Shocking! रस्त्यावरून चालताना शिंकला अन् जागीच गेला तरूणाचा जीव, मित्रांनाही बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 12:25 IST2022-12-05T12:24:53+5:302022-12-05T12:25:46+5:30

शिंक आल्यावर तरुण तोंडावर हात ठेवून शिंकला तेवढ्यात...

Shocking While walking on the road the young boy sneezed and died on the spot his friends were also puzzled | Shocking! रस्त्यावरून चालताना शिंकला अन् जागीच गेला तरूणाचा जीव, मित्रांनाही बसला धक्का

Shocking! रस्त्यावरून चालताना शिंकला अन् जागीच गेला तरूणाचा जीव, मित्रांनाही बसला धक्का

Shocking Video on social media: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अंदाज बांधणे खूपच कठीण आहे. काही वेळी तेथील व्हिडीओ माणसाला पोट धरून हासायला भाग पाडतात. तर काही वेळी काळजाचा ठोकाच चुकवतात. अशाच एका तरूणाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. एखाद्याला मरण कुठे, कधी, कसे येईल हे कुणीच सांगू शकत नाही. अशाच एका मृत्यूचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका तरुणाला चालता चालता मृत्यू आल्याचा हा व्हिडीओ आहे. मुख्य म्हणजे चालताना या तरुणाला शिंक येत आणि त्यानंतर तो तिथेच कोसळून त्याचा जागीच जीव जातो. ही मृत्यूची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

तरुणाच्या बाबतीत ज्या पद्धतीने हे सारं घडलं ते पाहूनच तुम्हाला धक्का बसेल. मित्रांसोबत मजा-मस्ती-धमाल करत हा तरुण चालत होता. एक शिंक आली आणि काही वेळातच त्याचा जीव गेला. त्याच्या मित्रांनाही हे सारं पाहून चांगलाच धक्का बसला. तसेच, हा व्हिडीओ पाहून सर्वच जण Shocked झाले.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक छोटासा रोड दिसतो. त्यावरून काही तरुण चालत येताना दिसतात. गप्पा-गोष्टी करत, धमाल करत हे मित्र येत असतात. चालता चालता मित्रांपैकी एका तरुणाला शिंक येते. हा तरुण आपल्या नाकावर दोन्ही हात ठेवून शिंकताना दिसतो. त्यानंतर तो आपल्या गळ्याला हात लावतो. शिंक आल्यानंतर त्याला कदाचित घशात काहीतरी झाल्यासारखे वाटते. मित्रांसोबत तो पुढे चालत जातो खरा पण तेवढ्यात त्याला काही तरी होते, तो आपल्या एका मित्राच्या खांद्यावर आपला एक हात ठेवतो आणि तेव्हाच अचानक जमिनीवर कोसळतो.

पाहा व्हिडीओ-

मजा मस्ती करत चालणाऱ्या आपल्या मित्राला नक्की काय झालं हे मित्रांनाही कळत नाही. असं अचानक काय झालं, असा प्रश्न साऱ्यांनाच पडतो. मित्रांनाही काहीच कळत नाही. ते सुरूवातीला घाबरतात पण नंतर ते त्याला धरून ते एका बाजूला घेऊन जातात. पाणी प्यायला लावतात, पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओतून ही घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या तरुणाला हार्ट अटॅक आल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मात्र यातील कोणत्याही गोष्टी अधिकृत माहिती अद्याप तरी देण्यात आलेली नाही.

Web Title: Shocking While walking on the road the young boy sneezed and died on the spot his friends were also puzzled