
सखी: तुळशीच्या काड्यांचा चहा मसाला: सुक्या काड्यांपासून बनवा स्वादिष्ट, आरोग्यदायी चहा
सुकलेल्या तुळशीच्या काड्या फेकून देऊ नका! त्यांपासून चविष्ट चहा मसाला बनवा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि वेलची, दालचिनी यांसारख्या मसाल्यांनी चहा अधिक स्वादिष्ट होतो. सोपे, आरोग्यदायी आणि चविष्ट!

राष्ट्रीय: 'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', जयशंकर यांचे मोठे विधान
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी KEC 2025 परिषदेत भारत-अमेरिका व्यापार संबंध, रशियाकडून इंधन आयात आणि QUAD गटाच्या कार्यप्रणालीवर सविस्तर भाष्य केले. त्यांनी मान्य केले की, सध्या भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापारिक मुद्द्यांवर मतभेद आहेत आणि या संदर्भात अद्याप अंतिम करार (Trade Agreement) झालेला नाही.

राष्ट्रीय: धर्म, भाषा काहीही असो; आपण सर्व हिंदू आहोत-मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज मध्य प्रदेशातील सतना येथे मेहेर शाह दरबाराच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना संघप्रमुखांनी एकतेवर भर दिला. ते म्हणाले की, “आपण सर्व हिंदू आहोत. ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली. धर्म किंवा भाषा काहीही असो, आपण सर्व एकच आहोत.”

आंतरराष्ट्रीय: "केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणूक?
स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गसोबत अमानुष वागणूक करण्यात आल्याचा आरोप इस्रायलवर करण्यात आला आहे. ग्रेटा थनबर्गचे केस ओढण्यात आले. तिला बळजबरी इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावले गेले. इस्रायलने ताब्यात घेतलेल्या आणि नंतर टर्कीला पाठवण्यात आलेल्या सोबतच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हा दावा केला आहे.

महाराष्ट्र: ज्योती कदम माध्यमासमोर आल्या; अनिल परबांचे आरोप चुकीचे, कारण...
अनिल परब यांनी पत्नीबाबत केलेले आरोप धादांत खोटे आहे. परब हा भ्रष्ट माणूस आहे. बिल्डरांकडून पैसे जमा करण्याचं काम परब करतात असं सांगत रामदास कदमांनी पहिल्यांदाच पत्नीला माध्यमांसमोर आणले. ज्योती रामदास कदमांनी अनिल परबांनी केलेले आरोप खोडून काढले. १९९३ मध्ये घडलेल्या त्या घटनेबाबत खुलासा करताना ज्यानं आग लावली असा आरोप होतो, ते वाचवण्याचा प्रयत्न का करतील असा प्रश्न उपस्थित केला.

क्राइम: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार
परदेशी भाषा शिकवणाऱ्या एका २९ वर्षीय शिक्षिकेसोबत मैत्री केली. तिचा विश्वास संपादन केला आणि थेट पार्टीचे निमंत्रण दिले. शिक्षिका मित्रावर विश्वास ठेवून तिथे गेली, पण जे घडलं तिच्या मनावर मोठा आघात झाला. आधी मित्राने आणि नंतर त्याच्या तीन मित्रांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

राष्ट्रीय: पाकिस्तानला रशियाकडून फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्याने खळबळ
भारताचा मित्रराष्ट्र रशियाने पाकिस्तानला लढाऊ विमानाचे इंजिन पुरवल्या दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर रशियाशी संबंध बिघडवल्याचा आरोप केला. मात्र, भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय यांनी हे दावे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हणत फेटाळून लावले.

आंतरराष्ट्रीय: Air India विमानाचं इमरजेन्सी लँडिंग; प्रवासी सुखरूप, धोका टळला
अमृतसरहून बर्मिंगहॅमला गेलेल्या एअर इंडियाच्या विमानात लँडिंगपूर्वी इमरजेन्सी सिस्टम सक्रिय झाली. मात्र प्रसंगावधान राखून रनवेवर हे विमान सुरक्षित उतरवण्यात आले आहे. विमानाती प्रवासी आणि क्रू सुरक्षित आहेत. मात्र या घटनेनंतर तपासासाठी या विमानाची सेवा अखंडित करण्यात आली आहे. त्यामुळे बर्मिघमहून अमृतसरला येणारे विमान रद्द करण्यात आले आहे. एअर इंडियाकडून प्रवाशांसाठी पर्यायी उड्डाण अथवा राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे

आंतरराष्ट्रीय: नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
नेपाळमधील काही भागांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. काही ठिकाणी ढगफुटी होऊन भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर्व नेपाळमधील विमान सेवा विस्कळीत झाली आहे. महामार्गही बंद झाले असून, शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. भूस्खलनाच्या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर काही घटनांतही काही जणांना जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे.

फिल्मी: कतरिना कैफच्या प्रेग्नंसीवर दीर सनी कौशलची प्रतिक्रिया, म्हणाला- ''कुटुंबात काहीशी भीती...''
विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच आई-बाबा होणार आहेत. पण वहिनी कतरिनाच्या प्रेग्नंसीवर सनी कौशलने आनंद आणि थोडी भीती व्यक्त केली. कौशल कुटुंब ऑक्टोबरमध्ये बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. विकी - कतरिना या जोडप्याने इंस्टाग्रामवर एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत प्रेग्नंसीची घोषणा केली होती. कौशल कुटुंबात कतरिनाच्या गरोदरपणाची भीती का आहे? याबद्दल सनीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

राष्ट्रीय: केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट
दिल्लीतून सत्ता गेल्यानंतर अरविंद केजरीवाल पंजाबमधून राज्यसभेवर जाऊ शकतात, असे अंदाज मांडले जात होते. पण, केजरीवालांनी एका उद्योगपतींना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला. उद्योगपती राजिंदर गुप्ता यांच्या नावाची आम आदमी पक्षाने घोषणा केली आहे. २४ ऑक्टोबर रोजी ही निवडणूक होणार आहे.

सखी: डोक्यातील खाज थांबवा: कोंड्यावर ४ सोपे आणि प्रभावी उपाय.
कोंड्याचे कारण म्हणजे तेल, घाम आणि फंगल इन्फेक्शन. खोबरेल तेल, लिंबू, दही, एलोवेरा आणि कडुनिंब पाणी खाज आणि कोंडा कमी करतात. आठवड्यातून दोनदा सौम्य शॅम्पू आणि कोमट पाण्याने केस धुवा आणि टाळूची स्वच्छता राखा.

पुणे: पुण्यात NCP शरद पवार गटाचे आमदार बापू पठारे यांना मारहाण
पुण्यात अजित पवार समर्थकांशी झालेल्या वादातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बापू पठारे यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव येथे रस्त्याच्या कामावरून झालेल्या वादातून तणाव निर्माण झाला.आमदार बापू पठारे आणि अजित पवारांचे समर्थक बंडू खांदवे यांच्यातील शाब्दिक वादाचे पडसाद हाणामारीत झाले. या घटनेचा आमदार रोहित पवार यांनी निषेध केला आहे.

क्राइम: स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स
मुलींना आमिषे देऊन, धमक्या देऊन, प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना शय्यासोबत करायला लावणाऱ्या स्वामी चैतन्यानंदचे कारनामे हळूहळू उजेडात येऊ लागले आहेत. स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही असेच चाळे सुरू होते. मुलींच्या फोटोंवर चैतन्यानंद कमेंट्स करायचा. तरुणींचे प्रोफाईल बघायचा.

आंतरराष्ट्रीय: भारताच्या इशाऱ्यावर पाकिस्तानी सैन्याची पोकळ धमकी, म्हणाले...
जर पाकिस्तानला जागतिक नकाशावर टिकून राहायचे असेल, तर त्याने आपल्या भूमीवरून दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देणे थांबवले पाहिजे असा इशारा भारतीय लष्करप्रमुखाने पाकिस्तानला दिला होता. त्यावर आता पाकिस्तानी सैन्याने उत्तर दिले आहे. जर भविष्यात या दोन्ही देशात युद्ध झाले तर ते खूप विनाशकारी असेल. आम्ही विना कुठलीही पर्वा करता जोरदार प्रत्युत्तर देऊ, पाकिस्तान मागे हटणार नाही असं त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र: बंद दाराआड खलबतं! शाह महाराष्ट्रासाठी मोठं पॅकेज जाहीर करणार?
देशाचे गृहमंत्री अमित शाह रात्री उशिरा शिर्डीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बंद दाराआड चर्चा केली. पाऊस तास या तिन्ही नेत्यांमध्ये खलबतं सुरू होती. ज्यात पूरग्रस्तांसाठी मदत आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. अमित शाह राज्यातील पूरग्रस्तांना मोठं पॅकेज जाहीर करू शकतात अशीही चर्चा आहे.

राष्ट्रीय: दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अॅक्शन'! कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला अटक
मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये १० मुलाचा मृत्यू झाला. देशभरात या घटनेने खळबळ उडाली. कप सिरपमुळे इतके जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत हे औषध लिहून देणाऱ्या डॉक्टरला अटक केली. डॉ. प्रवीण सोनी असे या डॉक्टरचे नाव आहे.

राष्ट्रीय: भारतात आता खासगी कंपन्या बनवणार क्षेपणास्त्र, दारूगोळा, कारण...
संरक्षण मंत्रालयाने आता भारतात खासगी क्षेत्रासाठी क्षेपणास्त्र, दारूगोळा उत्पादन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेला चालना देत जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत शस्त्र निर्मिती वाढण्यावर भर दिला जात आहे. मात्र धोरणात्मक मिसाइलचे नियंत्रण DRDO कडेच असेल. यापुढे खासगी कंपन्यांना दारूगोळा उत्पादन युनिट स्थापन करण्यापूर्वी सरकारी मालकीच्या म्युनिशन इंडिया लिमिटेड (MIL) कडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता राहणार नाही.

महाराष्ट्र: अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ; महाराष्ट्राला किती फटका बसणार?
'शक्ती' चक्रीवादळ ओमानकडे सरकल्याने महाराष्ट्रावरील धोका कमी परंतु विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता. मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा, किनारपट्टीवरील जिल्ह्यांना ७ ऑक्टोबरपर्यंत सतर्क राहण्याचा इशारा. सोमवारी चक्रीवादळ पुन्हा गुजरातकडे वळण्याचा अंदाज. या दरम्यान वादळी वारे आणि उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने समुद्र अत्यंत खवळलेला राहील, असा अंदाज असून तशा सूचना हवामान विभागाने मच्छीमार, मच्छीमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना दिल्या आहेत.

महाराष्ट्र: पुढच्या वर्षी मेगा भरती, एमपीएससीला विलंब नाही: फडणवीस यांची घोषणा
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती पारदर्शकपणे होईल. १०,३०९ उमेदवारांना नियुक्ती पत्रे मिळाली. अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित नियुक्त्या लवकरच पूर्ण होतील. एमपीएससी भरती जलद होईल, पारदर्शकता सुनिश्चित. लाच नको, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र: 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात दाखवू; शिंदेसेनेचा गणेश नाईकांना इशारा
नवी मुंबईत १४ गावांच्या समावेशावरून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील संघर्ष वाढला. त्यात शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपाचे गणेश नाईकांना इशारा दिला आहे. गेल्या काही वर्षात नवी मुंबईकरांच्या दारात शिंदेंनी विकासाची गंगा आणली आहे. यामुळे नाईकांचा जळफळाट होत असून ते रोज बेताल वक्तव्ये करतायेत. यापुढे अशी वक्तव्ये केल्यास त्याच भाषेत सर्वसामान्य शिवसैनिक उत्तर देतील असा इशारा शिंदेसेनेने दिला.

नवी मुंबई: नवी मुंबई विमानतळ ८ ऑक्टोबरला; विमान वाहतूक सेवा डिसेंबरमध्ये सुरू
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे ८ ऑक्टोबरला लोकार्पण. सुरुवातीला २० दशलक्ष प्रवासी क्षमता, नंतर ९० दशलक्षपर्यंत वाढ. डिसेंबरमध्ये विमान वाहतूक सुरू. यामुळे तीन वर्षांत १५ ते १८ हजार रोजगार निर्माण होतील, तर पुढील दोन दशकांत हा आकडा एक लाखांवर जाईल.

महाराष्ट्र: कोजागरी पौर्णिमा: ६ ऑक्टोबरला साजरी करा, दा. कृ. सोमण यांचे मत.
६ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा साजरी करा, असे ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. लक्ष्मी 'कोण जाग आहे?' विचारत अवतरतात. खरे जागरण म्हणजे अज्ञानावर मात करणे, ज्यामुळे समृद्धी मिळते आणि निसर्गाचा आनंद घेता येतो. पावसाळ्यानंतर येणारी ही पहिली पौर्णिमा असल्याने, त्या रात्री आकाश निरभ्र आणि चंद्र तेजस्वी असतो.

पुणे: राज-उद्धव एकत्र येऊन काही फरक नाही: मंत्री योगेश कदम यांचे मत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी मराठी माणूस त्यांच्या मागे जाणार नाही, असे मत मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना मराठी माणसासाठी काहीच केले नाही. खरी शिवसेना आमचीच असून, जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र: मराठा समाजालाच का सगळे? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाच्या लाभांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, অসমमितीय संसाधনাचे वाटप दर्शवले. मराठा समाजाला अनेक आरक्षणांमध्ये प्रवेश मिळत असल्याचा आरोप करत ओबीसींसाठी समान न्यायाची मागणी केली. नागपूरमध्ये मोर्चा काढण्यावर नेते ठाम आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणात घुसखोरी करावी, केवळ या एकाच उद्देशाने ओबीसीमधून मराठा समाजाच्या नेत्यांना आरक्षण हवे आहे. मंत्री भुजबळ यांनी खाडाखोड करून दाखले दिले जात असल्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

महाराष्ट्र: दिवाळी तोंडावर: वीज दरवाढीचा शॉक; युनिटमागे ३५ ते ९५ पैसे वाढ
महावितरणने दिवाळीपूर्वी वीज दरवाढ जाहीर; युनिटमागे ३५ ते ९५ पैसे वाढ. घरगुती, व्यावसायिक व उद्योगांना फटका. इंधन समायोजन शुल्क आकारणीमुळे बिलात वाढ, ग्राहकांवर आर्थिक भार. महावितरणचे म्हणणे आहे की, वीज मागणी वाढल्यामुळे ओपन मार्केटमधून महाग दराने वीज खरेदी करावी लागली. तसेच, अधिक उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला. या अतिरिक्त खर्चाची भरपाई आता इंधन समायोजन शुल्क लादून केली जात आहे.

क्रिकेट: भारत-पाकिस्तान महिला क्रिकेट: आज हायव्होल्टेज लढत, हस्तांदोलन होणार?
पुरुषानंतर, भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघात विश्वचषक लढत. भारताचा दबदबा, सर्व ११ एकदिवसीय सामने जिंकले. पुरुषांप्रमाणे हस्तांदोलन संशयास्पद. पावसामुळे श्रीलंका-ऑस्ट्रेलिया सामना रद्द. हवामानाचा अंदाज असूनही भारत जिंकण्याची शक्यता.

छत्रपती संभाजीनगर: बाळांना कॅन्सर: पालकांचा विश्वास बसेना, तरीही उपचाराने आशा
मराठवाड्यात बाल कर्करोगाचे प्रमाण वाढले. पालकांना धक्का बसला, ते दुसरा अभिप्राय शोधत आहेत. दरवर्षी १८० मुले उपचारासाठी येतात, त्यापैकी ८०% बरे होतात. डॉक्टर लवकर उपचार आणि सकारात्मक परिणामांवर जोर देतात, ज्यामुळे कुटुंबांना आशा आहे.

बीड: महादेव मुंडे खून: दोन वर्षांनंतरही न्याय नाही, पत्नीचा मदतीसाठी धावा
महादेव मुंडे यांच्या हत्येस दोन वर्षे झाली तरी आरोपी निष्पन्न नाहीत. पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मदतीसाठी धाव घेतली असून, पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली आहे. कुटुंबीयांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर: महापूर, ढगफुटी नैसर्गिक आपत्ती घोषित करा: उच्च न्यायालयात याचिका
मराठवाड्यातील महापूर व ढगफुटी 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' म्हणून घोषित करा; २०१९ च्या कोल्हापूर महापुरामध्ये घोषित ‘एनडीआरएफ’च्या निकषांच्या तिप्पट मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला आदेशित करावे, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या याचिकेवर दिवाळीच्या सुटीनंतर सुनावणी होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर: जीएसटी कपातीचा गोंधळ: छोट्या दुकानांमध्ये जुने दर, सुपर शॉपीत सवलत!
जीएसटी कपातीने गोंधळ. एकीकडे किरकोळ किराणा विक्री करणारे व्यापारी जुन्या एमआरपीच्या वस्तू विकत आहेत, तर दुसरीकडे सुपर शाॅपी व मॉलवाल्यांनी जुन्या एमआरपीवर जीएसटीची कपात लागू करून ती विकणे सुरू केले आहे. ग्राहक संभ्रमात आणि नाराज.