
सखी: केस खूपच गळतात? जावेद हबीब सांगतात १ सोपा, इफेक्टिव्ह उपाय
जावेद हबीब सांगतात, केस गळती रोखण्यासाठी केस लहान ठेवा, कंडिशनर वापरा, आणि धुण्यापूर्वी कांद्याचा रस लावा. मोहरीचे तेल देखील फायदेशीर आहे. कांद्याचा रस केसांना मजबूत करतो.

व्यापार: मर्सिडीज-हुरुन अहवाल: भारतात करोडपतींची संख्या वाढली, महाराष्ट्राचा दबदबा!
मर्सिडीज-हुरुन अहवालानुसार, भारतात साडेआठ कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या कुटुंबांमध्ये मोठी वाढ झाली आहे, 2025 पर्यंत 90% वाढ अपेक्षित! मुंबई शहरांमध्ये तर महाराष्ट्र राज्यांमध्ये अव्वल स्थानी. भारतीय अर्थव्यवस्थेची जोरदार वाढ झाली आहे. लोकांची ८.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे, अशा लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ झालेली आहे.

छत्रपती संभाजीनगर: हैदराबाद गॅझेटिअर: मराठा आरक्षणाच्या नावाखाली सरकारकडून फसवणूक, गोलमेज परिषदेत आरोप
मराठा गोलमेज परिषदेत हैदराबाद गॅझेटिअरमुळे आरक्षणापासून वंचित राहिल्याने मराठा समाजाने सरकारवर फसवणुकीचा आरोप केला. नोंदी असलेल्यांनाच लाभ मिळणार असल्याने इतरांना पुन्हा लढा द्यावा लागणार आहे. स्वतंत्र कायद्याची मागणी करण्यात आली.

नांदेड: शांतता बैठकीत मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
आरक्षणाच्या वादाला आता धोकादायक वळण लागले असून नांदेडच्या रिसनगावात मराठा-ओबीसी आरक्षणावरून दोन गटांत वाद चिघळला. शांतता बैठकीतच हाणामारी झाली, ज्यात दोन्ही गटांचे ४ जण जखमी झाले. यानंतर गावात तणावाची स्थिती असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

बीड: पावसामुळे शाळेत पाणी, विद्यार्थी मंदिरात! वानटाकळी गावाची व्यथा!
परळी तालुक्यातील वानटाकळी येथे अतिवृष्टीने शाळेत पाणी शिरल्याने वर्ग भरले मंदिरात. सात वर्षात तिसऱ्यांदा शाळेत पाणी शिरले. पुरामुळे २०० हेक्टर जमीन खरडून गेली. शाळेच्या स्थलांतराची मागणी; माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गावाला भेट दिली.

मुंबई: मुंबईचा महापौर मराठीच; भाजपाच्या टीकेला मनसे-सेनेचे प्रत्युत्तर
मुंबई महापालिका निवडणुकीत उबाठा 'खान' महापौर बसवण्याचं षडयंत्र रचत असल्याचा आरोप भाजपाने केला. यावर मनसे आणि शिवसेनेनं जोरदार प्रत्युत्तर देत मुंबईचा महापौर मराठीच होणार, असा निर्धार व्यक्त केला. हिंदुत्व काय, मराठी माणूस काय हे भाजपाकडून आम्हाला शिकण्याची गरज नाही असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं तर खानांचा एवढा धिक्कार असेल तर फडणवीसांनी मुश्रीफांना मंत्रिमंडळातून दूर करावे असं राऊत म्हणाले.

लातुर: शेतकऱ्याच्या फोननंतर सहकारमंत्र्यांची कृषी कार्यालयात धाड, अधिकाऱ्यांची झाडाझडती!
चाकूर कृषी कार्यालयातील अनियमिततेच्या तक्रारीनंतर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अचानक भेट दिली. दहापैकी केवळ तीन कर्मचारी हजर होते. मंत्र्यांनी गैरहजर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले व कार्यालय हलवण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.

छत्रपती संभाजीनगर: शिरसाटांची अतिवृष्टीग्रस्त भागांची ट्रॅक्टरमधून पाहणी, ओल्या दुष्काळाची मागणी!
पैठणमध्ये अतिवृष्टीने ८६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान. पालकमंत्री संजय शिरसाटांनी ट्रॅक्टरमधून पाहणी केली. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना केली असून लवकरच मदतीची घोषणा होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

छत्रपती संभाजीनगर: दारूच्या नशेत वाद विकोपाला, मित्रांनी मित्राला गोळ्या घालून संपवले!
तीन मित्र दारू पीत बसल्यानंतर झालेल्या वादातून दोघांनी तिसऱ्यावर गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या झाडून त्याचा खून केला. त्यानंतर दोन्ही आरोपी पसार झाल्याचा प्रकार गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात मंगळवारी रात्री झाल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी एकाला अटक केली असून, दुसरा फरार आहे. वर्चस्वाच्या वादातून हत्या!

राष्ट्रीय: राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या: अनुराग ठाकूर
वारंवार पराभूत झाल्याने राहुल गांधी निराश झाले आहेत. काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ९० निवडणुका हरल्या. खोटे आरोप करण्याची राहुल गांधींना सवय आहे. निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ते लोकशाहीला कमकुवत करत आहेत. आधी ते आरोप करतात आणि नंतर माफी मागतात, याची त्यांना सवय झाली आहे, अशी टीका भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी केली.

सखी: अंगावर पित्ताचे चट्टे, खाज येते ? ५ घरगुती उपाय, पित्ताचा त्रास होईल कमी...
पित्तामुळे त्वचेवर लाल चट्टे आणि खाज येते. खरंतरं, वेगवेगळ्या कारणांमुळे पित्ताचा त्रास होतो. त्वचेवर पित्त उठल्यास सर्वातआधी खाजवू नका थंड पाण्याची पट्टी ठेवा, कडुलिंब - तुळशीच्या पानांची पेस्ट लावा. दलिया, खिचडी, नारळ पाणी घ्या. पित्ताचा त्रास अधिकच वाढला तर वेळीच डॉक्टरांकडे जा.

आंतरराष्ट्रीय: ट्रम्प यांनी भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत
भारत, चीन, अफगाणिस्थान, पाकिस्तानसह २३ देश मोठे ड्रग्ज उत्पादक किंवा ड्रग्ज तस्करीचे अड्डे असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकन काँग्रेसला ट्रम्प यांनी अध्यक्षीय निर्धार (प्रेसिडेन्शियल डिटरमिनेशन) सादर केला असून, यात अमेरिकेत येत असलेली बेकायदेशीर ड्रग्ज २३ देशांमध्ये तयार केली जात आहेत, तसेच पाठवली जात आहे, असे म्हटले आहे.

फिल्मी: दीपिकाची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
'कल्की 2898 एडी'च्या सीक्वलबद्दल एक मोठी बातमी समोर आलीय. दीपिका पादुकोणने सीक्वलमधून एक्झिट घेतलीय. निर्मात्यांनी तिने हा चित्रपट सोडण्यामागचं कारणही सांगितलंय. नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की'च्या प्रॉडक्शन हाऊस विजयंती मूव्हीजने एक्स अकाउंटवर पोस्टमध्ये सांगितलं की, 'कल्की'सारख्या प्रोजेक्टसाठी कमिटमेंटव्यतिरिक्त आणखी काही गोष्टींची गरज आहे.' 'कल्की 2898 एडी'च्या सीक्वलमध्ये दीपिकाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. पण तिने चित्रपट सोडल्यामुळे चाहते निराश झालेत.

धाराशिव: वादग्रस्त तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द, पूजा गायकवाड मुख्य आरोपी
उपसरपंच बर्गे आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या पूजा गायकवाडच्या तुळजाई कला केंद्राचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला. विनयभंग, अवैध मद्यविक्री, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने कारवाई. गावकऱ्यांनी तरुणाई बिघडत असल्याचा आरोप केला होता.

सखी: संत्री-मोसंबीची सालं फेकू नका, या पद्धतीने वापरा
संत्री-मोसंबीची सालं बहुगुणी! स्वयंपाकघरात, क्लिनर, खत, आणि एअर फ्रेशनर म्हणून वापरता येतात. त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर. कीटकनाशक म्हणूनही उपयोगी, घर राहते आनंदी!

राष्ट्रीय: राहुल गांधींचा मोठा आरोप: निवडणूक आयोगातून मत चोरीत मदत!
राहुल गांधींचा गंभीर आरोप! निवडणूक आयोग मतदारांची नावे वगळत आहे. दलित, अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे. पुराव्यानिशी तक्रार करूनही आयोग दुर्लक्ष करत आहे. आता आपल्याला आयोगातून मदत मिळत असल्याचा दाव राहुल गांधी यांनी केला आहे. मी लोकसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून ही जबाबदारीने माहिती शेअर करत आहे. आम्ही पुराव्यासह या गोष्टी मांडत आहोत, असे ते म्हणाले.

राष्ट्रीय: "मी विरोधी पक्षनेता, पुराव्यासह बोलतोय"; राहुल गांधी काय म्हणाले?
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार 'मत'चोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. कर्नाटकमध्ये मतदार यादीतून नावे वगळण्याचा प्रकार उघडकीस आला असून, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे. कर्नाटक सीआयडीने या प्रकरणी गुन्हा दाखल करून केंद्रीय निवडणूक आयोगाला १८ पत्रे दिल्याचा उल्लेखही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला

सखी: लॅपटॉपमुळे डोळे कोरडे पडले?
स्क्रीन टाइम वाढल्याने डोळे कोरडे होतात, कारण पापण्यांची उघडझाप कमी होते. त्याचाच परिणाम म्हणजे डोळे कोरडे झाल्यासारखे वाटतात. डोळ्यांना खाज यायला लागते. हे त्रास टाळायचे असतील तर कामाच्या अधूनमधून १ मिनिटाचा ब्रेक घ्या आणि डोळ्यांचे व्यायाम करा.

आंतरराष्ट्रीय: ट्रम्प जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुका अमेरिकेला महागात: ब्राझील राष्ट्रपती
"जेव्हा ट्रम्प पहिल्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते, तेव्हा मी राष्ट्रपती नव्हतो. त्यांचे संबंध बोल्सोनारोंसोबत आहेत. ब्राझील सोबत नाहीत. ट्रम्प भलेही अमेरिकेचे अध्यक्ष असतील पण, ते जगाचे सम्राट नाहीयेत", असे खडेबोल ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी टॅरिफच्या मुद्द्यावरून सुनावले. ते एका मुलाखतीत बोलत होते.

राष्ट्रीय: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर खळबळजनक आरोप
केंद्रीय निवडणूक आयोगावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी गंभीर आरोप केले आहेत. दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांची नावे मतदार यादीतून हेतुपुरस्सर वगळल्याचा आरोप त्यांनी केला. कर्नाटकातील आळंद मतदारसंघातील उदाहरण देत त्यांनी ६०८० मतदार वगळल्याचे सांगितले. त्यातील काही मतदारांना त्यांनी स्टेजवर बोलावले. महाराष्ट्र, हरियाणात मतदारांची नावे काढल्याचा दावा, राहुल गांधींनी सादर केले पुरावे. निवडणूक आयोगाने आरोपांचे खंडन करावे असं आव्हान राहुल गांधींनी केले.

अन्य क्रीडा: IND vs PAK: आज नीरज चोप्रा, अर्शद नदीम यांच्यात 'हाय-व्होल्टेज' सामना
भारत-पाक तणावाच्या वातावरणात नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांच्यात भालाफेकीचा सामना रंगणार आहे. ऑलिम्पिकनंतर हे दोघे पहिल्यांदाच भिडणार आहेत. नीरजने पात्रता फेरीत चांगली कामगिरी केली, तर अर्शदला काहीसा संघर्ष करावा लागला होता. अंतिम सामना आज दुपारी ३:५३ वाजता टोकियोमध्ये रंगणार.

राष्ट्रीय: भाजप खासदार भूस्खलनातून थोडक्यात बचावले, व्हिडीओ व्हायरल
भाजपचे गढवालचे खासदार अनिल बलुनी भूस्खलनातील पीडितांच्या भेटीसाठी निघालेले असताना मोठी दरड कोसळली. यावेळी खासदार बलुनी सगळ्यांना पाठीमागे जाण्याच्या सूचना देत होते. त्याचवेळी आणखी दरड कोसळली. घाबरलेले खासदार बलुनीही जीव वाचवण्यासाठी धावत सुटले. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.

राष्ट्रीय: पाकिस्तान-सौदी संरक्षण करारावर भारताची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
पाकिस्तान आणि सौदी अरेबियातील संरक्षण करारावर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरतेवर होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन केले जात आहे. देशहित जपण्यासाठी भारत कटिबद्ध आहे,असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. दोन्ही पैकी कुठल्याही एका देशावर हल्ला झाला तर तो दोन्ही देशांवरील हल्ला समजला जाणार आहे असा करार पाकिस्तान-सौदी अरेबियात झाला आहे. या करारामुळे पाकिस्तानला आणखी बळ मिळणार आहे.

ठाणे: शिंदेसेनेला शह देण्यासाठी भाजपा-मनसे-उद्धवसेना आली एकत्र
मुंबई क्रिकेट संघटनेला संलग्न असलेल्या ठाण्यातील शतायुषी स्पोर्टिंग क्लबच्या त्रैवार्षिक निवडणुकीत यंदा राजकीय रंग चढला आहे. स्पोर्टिंग क्लबच्या निवडणुकीत भाजपा, मनसे आणि उद्धवसेनेच्या युतीने एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेला आव्हान दिले आहे. १९ सप्टेंबर रोजी १५७ सदस्य १८ उमेदवारांमधून ९ कार्यकारिणी सदस्य निवडणार आहेत. दोन्ही पॅनलमधील मुकाबला चुरशीचा ठरणार असून क्लबच्या सभागृहात महापौरांच्या निवडणुकीसारखीच हवा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त वर्तवली जात आहे

मुंबई: मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण: आरोपी अटकेत, कृत्याची कबुली
दादरमध्ये मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सदर व्यक्तीने केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे. तसेच काही धक्कादायक खुलासेही केले आहेत. यासंदर्भात मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.

राष्ट्रीय: दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, दोन्ही शूटर ठार
अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे दोन आरोपी गाजियाबादमध्ये चकमकीत ठार झाले आहेत. रविंद्र (रोहतक) आणि अरुण (सोनीपत) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही रोहित गोदारा-गोल्डी बरार टोळीशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिशाच्या वडिलांना सुरक्षिततेची खात्री दिली होती.

नांदेड: मुखेडमध्ये ट्रकचा कहर, अनेक वाहनांना धडक, २४ जखमी
नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे भरधाव ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्याने २४ जण जखमी झाले, तिघांची प्रकृती गंभीर आहे. मुखेड शहरातील बाराहाळी चौकात दुपारी प्रचंड वर्दळ होती. त्याचवेळी देगलूरकडे भरधाव वेगाने जाणारा ट्रक हा अपघाताचे कारण आहे. ट्रक चालकावर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.

सखी: साखर खाणं सोडलं तर काय होतं?
जास्त साखर खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. २० दिवस साखर सोडल्यास फॅटी लिव्हर सुधारते, वजन कमी होते, आतड्यांचे आरोग्य सुधारते, तसेच त्वचेसाठी फायदेशीर ठरते, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

राष्ट्रीय: ईव्हीएमवर उमेदवाराचे रंगीत फोटो, सारख्या नावाचा गोंधळ संपला!
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता ईव्हीएमवर उमेदवारांचे रंगीत फोटो छापण्यात येणार आहेत. यामुळे समान नावामुळे होणारा गोंधळ टळणार आहे. बिहार निवडणुकीपासून या निर्णयाला सुरुवात होणार असून कागदही उच्च प्रतीचा वापरला जाणार आहे. यामुळे मतदारांना सोपे जाईल, मतदानावर विश्वास वाढेल.

धाराशिव: लोहारा 'हायटेक' झाला! एका दिवसात ४४ ग्रामपंचायतींच्या वेबसाईट लाँच!
लोहारा तालुका 'हायटेक'! एका दिवसात ४४ ग्रामपंचायतींच्या वेबसाईट लाँच करून विक्रम. जिल्हा परिषदेच्या मदतीने 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज' योजनेत मोठे यश. आता दाखले, कर, तक्रारी व शासकीय योजनांची माहिती घरबसल्या मिळणार, लोकांमध्ये आनंदाची लहर!

महाराष्ट्र: चलो दिल्ली! मनोज जरांगे यांची घोषणा, मोठे कारण आले समोर
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीला जाण्याची घोषणा केली आहे. हैदराबाद, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर दिल्लीत आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अटकेपार झेंडा लावला, ती ठिकाणे पाहण्यासाठी जाणार, असे जरांगे म्हणाले.