
राष्ट्रीय: ADR रिपोर्ट: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले मंत्री अन् हजारो कोटींची संपत्ती
देशातील जवळपास ४७ टक्के (३०२) मंत्र्यांवर गुन्हेगारी प्रकरणे दाखल असून, त्यामध्ये खून, अपहरण आणि महिलांविरोधातील गुन्ह्यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे असा एडीआरचा रिपोर्ट समोर आला आहे. एडीआरने २७ राज्य विधानसभा, तीन केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील ६४३ मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केला. ७२ केंद्रीय मंत्र्यांपैकी २९ (४०%) मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. १९ मंत्र्यांवर गंभीर गुन्हे आहेत.

राष्ट्रीय: ब्रेकिंग: सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतिपदी, एनडीएचा मोठा विजय!
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतिपदी विजयी झाले, इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झाला आहे. राधाकृष्णन यांना ४५२ मते, तर रेड्डी यांना ३०० मते मिळाली. लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून ७८८ खासदार असतात. यापैकी ७ जागा रिक्त आहेत. तर १३ खासदारांनी मतदान केलेले नाही. एकूण ७८१ मतदान होणे अपेक्षित होते. परंतू, १३ मते पडलेली नाहीत.

आंतरराष्ट्रीय: नेपाळ: माजी पंतप्रधानांच्या पत्नीला आंदोलकांनी जिवंत जाळले....
नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात माजी पंतप्रधान झलनाथ खनाल, यांच्या पत्नी राजलक्ष्मी खनाल यांचा आंदोलकांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आंदोलकांनी राजलक्ष्मी यांना बेदम मारहाण करत, त्यांच्या घराला आग लावली होती.

भक्ती: पितृपक्ष संकष्टी: साखर चौथ गणपती स्थापना, विसर्जन कधी?
पितृपक्षात संकष्टी चतुर्थीला साखर चौथ गणपतीची स्थापना करतात. ज्यांना गणेशोत्सवात गणपती आणणे शक्य नसते, ते या दिवशी स्थापना करतात. हे गणपती दीड, पाच, अकरा किंवा एकवीस दिवस ठेवले जातात. चंद्रदर्शन झाल्यावर आरती होते, आणि नारळ-साखरेचे मोदक नैवेद्याला दाखवले जातात! या गणपतीच्या पूजेचे असतात खास नियम; कोणते ते जाणून घ्या.

राष्ट्रीय: उपराष्ट्रपती निवडणूक: कोण मारणार बाजी? मतमोजणी लवकरच!
संसदेत उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान झाले. एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत आहे. वायएसआरपीने एनडीएला पाठिंबा दर्शवला आहे. आज संध्याकाळपर्यंत निकाल अपेक्षित आहे. दोन्ही बाजू आपलाच उमेदवार जिंकणार असे दावे करत आहेत.

आंतरराष्ट्रीय: भारताच्या ४ शेजारील राष्ट्रांमधील 'सत्तापालट': योगायोग की षडयंत्र?
गेल्या काही वर्षांत भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये राजकीय अस्थिरता दिसून येत आहे. अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि आता नेपाळमध्ये सत्ता बदल झाले आहेत. हा निव्वळ योगायोग की यामागे मोठे षडयंत्र आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नेपाळमध्ये सोशल मिडिया बंदी, भ्रष्टाचार आणि घराणेशाही या विरोधात सोमवारी सुरू झालेल्या युवकांच्या आक्रमक आंदोलनानंतर ३० तासांनी पंतप्रधानांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले आहे.

सखी: सेल्फीमुळे ट्रोल झाली तरी खचली नाही, फोटो डिलीट करण्यास नकार!
झांबियातली एक वकील नाओमी पिलुलाने सेल्फी पोस्ट केली. पण तिचं रुप, नाक यामुळे ती ट्रोल झाली. 'मी जशी दिसते तशीच मला आवडते,' असं म्हणत नाओमीने फोटो डिलीट करण्यास नकार दिला. इतरांना आपण कसे दिसतो यावर आपण आपलं मोल ठरवणार का असा सवालही केला..

सखी: कोण म्हणतं भात खाणं आरोग्यासाठी घातक?
भारतीय आहारात भात महत्त्वाचा. योग्य भात, प्रमाणात खाल्ल्यास वजन, शुगर वाढत नाही. भात ऊर्जा देतो, पचनास हलका. हातसडीचा, ब्राऊन राईस उत्तम. पेज पौष्टिक! आहारतज्ज्ञ शीतल मोगल सांगतात भात खाण्याचे फायदे..

आंतरराष्ट्रीय: नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओलींचा राजीनामा
भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीच्या विरोधात नेपाळमध्ये तीव्र निदर्शने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राजधानी काठमांडूसह देशभरात हिंसक निदर्शने सुरू आहेत. अनेक शहरांमध्ये तरुणांकडून तोडफोड आणि जाळपोळ केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय: नेपाळमध्ये Gez Z आंदोलनाच्या केंद्रस्थानी आलेले बालेन शाह कोण आहेत?
काठमांडूचे महापौर बालेन शाह नेपाळमधील Gen Z आंदोलनाचे केंद्रस्थानी आले आहेत. तरुणाईमध्ये क्रेझ, सोशल मीडियावर प्रभाव असलेल्या बालेन शाह यांनी युवकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे ते आंदोलनकर्त्यांमध्ये नायक म्हणून पुढे आलेत. पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर, तरुणाईने बालेन शाह यांच्याकडे देशाचे नेतृत्व करण्याची मागणी केली आहे. बालेन यांची जीवनशैली, राहण्याची स्टाईल सर्वकाही तिथल्या युवकांसाठी एक रोल मॉडेल आहे.

सखी: मिल्कशेक: मेंदूसाठी 'विष'; धोक्याचा इशारा!
हेल्दी मिल्कशेकही मेंदूसाठी घातक! असं कुणी सांगितलं तर विश्वास ठेवाल का? पण हे खरं आहे. हाय फॅट्स पदार्थ रक्तदाबासाठी बरे नाहीत. विशेषत: वृद्धांनी जास्त काळजी घ्यावी. संतुलित आहार न घेता मिल्कशेक पिणं फार धाेक्याचं..

मुंबई: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता अप्रत्यक्षपणे फेटाळून लावली. उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवाजी पार्कवर होणाऱ्या पारंपरिक दसरा मेळाव्याचे निमंत्रण देण्याचे संकेत दिले होते.

आंतरराष्ट्रीय: नेपाळ सरकार संकटात: घटक पक्षानं पाठिंबा काढला, मंत्र्यांचे राजीनामे!
नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी विरोधात आंदोलन पेटले. सोमवारी हजारो युवक सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात आंदोलनकर्त्यांनी मंत्र्यांच्या घरांना लक्ष्य केले आहे. सत्ताधारी घटक पक्षाने पाठिंबा काढल्याने सरकार संकटात आले आहे. गृहमंत्र्यांसहित तीन मंत्र्यांचे राजीनामे! नेपाळी काँग्रेसने पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली.

सखी: लहान मुलांसाठी शेवग्याचं सूप अमृत, रोगप्रतिकारशक्ती वाढवतं..
लहान मुलांसाठी शेवग्याचं सूप म्हणजे अमृत! हे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि हाडं मजबूत करतं. शेवग्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. बनवायला सोपे, मुलांसाठी पौष्टिक रेसिपी!

महाराष्ट्र: दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना हादरा? शिंदेसेनेचा दावा, २ वगळता बाकी आमदार संपर्कात
दसरा मेळाव्यानंतर मुहूर्त काढून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला धक्का देण्याची तयारी शिंदेसेनेने केली आहे. शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी दावा करत ठाकरेंचे २ आमदार वगळता बाकी सर्व संपर्कात आहे. त्याशिवाय उरले सुरलेल्या नगरसेवकांपैकी ८० टक्के नगरसेवक आमच्याकडे येणार आहेत असं त्यांनी म्हटलं. मात्र जे आता धक्का देण्याचे भाष्य करतात त्यांचा आम्ही पराभव केलाय असा टोला संजय राऊतांनी लगावला.

आंतरराष्ट्रीय: ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत राडा! अर्थमंत्री अधिकाऱ्याला भिडले!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या एका डिनर पार्टीमध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये वादावादी होऊन प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. यावेळी ‘तू बाहेर चल तुझं तोंडच फोडतो’, अशी धमकी एका अधिकाऱ्याने दुसऱ्या अधिकाऱ्याला दिली. सेक्रेटरी ऑफ फायनान्स म्हणजेच अमेरिकेचे वित्तमंत्री स्कॉट बेसेन्ट आणि फेडरल हौसिंग फायनान्स एजन्सीचे डायरेक्टर बिल पुल्टे यांच्यात ही वादावादी झाली.

व्यापार: आयकर रिटर्न लवकर भरा, दंड टाळा! फक्त एक आठवडाच राहिला शिल्लक
लेट फाइलिंग आणि दंड टाळण्यासाठी आयटीआर भरण्यासाठी आता केवळ एक आठवड्याचा अवधी शिल्लक आहे. १५ सप्टेंबर यासाठी शेवटची तारीख आहे. जर आपण अजूनही रिटर्न भरला नसेल, तर लवकरात लवकर भरावा.

व्यापार: अमेरिकेच्या टॅरिफवर तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास भारताचा ठाम नकार
अमेरिकेने भारतीय मालावर लादलेल्या तब्बल ५० टक्के टॅरिफमुळे अडचणीत आलेल्या निर्यातदारांना मदत करण्यासाठी भारत सरकार एक पॅकेज देण्याची तयारी करत असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. भारताने शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र अमेरिकेसाठी खुले करण्यास नकार दिला.

क्रिकेट: रोहित शर्मा रुग्णालयात: व्हायरल व्हिडिओमुळे चाहते चिंतेत!
भारतीय कर्णधार रोहित शर्मा मुंबईतील रुग्णालयात जाताना दिसल्याने चाहते चिंतेत आहेत. फिटनेस चाचणी उत्तीर्ण केल्यानंतर रुग्णालयात जाण्याचे कारण काय, असा सवाल अनेकांच्या मनात येत आहे. रोहितच्या व्हिडीओमुळे तर्कवितर्क आणि काळजी वाढली आहे. रोहितच्या आरोग्याच्या अपडेटकडे चाहते डोळे लावून बसले आहेत.

छत्रपती संभाजीनगर: हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड
हैदराबाद संस्थानच्या गॅझेटियरनुसार मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी करा, अन्यथा १७ सप्टेंबर रोजी नारायणगडमधील दसरा मेळाव्यात आम्हाला भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला.

मुंबई: लोकांना वाटले माझी राख होतेय तेवढ्यात मी भरारी घेतली -देवेंद्र फडणवीस
मला दिलेल्या पुरस्काराचे नाव ‘फिनिक्स’ आहे. पण, मी काही राखेतून उभा राहिलेलो नाही. पण, अनेक वेळा लोकांना असे वाटले की माझी राख होतेय, तेवढ्यात मी भरारी घेतली. ही भरारी का घेऊ शकलो, कारण जेव्हा, जेव्हा राखेचा क्षण आला त्यातून मी सकारात्मकतेने पुढे गेलो, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे: केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; महाराष्ट्रातील ६० हजार शेतकऱ्यांना फटका
शेती नावावर असलेल्या शेतकऱ्याला ६ हजार रुपयांचा हप्ता दिला जात होता. मात्र, आता कुटुंबातील पती व पत्नीच्या नावावर शेती असली तरी केवळ पत्नीलाच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी पतीचे मानधन आता रोखले आहे. राज्यातील अशा ६० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला आहे.

राष्ट्रीय: आधार नागरिकत्वाचा नाही, ओळखीचा पुरावा; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश
बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणात (एसआयआर) मतदार ओळख सुनिश्चित करण्यासाठी आधार कार्ड १२ वे विहित कागदपत्र म्हणून समाविष्ट करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला दिले. सध्या बिहारमध्ये एसआयआरसाठी ११ विहित कागदपत्रे आहेत.

बीड: बीडमध्ये खळबळ: सरकारी वकिलानंतर आता डॉक्टरची आत्महत्या, कारण गुलदस्त्यात
बीड जिल्ह्यातील वडवणी येथे डॉ. शुभम यादव यांनी तलावात उडी मारून आत्महत्या केली. ते प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते. अवघ्या १५ दिवसांपूर्वी सरकारी वकिलांनीही आत्महत्या केली होती. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. - लोकमत

सखी: भारती सिंग सुंदर, लांबसडक, घनदाट केसांसाठी खास घरगुती तेलाचा वापर करते.
कॉमेडियन भारती सिंग केसांसाठी घरगुती तेल वापरते. मेथी, कढीपत्ता, खोबरेल तेल आणि कांद्याच्या रसापासून बनवलेले हे तेल केसांना मजबूत आणि घनदाट बनवते.

सखी: एनर्जी ड्रिंक्समुळे तरुणांना हार्ट ॲटॅकचा धोका; वेळीच सावध व्हा!
सतत एनर्जी ड्रिंक्स पिण्याच्या सवयीमुळे तरुणांना हार्ट ॲटॅक येण्याचा धोका वाढला आहे. या पेयांमुळे रक्तदाब आणि साखर वाढते, ज्यामुळे हृदय कमजोर होते.

राष्ट्रीय: उपराष्ट्रपती निवडणूक! विरोधकांसमोर आव्हान; क्रॉस व्होटिंग कुणाचा 'गेम' करणार?
उपराष्ट्रपती निवडणुकीत संख्याबळानुसार, एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांचे पारडे जड दिसत आहे. विरोधकांकडे संख्याबळ कमी असले तरी, क्रॉस व्होटिंगमुळे निकालात ट्विस्ट येऊ शकतो. काही खासदारांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने निवडणुकीत अनपेक्षित 'गेम' होण्याची शक्यता आहे. सध्या लोकसभेत ५४२ तर राज्यसभेत २३९ खासदार आहेत परंतु बीजेडी, बीआरएस खासदारांनी तटस्थ भूमिका घेतल्याने विजयी उमेदवाराला जिंकण्यासाठी ३८६ खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

सखी: गॅसची चिमणी काळीकुट्ट- तेलकट झाली? पांढरी पावडर करेल जादू- मिनिटांत होई साफ
स्वयंपाकघरातील तेलकट, काळी चिमणी साफ करणे कठीण आहे. डिशवॉश लिक्विडऐवजी वापरा हा पांढरा पदार्थ, ज्यामुळे चिमणी सहज स्वच्छ होईल आणि आरोग्य देखील नीट राहिल.

बीड: हैदराबाद गॅझेटिअरचा GR वाचवण्यासाठी याचिका; न्यायालयात कॅव्हेट दाखल
मराठा आरक्षणासाठी २ सप्टेंबरचा GR वाचवण्यासाठी गंगाधर काळकुटे यांनी सर्वोच्च, उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले. GR विरोधात याचिका दाखल झाल्यास, सुनावणीपूर्वी चर्चा व्हावी, जरांगेंची भूमिका जाणून घ्यावी, अशी मागणी आहे. ॲड. कैलास मोरे वकील आहेत. सरकारने बाजू मांडावी, GR टिकावा, अशी जरांगेंची अपेक्षा आहे.

सखी: लहान मुलांचा चष्मा घालवण्यासाठी प्रभावी सवयी आणि उपाय
लहान वयात लागलेला चष्मा घालवण्यासाठी जीवनशैलीत बदल, योग्य आहार, नियमित व्यायाम महत्त्वाचे आहेत. डोळ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्याच आणि घरी करा हे उपाय.

जालना: अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचे जल्लोषात स्वागत; फुलांचा वर्षाव, गुलालाची उधळण
मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे दाखल झाले, तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांनी मराठा एकतेचे कौतुक केले आणि महिलांच्या त्यागाला नमन केले. मराठ्यांनी आरक्षणाची लढाई जिंकली असून मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा 100% लाभ मिळेल, असे जरांगे म्हणाले. लवकरच विजय मेळावा होणार!