17 PM2019-04-10T12:17:22+5:302019-04-10T12:20:14+5:30

भीषण दुष्काळ असताना जनावरांना चारा व पिण्यास पाणी न देता केवळ आश्वासनांची खैरात करणाºया सरकारला सत्तेतून हाकलून द्या, असे आवाहन आ. भारत भालके यांनी केले.

In the last four and a half years, there is no fund for the upturn irrigation scheme: Bharat Bhalek | उपसा सिंचन योजनेस गेल्या साडेचार वर्षांत रुपयाचाही निधी नाही : भारत भालके

उपसा सिंचन योजनेस गेल्या साडेचार वर्षांत रुपयाचाही निधी नाही : भारत भालके

googlenewsNext
ठळक मुद्दे- माचणूर येथे आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा- आमदार भारत भालके यांनी केली भाजप सरकारवर टिका- सरकारने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला - भालके

मंगळवेढा : तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने मंजूर केलेल्या ३५ गाव उपसा सिंचन योजनेस गेल्या साडेचार वर्षांत एक रुपयाचाही निधी दिला नाही. भीषण दुष्काळ असताना जनावरांना चारा व पिण्यास पाणी न देता केवळ आश्वासनांची खैरात करणाºया सरकारला सत्तेतून हाकलून द्या, असे आवाहन आ. भारत भालके यांनी केले़ माचणूर येथे आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

या आरक्षणप्रश्नी व पंढरपूर येथील मंदिर परिसरातील घटनेमुळे  न्याय-मागण्यांसाठी भांडल्यामुळे सरकारने माझ्यावर खोटा गुन्हा नोंदविला, परंतु सरकारच्या दबावाला न घाबरता आपण लोकांसाठी लढत राहणार आहे़ भाजप सरकारने सर्व घटकांवर अन्याय केला आह़े़ या लबाड सरकारने आशा दाखवून दशा देण्याचे काम केल्याने सरकारला पायउतार करावे, असे त्यांनी सांगितले.

व्यासपीठावर राहुल शहा, भारत पाटील, नितीन नकाते, शिवाजी काळुंगे, पी़ बी़ पाटील, चंद्रकांत घुले, अर्जुन पाटील उपस्थित होते़ सूत्रसंचालन धनंजय पाटील यांनी केले.

काय समस्या मांडणार ?

  • - मी देव असल्याचे सांगणारे जयसिद्धेश्वर जनतेच्या समस्या दिल्लीत काय मांडणार ? असा सवाल करीत भालके म्हणाले, मराठा, धनगर, मुस्लीम व इतर समाजाला आरक्षण दिले नाही.

Web Title: In the last four and a half years, there is no fund for the upturn irrigation scheme: Bharat Bhalek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.