
जालना: मनोज जरांगेंच्या मुंबई मोर्चाला जालना पोलिसांची 40 अटींसह परवानगी!
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या मुंबई मोर्चाला जालना पोलिसांनी 40 अटींसह परवानगी दिली. सुरक्षेसाठी ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार. शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन.

राष्ट्रीय: GST सुधारणांना विरोधकांचा पाठिंबा, पण 'या' आहेत महत्वाच्या मागण्या!
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना आठ विरोधी पक्षांच्या राज्यांचा पाठिंबा आहे. मात्र, GST दर कपातीचा फायदा ग्राहकांना मिळावा, राज्यांना नुकसान भरपाई मिळावी, 'पाप' वस्तूंवरील शुल्क राज्यांना मिळावे, अशा महत्वाच्या मागण्या विरोधकांनी केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय: क्वाड परिषदेसाठी ट्रम्प भारतात येणार?
वर्षाच्या अखेरीस भारतात क्वाड शिखर परिषदेचे आयोजन होत आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या परिषदेत सहभागी होणार नाहीत, असा दावा द न्यू यॉर्क टाईम्सने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यातील संबंध कसे बिघडले, याची सविस्तर माहितीही त्यात देण्यात आली आहे.

मुंबई: ब्रेकिंग: मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाला मुदतवाढ
मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचे आंदोलन मुंबईत सुरू आहे. आझाद मैदानावर आंदोलनाला आणखी एक दिवसाची परवानगी मिळाली आहे.राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय: 'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात ते म्हणताना दिसत आहे की, पाकिस्तानात जो पूर आला आहे, तो भारताने धरणांमधून पाणी सोडल्यामुळे आला आहे. पण, मूळात डोनाल्ड ट्रम्प असं बोललेच नाहीत. मूळ व्हिडीओसोबत छेडछाड करून हा डीपफेक व्हिडीओ बनवण्यात आला आहे.

मुंबई: मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनात लातूरच्या विजय घोगरे या मराठा तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते आंदोलनात सहभागी झाले होते.

महाराष्ट्र: अमित शाहांच्या विमानात बिघाड; एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानात शनिवारी(दि.30) अचानक तांत्रिक बिघाड झाला. गृहमंत्री शाह दोन दिवसांचा मुंबई दौरा आटोपून गुजरातला रवाना होत असताना ही घटना घडली. विमानातील तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने पुढे आले अन् गृहमंत्र्यांना त्यांचे विमान उपलब्ध करून दिले.

मुंबई: मनोज जरांगेंना अटक करा, सदावर्तेंचा हल्लाबोल, पवार-ठाकरेंवरही संतापले
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्ला चढवला, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले. सदावर्ते यांनी जरांगे यांचे हे आंदोलन फक्त आंदोलन नसून पवित्र आझाद मैदानाला लांच्छन लावणारे आहे अशी टीका केली. त्याशिवाय अत्यंत खालच्या शब्दात जरांगे यांनी धनगर समाजाबाबत अपशब्द वापरले. जरांगेंची भाषा गावगड्याची नसून नीचपणाची आणि मुजोरपणाची आहे. त्यांना अटक करा अशी मागणी केली

राष्ट्रीय: 'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर ठोकला दावा
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या 'मतदार यात्रे'निमित्ताने बिहारचा दौरा करत आहेत. राजद नेते तेजस्वी यादवदेखील त्यांच्यासोबत आहेत. दरम्यान, शनिवारी(दि.३०) ही यात्रा आरा येथे मतदार हक्क यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात तेजस्वी यादव यांनी राहुल गांधींसमोर स्वतःला महाआघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केले.

राष्ट्रीय: जम्मू-काश्मीर भूस्खलन: आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात भूस्खलनात एकाच कुटुंबातील ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये आई-वडील आणि त्यांच्या ५ मुलांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील सात जणांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्र: सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी, जरांगे पाटील संतापले; उपोषण सुरूच राहणार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. न्या. शिंदे हे जरांगेंसोबत चर्चेसाठी उपोषणस्थळी पोहचले होते. मात्र सरकारसोबतची ही पहिली बैठक निष्फळ ठरली. 'मराठा आणि कुणबी एकच' असा GR काढा, अन्यथा उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. आम्हाला ६ महिन्याचा वेळ द्या, प्रक्रियेसाठी वेळ लागेल तो द्यावा अशी मागणी शिंदे समितीने केली होती

नागपूर: नागपूर: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!
एकतर्फी प्रेमात आंधळ्या झालेल्या अल्पवयीन नराधमाने एंजेलची भररस्त्यात हत्या केली. बेसावध क्षणी तिला भर रस्त्यावर गाठत त्याने तिची हत्या केली. एंजेल जॉन या दहावीतील विद्यार्थिनीला शुक्रवारी (२९ ऑगस्ट) सकाळी तिच्या आईने तिला शाळेत सोडले. मात्र, दुपारी तिला घ्यायला जाणे कुणालाही जमले नाही. आणि आरोपीने एंजेलला गाठलं.

आंतरराष्ट्रीय: ...अन् ट्रम्प यांचा प्लॅन फसला; भारत-अमेरिका संबंध का ताणले? मोठा खुलासा
न्यूयॉर्क टाइम्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कॉलवरून ३५ मिनिटे संवाद साधत मोदींकडे स्वत:ला नोबेल पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यास सांगितले, पण मोदींनी नकार दिला. ट्रम्प यांचा भारत-पाक युद्धविरामचा दावा आणि मुनीर यांच्या भेटीचा प्लॅनही फसला, ज्यामुळे भारत-अमेरिका संबंध बिघडले. १७ जून रोजी झालेल्या कॉलनंतर भारत अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले. १२ हून अधिकाऱ्यांच्या हवाल्याने NYT ने हा दावा केला आहे.

राष्ट्रीय: 'आंतरराष्ट्रीय संबंधात कोणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो'-राजनाथ सिंह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण शिखर परिषदेदरम्यान मोठे वक्तव्य केले आहे. राजनाथ सिंह म्हणाले की, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, फक्त कायमचा हितसंबंध असतो. राजनाथ यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये टॅरिफच्या मुद्द्यावरुन तणाव वाढला आहे. तसेच, भारत-चीन संबंध सुधारत आहेत.

मुंबई: सरकारची शिंदे समिती मनोज जरांगेंच्या भेटीला, आझाद मैदानातच चर्चा
आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मैदानात आंदोलकांची गर्दी वाढत असून, शनिवारी (३० ऑगस्ट) सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी समिती सदस्यांसह मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी जरांगेंसोबत त्यांची चर्चा झाली. राज्य सरकारने शिंदे समितीची स्थापन केली होती. मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम शिंदे समिती करत आहे.

अहिल्यानगर: "...तसं झाल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न निश्चित सुटेल", शरद पवारांचे केंद्राकडे बोट
"शेतकरी व सैन्यात कार्यरत असलेल्या समाजघटकांसमोर हा प्रश्न गंभीरपणे उभा आहे. संसदेत जर याबाबत निर्णय घ्यायचा असेल, तर केंद्र सरकारची स्वच्छ व न्यायाची भूमिका असली पाहिजे. तसे झाल्यास आरक्षणाचा प्रश्न निश्चित सुटेल,” अशी भूमिका शरद पवार यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर मांडली. अहिल्यानगरमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.

राष्ट्रीय: जम्मू-काश्मीर: दहशतवाद्यांना मदत करणारा 'समंदर चाचा' चकमकीत ठार
जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांच्या जगात 'ह्यूमन GPS म्हणून ओळखला जाणारा बागू खान उर्फ 'समंदर चाचा' मारला गेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समंदर चाचासह आणखी एक पाकिस्तानी घुसखोरही ठार झाला आहे.

सखी: गवारच्या भाजीला मुरडू नका नाक!
गवारच्या शेंगा पौष्टिक! वजन घटवण्यासाठी, हाडे बळकट करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी उत्तम. नाव गवार असलं तरी भाजी मात्र आहे अत्यंत गुणकारी, आरोग्यदायी फायदे अनेक.

महाराष्ट्र: "मराठा आरक्षणावर तेच उत्तर देऊ शकतात"; राज ठाकरेंचे एकनाथ शिंदेंकडे बोट
मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनावरून मनसे प्रमुख राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवले आहे. मागे नवी मुंबईत एकनाथ शिंदे यांनी जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला होता. मग आता या लोकांना मुंबईत का यावे लागले याचे उत्तर एकनाथ शिंदे देऊ शकतात. मराठा आरक्षणावरील सगळ्या प्रश्नांची उत्तरे तेच देतील असं सांगत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत सूचक विधान केले

मुंबई: "मला मारलं, यांच्याकडे हत्यारं"; मराठा आंदोलनात गोंधळ घालणाऱ्याला पकडले
मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनावेळी एक व्यक्ती आंदोलकांमध्ये घुसला. डोक्याला पट्टी आणि लाल रंग लावून आलेल्या व्यक्ती यांनी 'मला मारलं, यांच्याकडे हत्यारं आहेत', असं म्हणून ओरडू लागला. त्याला आंदोलकांनी पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. याचा व्हिडीओ शेअर करत आंदोलकांनी सावध राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र: जरांगे शरद पवारांचा 'सुसाईड बॉम्ब'; भाजप आमदार केनेकरांचा खळबळजनक आरोप
मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचा 'सुसाईड बॉम्ब' आहेत, असा आरोप भाजप आमदार संजय केनेकरांनी केला. व्यक्तिगत द्वेषापोटी पवारांनी हा बॉम्ब देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडला आहे. परंतु निश्चित हे बुमरँग होणार असून त्यातून समाजाचे नुकसान शरद पवार करत आहेत. हा सुसाईड बॉम्ब समाजाला घेऊन नुकसान पोहचवणारा आहे. त्यामुळे निश्चित याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील असं त्यांनी म्हटलं.

क्राइम: दिल्ली: भाविकांचं राक्षसी कृत्य! मंदिरातच देवीचा सेवेकऱ्याची हत्या, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
दिल्लीतील कालकाजी येथील कालका देवी मंदिरामध्ये एका ३५ वर्षीय सेवेकऱ्याची लाठ्यांनी मारहाण करत हत्या करण्यात आली. शुक्रवारी (२९ ऑगस्ट) रात्री ९.३० वाजता ही घटना घडली. योगेंद्र सिंह असे मृत्यू झालेल्या सेवेकऱ्याचे नाव असून, या प्रकरणात पोलिसांनी अतुल पांडे या एका आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आंतरराष्ट्रीय: अमेरिकेचा आणखी एक निर्णय! भारताला झटका बसण्याची शक्यता, कारण...
अमेरिकेने सोलर पॅनल आयातीवर चौकशी सुरू केल्याने भारताला मोठा झटका बसू शकतो. १.६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक धोक्यात येण्याची शक्यता आहे, कारण अमेरिका भारताकडून आयातित सोलर पॅनेलवर टॅरिफ लावू शकते. यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध बिघडण्याची शक्यता आहे. अमेरिका भारत, लाओस, इंडोनेशिया येथून सोलर पॅनल आयात करतो. चिनी कंपन्या या देशांचा वापर करून अमेरिकन बाजारात दबदबा वाढवत असल्याचा आरोप आहे.

सखी: कोल्ड्रिंकने काळी भांडी करा स्वच्छ, कढई-तवा लख्ख!
जळालेली कढई, तवा स्वच्छ करण्यासाठी कोल्ड्रिंक, लिंबू, सोडा, मीठ, व्हिनेगर मिक्स करा. २० मिनिटांनी धुवा आणि भांडी चमकवा!

सखी: सतत चिडचिड, विसरभोळेपणा? कोणत्या डेफिशियन्सीची लक्षणं..
शरीरासाठी लिथिअम आवश्यक आहे. कमतरतेमुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचण, मूड स्विंग, चिंता, झोप न लागणे आणि थकवा जाणवतो. धान्य, बटाटे, टोमॅटो आणि चहातून लिथिअम मिळवा आणि निरोगी राहा!

मुंबई: मनोज जरांगेंच्या आंदोलनादरम्यान, मराठा आरक्षणावरील राज्य सरकारचा पहिला निर्णय
एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु असताना, राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र सहज मिळवण्यासाठी तहसील स्तरावरील समित्यांना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता जात प्रमाणपत्र अधिक सोयीस्कर पद्धतीने मिळू शकणार नाही.

फिल्मी: मनोज जरांगे पाटलांना रितेश देशमुखचा पाठिंबा
मराठा समाजाच्या आंदोलनाला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने पाठिंबा दिला आहे. रितेशने X अकाऊंटवरुन मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी ट्वीट केलं आहे. सरकारने लवकरच तोडगा काढावा. मराठा समाजाला न्याय मिळावा, असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

सखी: रोज तासंतास चालूनही पोट कमी का होत नाही?
चुकीचा आहार, ताण, कमी हालचाल आणि प्रोसेस्ड फूडमुळे पोटावरची चरबी वाढते. आनुवंशिकता हे देखील एक कारण असू शकतं.त्यामुळे केवळ चालून पोट कमी होत नाही, अन्य काही उपाय आवश्यक आहेत.

आंतरराष्ट्रीय: ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयाने टॅरिफ निर्णय ठरवला अवैध
अमेरिकेच्या न्यायालयाने ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला अवैध ठरवले. ट्रम्प यांनी या निर्णयाला पक्षपाती म्हणत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. टॅरिफ रद्द करणे देशासाठी आपत्ती ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 'मेड इन अमेरिका'साठी टॅरिफ महत्वाचे असल्याचेही ट्रम्प म्हणाले आहेत.

क्रिकेट: व्हिडिओ: नितीश राणा आणि दिग्वेश राठी यांच्यात जोरदार राडा, प्रकरण गंभीर!
दिल्ली प्रीमियर लीगमध्ये नितीश राणाने ४२ चेंडूत शतक ठोकले. यावेळी त्याने दिग्वेश राठीच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार मारले. त्यानंतर या दोघांच्यात वाद सुरू झाला. हा वाद खूपच वाढला. प्रकरण हाणामारीपर्यंत जाण्याची वेळ आली होती. राणाने बॅट दाखवून दिग्वेशला धमकीही दिली. अखेर खेळाडू आणि पंचांनी प्रकरण शांत केले.

सखी: बापरे! महिलेला प्रत्येक चेहऱ्यात राक्षस दिसायचे; धक्कादायक कारण!
नेदरलँडमधील एका महिलेला 52 वर्षे लोकांच्या चेहऱ्यात राक्षस दिसायचे. तिला Prosopometamorphopsia नावाचा दुर्मिळ मानसिक आजार होता. हा आजार जरा अजबच असतो त्यामुळे असे चित्रविचित्र आकारही दिसतात.