सखी: लांबसडक केसांचे खास 'सिक्रेट'! घरगुती हेअर ग्रोथ वॉटरची कमाल...
नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल 'हेअर ग्रोथ वॉटर' हे खास पाणी केसांच्या मुळांना नवजीवन देते, ज्यामुळे केसांची वाढ दुप्पट वेगाने होते. खास औषधी घटकांपासून तयार केलेलं पाणी नियमित वापरल्यास टाळूला पोषण मिळतं, मुळं मजबूत होतात आणि केसांची वाढ दुप्पट गतीने होण्यास मदत होते.
सखी: कैरी टिकवण्याची सोपी पद्धत: आंबोशी म्हणजे वर्षभराची साठवण
आंबोशी म्हणजे उन्हात वाळवलेल्या कैरीच्या फोडी, वर्षभर टिकतात. कच्च्या कैऱ्यांपासून केली जाते. आमटी, डाळ आणि लोणच्यात वापरली जाते किंवा आमचूर पावडर बनवण्यासाठी वापरली जाते. ही पद्धत रेफ्रिजरेशनशिवाय कैरीचा आंबटपणा टिकवते, पचनास मदत करते.
राष्ट्रीय: पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार- इमाम उमर इलियासी
ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे मुख्य इमाम उमर इलियासी यांनी पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होण्याची भविष्यवाणी केली. त्यांनी कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरच्या प्रगतीचे कौतुक केले, शिक्षण आणि पर्यटन सुधारल्याचे नमूद केले. इलियासी हे निवडक इस्लामी विद्वानांपैकी एक आहेत जे कट्टरता आणि दहशतवादाविरोधात स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेतात. दिल्लीतील एका मशिदीत RSS प्रमुख भागवत यांची भेट घेतल्यानंतर ते प्रकाशझोतात आले
पुणे: Video : वाढत्या पावसासाठी गटारांची क्षमता दुप्पट करणार
पुणे : पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून कमी वेळात जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अनेकदा एका तासात ५० मिमीपासून ते १०० मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पावसाळी गटारांची वहन क्षमता वाढविण्यासाठी नियमात बदल केला आहे. शहरात पावसाळी गटारांची वहन क्षमता दुप्पट केली जाणार आहे. शहरात यापुढे ६० मिलिमीटर व्यासाच्या पाइप ऐवजी एका तासात ११३ ते १३० मि.मी. पाऊस पडेल, त्यानुसार पावसाळी गटारांच्या वाहनाची क्षमता दुप्पट केली जाणार आहे, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
व्यापार: इराण युद्धाचा भारतीय प्रवाशांवर परिणाम; हवाई प्रवास ३०-३५% महागला, जाणून घ्या ताजे दर...
इराण,इस्रायल आणि अमेरिकेतील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता थेट भारतीयांच्या खिशावर होताना दिसत आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (ATF) महाग झाले आहे. त्यामुळेच देशातील विमान कंपन्यांनी फ्यूल सरचार्ज वाढवला असून, विमान तिकिटांचे दरही ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले आहेत.
राष्ट्रीय: आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा १५ टक्के पगार कापणार
तेलंगणात आई-वडिलांना न सांभाळल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारातून १५% कपात होणार आहे. तेलंगणा सरकारने याबाबतचा एक कायदा मंजूर केला आहे. याबाबत मुलाचे आई-वडील तक्रार करू शकतात, जिल्हाधिकारी ६० दिवसांत या तक्रारीवर निर्णय घेतील. सरकारी, खासगी कर्मचाऱ्यांसाठी कायदा लागू असेल. या कायद्यातंर्गत कर्मचाऱ्याच्या पगारातून १५ टक्के अथवा १० हजारापर्यंत कपात होऊ शकते. पगारातून कापलेले पैसे आई वडिलांना दिले जातील.
ऑटो: महिंद्राच्या EV कार्सवर ग्राहक तुटून पडले; फक्त एका वर्षात 'इतक्या' हजार कार्सची विक्री...
Mahindra EV: दिग्गज भारतीय कार उत्पादक कंपनी Mahindra & Mahindra ने इलेक्ट्रिक वाहन बाजारात मोठा टप्पा गाठला आहे. कंपनीने फक्त एका वर्षात आपल्या ‘बॉर्न इलेक्ट्रिक’ कार्सच्या 50 हजार युनिट्सची विक्री पूर्ण केली आहे. या यशानंतर कंपनीने उत्पादनही वाढवले असून, आता वेटिंग पिरियड कमी होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय: इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा विस्तार टेक्नॉलॉजी क्षेत्रापर्यंत झाल्याचे दिसत आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड (IRGC) ने दुबईमधील अमेरिकन टेक कंपनी Oracle कॉर्पोरेशनच्या डेटा सेंटरवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. मात्र, UAE सरकारकडून अद्याप या हल्ल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
व्यापार: सोन्याच्या दराचा अंदाज: तज्ज्ञांनी खरेदीदारांना संभाव्य संकटाचा इशारा दिला
मार्च महिन्यात सोन्याच्या किमतीत १७ वर्षांतील सर्वात मोठी मासिक घसरण नोंदवली गेली आहे. मात्र, आता प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पीटर शिफ यांनी सोन्याच्या दरांबाबत एक नवीन आणि मोठं भाकीत केलंय. त्यांच्या मते, एप्रिल १९८० नंतर एप्रिल २०२६ हा महिना सोन्यासाठी सर्वोत्तम महिना ठरू शकतो. शिफ यांनी सोन्याच्या किमतीसाठी एक नवीन टार्गेट निश्चित केलंय, जे सध्याच्या परिस्थितीत सामान्य जनतेसाठी अत्यंत धक्कादायक आहे.
सखी: टॅनिंग आणि डेड स्किनसाठी कॉफी स्क्रब
या उन्हाळ्यात केमिकल्सला म्हणा 'बाय-बाय' आणि कॉफीच्या साहाय्याने मिळवा मखमली, डागविरहित आणि ग्लोइंग त्वचा.
राष्ट्रीय: इराण युद्धात रशियाची भारताला SU-30 ची मदत; चीन, पाक धास्तावले
भारत आणि रशिया यांच्यात अनेक काळापासून सुरू असलेल्या संरक्षण सहकार्याला आणखी बळ मिळाले आहे. रशिया आता भारताला १२ नवीन SU 30 MKI लढाऊ विमान उत्पादन करण्यासाठी साहित्य पुरवठा करणार आहे. रशियाने भारताला १२ नवीन SU-30MKI लढाऊ विमान उत्पादनासाठी लागणारे साहित्य पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पार्ट्स HAL नाशिक येथे प्लांटमध्ये एकत्रित करून हवाई दलाला या वर्षाच्या अखेरपर्यंत सोपवण्यात येतील.
व्यापार: इराणचा तेल टँकर भारताऐवजी चीनच्या दिशेनं; मार्ग बदलण्याचं कारण काय?
इराणमधून भारताकडे येत असलेला कच्च्या तेलाचा टँकर अचानक चीनच्या दिशेने वळला आहे. 'ब्लूमबर्ग'च्या अहवालानुसार, जर हे जहाज भारतात पोहोचलं असतं, तर गेल्या ७ वर्षांत इराणमधून भारतात आलेली ही पहिलीच तेलाची खेप ठरली असती. मात्र, आता या जहाजानं आपला रस्ता बदलला असून हे टँकर नेमके कुठे पोहोचणार, याबाबत अद्याप पूर्ण स्पष्टता नाही.
राष्ट्रीय: 'INS तारागिरी' सेवेत! भारताच्या नौदल सामर्थ्यात वाढ, शत्रूला धडकी
INS तारागिरी या अत्याधुनिक युद्धनौकेमुळे भारताच्या नौदल क्षमतेत वाढ झाली आहे. ७५% हून अधिक स्वदेशी बनावटीची ही नौका 'आत्मनिर्भर भारत' चे प्रतीक आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रे व आधुनिक प्रणालींनी सज्ज तारागिरी भारताची सागरी सुरक्षा वाढवते. आयएनएस तारागिरी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्राणघातक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे. INS तारागिरी ही प्रोजेक्ट १७ए अंतर्गत बांधलेली एक स्वदेशी युद्धनौका आहे.
आंतरराष्ट्रीय: अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
इराणमधील संघर्ष अधिक तीव्र होत आहे. अमेरिका आणि इस्रायलने आता इराणच्या पायाभूत सुविधांवरील हल्ले वाढवल्याचे वृत्त आहे. पूल, स्टील प्लांट, वैद्यकीय सुविधा केंद्रे यांसारख्या ठिकाणांवर बॉम्बहल्ले केल्यामुळे इराणचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यांनंतर आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन होत आहे का? यावर चर्चा सुरू झाली असून जिनिव्हा कन्व्हेन्शन पुन्हा चर्चेत आले आहे. अशा परिस्थितीत जिनिव्हा कन्व्हेन्शन काय आहे आणि युद्धामध्ये कोणते नियम पाळावे लागतात? हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
व्यापार: HDFC बँकेच्या दुबई शाखेत गैरव्यवहार; अध्यक्षांच्या राजीनाम्याचं कनेक्शन?
दुबईचे आर्थिक नियामक 'दुबई फायनान्शिअल सर्व्हिसेस अथॉरिटी'नं (DFSA) एचडीएफसी बँकेच्या दुबई इंटरनॅशनल फायनान्शिअल सेंटर (DIFC) शाखेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. 'इकोनॉमिक टाइम्स'च्या वृत्तानुसार, बँकेनं ग्राहकांना धोकादायक 'क्रेडिट सुइस बाँड्स'ची चुकीच्या पद्धतीनं विक्री (मिस-सेलिंग) केल्याचं तपासात समोर आलंय.
ऑटो: दमदार फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Suzuki ची स्टायलिश मॅक्सी स्कूटर, जाणून घ्या किंमत...
जपानी कंपनी Suzuki ने भारतात आपला नवीन Burgman 2026 मॅक्सी स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 1.02 लाख रुपये (एक्स-शोरूम) असून, टॉप व्हेरिएंटची किंमत 1.13 लाख रुपये पर्यंत जाते. विशेष म्हणजे हे नवीन मॉडेल जुन्या Burgman Street EX सोबतच विक्रीसाठी उपलब्ध राहणार असून, जुन्या मॉडेलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पुणे: देशात ३१५ लाख टन, तर राज्यात १०० लाख टन साखरेचे उत्पादन, राज्यातील हंगाम समाप्तीकडे
पुणे : यंदाच्या ऊस गाळप हंगामाच्या सुरुवातीला देशात ३५० लाख टन, तर राज्यात ११० लाख टन साखरेचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आता हे एकूण साखरेचे उत्पादन अनुक्रमे ३१५ आणि १०० लाख टन होईल, असे चित्र आहे. राज्यात आतापर्यंत ९८.८७ लाख टन, तर देशात २७१ लाख टन उत्पादन झाले आहे. राज्यात पुढील १० दिवसांत गाळप हंगाम संपण्याची शक्यता आहे. देशातून यंदा सात ते आठ लाख टन साखर निर्यात, तर ३१ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविली जाणार आहे.
बीड: वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' कारागृहाबाहेर; न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता...
भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले वर्षभरानंतर कारागृहाबाहेर आला आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे ढाकणे पिता-पुत्र मारहाण प्रकरणात तो मागील वर्षभरापासून कारागृहात होता. यातील एका प्रकरणात न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली असून, इतर गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर झाल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे: जेजुरीत चैत्र पौर्णिमा यात्रेला भाविकांची गर्दी; येळकोटच्या जयघोषात गड दुमदुमला.
जेजुरी गडावर चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त खंडोबा दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या घोषणांनी गड परिसर दुमदुमला. उष्णता आणि परीक्षा असूनही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
पुणे: बदलीनंतरही शाळेत हजर नाहीत ६३ शिक्षक; कारवाईऐवजी रजा मंजुरीचा प्रकार चर्चेत
जेजुरी : हवेली तालुक्यातील ३४ गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर त्या भागातील शाळांमधील सुमारे ४२० शिक्षकांचे दुर्गम भागातील शाळांमध्ये समायोजन करण्यात आले होते. मात्र, बदली झालेल्या तब्बल ६३ शिक्षकांनी तीन महिन्यांपासून संबंधित शाळांवर हजेरीच लावली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे: आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा; पिकांसह वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान
मंचर : आंबेगाव तालुक्यात गुरुवारी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून, शेतमालासह वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुपारी तीनच्या सुमारास तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कळंब, अवसरी, लौकी, चांडोली, श्रीक्षेत्र वडगाव-काशिंबेग आदी गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.
आंतरराष्ट्रीय: भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण असले तरी, अनौपचारिक स्तरावर, म्हणजेच ट्रॅक-2 (बॅक चॅनेल) चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये कतारची राजधानी दोहा येथे भारत आणि पाकिस्तानी प्रतिनिधींमध्ये एक अनौपचारिक बैठक झाल्याचे वृत्त आहे.
पुणे: जिल्हा परिषदेत चारही सभापती बिनविरोध; ‘समन्वयातून जिल्हा परिषद ब्रँड’चा निर्धार
पुणे : जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत सर्व चारही पदाधिकारी बिनविरोध निवडून आले. समाजकल्याण सभापतिपदी जितेंद्र बडेकर, महिला व बालकल्याण सभापतिपदी अंकिता पाटील, तर उर्वरित दोन सभापती म्हणून दीपाली हुलावळे आणि अमोल नलावडे यांची निवड करण्यात आली. तब्बल चार वर्षांनंतर या पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांनी विराजमान होताच जिल्हा परिषदेत राजकीय समन्वयाचे चित्र पाहायला मिळाले.
पुणे: Crime News: आळंदीत संशयातून घडला दुहेरी खून; आरोपी ५ तासांत जेरबंद
आळंदी - तीर्थक्षेत्र आळंदी परिसरातील केळगाव-हनुमानवाडी येथील ठाकरवाडी भागात घडलेल्या चिमुरडीसह वृद्धेच्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या पाच तासांत उलगडा करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी विनायक तुकाराम भवारी (वय ३२, रा. सिन्नर) याला आळेफाटा येथून ताब्यात घेण्यात आले. त्याने सहा वर्षीय धनश्री केदारी आणि तिची देखभाल करणाऱ्या ७९ वर्षीय मंगल शिंदे यांच्या हत्येची कबुली दिली आहे.
व्यापार: युद्धाचा तडाखा : डिझेलच्या दरात मोठी वाढ, उद्योगांना फटका
इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी मध्य पूर्वेतील युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे इंडस्ट्रियल डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे. हे वाढलेले दर बुधवार, १ एप्रिलपासून लागू झालेत. २८.२२ रुपये प्रति लिटरच्या या वाढीमुळे इंडस्ट्रियल डिझेल आता २५ टक्क्यांहून अधिक महाग झालंय.
व्यापार: वॅक्सिन किंग म्हणून प्रसिद्ध; पूनावालांनी खरेदी केलं १६७ कोटींचे पेंटिंग
भारतातील दिग्गज उद्योगपती सायरस पूनावाला पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी केलेली एक ऐतिहासिक खरेदी. त्यांनी प्रसिद्ध चित्रकार राजा रवि वर्मा यांचं ‘यशोदा आणि कृष्ण’ हे दुर्मिळ पेंटिंग सुमारे १६७.२ कोटी रुपयांना विकत घेतलंय. आज पूनावाला यांचं नाव केवळ श्रीमंतीपुरतं मर्यादित नसून, भारताला लसीकरणाच्या बाबतीत जगाचे ‘पॉवरहाऊस’ बनवणारे उद्योजक म्हणून घेतलं जातं.
पुणे: पुण्याच्या रस्त्यांवर अवकाळीच्या लाटा..! शहरातील रस्ते जलमय, अनेक ठिकाणी पाणी शिरले
पुणे : शहर आणि परिसरामध्ये गुरुवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह पुणेकरांची दाणादाण उडवली. तासाभराच्या तुफानी पावसाने पुण्यातील रस्ते पाण्याखाली गेले. जणूकाही समुद्राच्या लाटाच उसळत आहेत, अशीच स्थिती रस्त्यांवर पहायला मिळाली.
पुणे: परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत कार्यालय सोडू नका; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
पुणे : अवकाळी पावसाच्या काळात अतिवृष्टी, पाणी साचणे, पूरस्थिती आदी आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मुख्यालय सोडू नये, असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
फिल्मी: संजय दत्तच्या रेस्टॉरंटमध्ये जिवंत माशाचं कॉकटेल, सोशल मीडियावर संताप
काही दिवसांपूर्वीच संजय दत्तने त्याच्या मित्रासोबत 'अल्ता स्टेला' नावाचं रेस्टॉरंट-बार सुरू केलं होतं. जिवंत मासा असलेलं कॉकटेल या रेस्टॉरंटमध्ये दिलं जातं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. 'एबिसु कॉकटेल' नावाच्या या ड्रिंकमध्ये जिवंत मासा असतो आणि वरच्या बाजूला आग लावली जाते. 'अल्ता स्टेला' रेस्टॉरंटच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आलेल्या कॉकटेलच्या व्हिडीओमध्येही हे ड्रिंक दिसलं होतं.अनेकांनी कमेंट करत यावर आक्षेप घेतला आहे. याशिवाय 'अल्ता स्टेला' रेस्टॉरंटमध्ये डेकोरेशनसाठीही टेबलावर जिवंत मासे ठेवण्यात येत असल्याचं काहींनी म्हटलं आहे. यानंतर संजय दत्तच्या रेस्टॉरंट मेन्यूमधून 'एबिसु कॉकटेल' हे ड्रिंक काढून टाकण्यात आलं आहे.
आंतरराष्ट्रीय: इराणचा पूल उद्ध्वस्त; ट्रम्प यांचा इशारा: समझोता करा, अन्यथा गंभीर परिणाम.
ट्रम्प यांनी इराणमधील पुलावरील हल्ल्याचा व्हिडिओ जारी करत समझोत्याचा इशारा दिला. इराणने हल्ल्यांचा निषेध केला, तर इस्रायल आणि आखाती देशांवर क्षेपणास्त्रे डागली. तेलाच्या पुरवठा मार्गांवर तणाव वाढला.
व्यापार: OTP चं टेन्शन संपणार! SIM बदलताच बँक खातं होणार ब्लॉक
देशातील मोठ्या खाजगी बँका आणि टेलिकॉम कंपन्या आता वन-टाइम पासवर्ड (OTP) हटवण्याच्या तयारीत आहेत. त्याऐवजी दोन्ही मिळून एका 'सायलेंट ऑथेंटिकेशन मेकॅनिझम'वर काम करत आहेत. ही एक प्रकारची बॅकग्राउंड तपासणी आहे. याद्वारे तुमच्या मोबाईलमध्ये तेच सिम आहे का, जे तुमच्या बँक ॲपशी जोडलेलं आहे की नाही तपासण्याचं काम केलं जाईल.