
क्रिकेट: 'मिस्टर डिपेंडेबल' चेतेश्वर पुजारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
अनुभवी भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने आज सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे.

राष्ट्रीय: सर्व भारतीयांचा DNA एकच; मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
मोहन भागवत म्हणतात, जेव्हा आपण हिंदू राष्ट्राबद्दल बोलतो, तेव्हा लोक प्रश्न उपस्थित करतात. आपला देश आधीपासून अस्तित्वात आहे. हिंदू हा शब्द काढून टाकला, तरी देशाचा विचार केला पाहिजे. आपण हिंदू राष्ट्र म्हटले, तर आपण कोणाला तरी सोडून जात आहोत, ते योग्य नाही. आपण कोणाच्याही विरोधात नाही.

राष्ट्रीय: ट्रम्प यांचे ४ फोन, PM मोदींचा बोलण्यास नकार: जर्मन वृत्तपत्राचा दावा
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५०% कर लावल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले आहेत. अशातच, एका जर्मन वृत्तपत्राने दावा केला आहे की, ट्रम्प यांनी टॅरिफ वादादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना चार वेळा फोन केला, परंतु पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला.

नागपूर: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा, मुसळधार बरसणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून, २७ ऑगस्टपासून विदर्भात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस विदर्भातील सर्व जिल्हे पावसाने व्यापले जातील. बुधवारी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय: वैष्णोदेवी यात्रेत भूस्खलन: ५ भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी; यात्रा स्थगित
माता वैष्णोदेवी यात्रा मार्गावर आज(दि.२६) भूस्खलनाची घटना घडली आहे. अर्धकुंवारीजवळ घडलेल्या घटनेत ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कटरा येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. बचाव कार्य सुरू असून, मार्गावरील इतर भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.

आंतरराष्ट्रीय: चीनमध्ये SCO शिखर बैठक: २० देशांचे प्रमुख नेते हजर राहणार, अमेरिकेला आव्हान?
चीनमधील SCO शिखर बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह २० देशांचे प्रमुख नेते एकत्रित येणार आहेत. यात ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांना प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे. मोदी आणि पुतिन यांच्या उपस्थितीने अमेरिकेवर दबाव वाढेल. संमेलनातील सदस्य देश संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी करतील, ज्यात सुरक्षा आणि आर्थिक सहकार्यावर भर दिला जाईल. हे शिखर संमेलन अमेरिकेच्या विरोधात एक मजबूत आघाडीचं चित्र जगाला दिसणार आहे.

राष्ट्रीय: वडोद्यात गणेश मूर्तीवर अंडी फेकली; चौघे ताब्यात
गुजरातमधील बडोदा शहरात पवित्र गणेश चतुर्थी सणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. येथील पाणीगेट परिसरात काल (२५ ऑगस्ट) रात्री ३ वाजता निर्मल पार्क युथ क्लबने स्थापन केलेल्या गणपतीच्या मूर्तीवर समाजकंटकांनी अंडी फेकल्याची घटना घडली आहे. शहर पोलिस ठाण्याचे पीआय राजेंद्र चौहान यांनी सांगितले की, सध्या चौकशी सुरू असून, चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्र: जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनास मनाई; हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते यांचा टोला
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान आंदोलनाला हायकोर्टाने मनाई केली आहे. सदावर्ते यांनी निर्णयाचे स्वागत केले तर जरांगे यांनी न्यायालयात बाजू मांडण्याची तयारी दर्शवली आहे. जरांगेंचे आंदोलन राजकीय आहे. त्यांचे आंदोलन मराठा समाजाची दिशाभूल करणारे आहे. आझाद मैदानातील आंदोलनाच्या संहिता सगळ्यांना लागू आहे. न्यायालयापेक्षा कुणी मोठे नाही. जर न्यायालयाचा अवमान केला तर ६ महिने जेलमध्ये राहावे लागेल असं सदावर्ते म्हणाले.

जालना: उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे मुंबईत येण्यावर ठाम
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलनावर ठाम आहेत. उच्च न्यायालयाने गणेशोत्सवामुळे आझाद मैदानावरील परवानगी नाकारली तरी, जरांगे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यावर ठाम आहेत. आमचे वकील या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागतील. न्यायदेवता नक्कीच न्याय देईल, असे जरांगे म्हणाले.

राष्ट्रीय: जम्मूच्या डोडा येथे ढगफुटी; चार जणांचा मृत्यू, अनेक घरं वाहून गेली!
जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील थाथरी उपविभागात ढगफुटी झाली आहे. यामुळे १० हून अधिक घरे वाहून गेली आहेत. ढगफुटीमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. कालपासून आलेल्या पूरपरिस्थितीमुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या बाधित भागात मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय: चीनमध्ये मोदी, पुतिन, जिनपिंग यांचे शक्तीप्रदर्शन; अमेरिकेला झोंबणार!
चीनच्या होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत २० देशांचे प्रमुख एका व्यासपीठावर एकत्र येतील. यामध्ये पंतप्रधान मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंग यांच्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. हे दिग्गज एकत्र आल्यानंतर ट्रम्प यांची झोप नक्कीच उडे.

जालना: जरांगे ठाम! 'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; OSD सोबत चर्चा निष्फळ
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील २७ ऑगस्टला मुंबईकडे मोर्चा काढणार; मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींसोबत चर्चा निष्फळ! 'आजच अंमलबजावणी करा', जरांगेंची मागणी, तर 'निरोप पोहोचवतो' असं ओएसडी म्हणाले.

राष्ट्रीय: मेड इन इंडिया 'ई-विटारा' १०० देशांमध्ये विकली जाणार
पंतप्रधान मोदींनी मारुती सुझुकीच्या ई-विटारा कारला हिरवा झेंडा दाखवला. ही मेड इन इंडिया इलेक्ट्रिक कार १०० देशांना निर्यात होणार आहे. हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल आहे, जे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करेल, असे पंतप्रधान मोदी या कारच्या अनावरण प्रसंगी म्हणाले.

अन्य क्रीडा: शर्वरी शेंडेंचा तिरंदाजीत इतिहास! देशासाठी सुवर्णपदक जिंकले
महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेने कॅनडामध्ये युवा जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. राज्याचे क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शर्वरीचे अभिनंदन केले.

व्यापार: दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST घटणार, कर सुधारणा लवकरच!
दिवाळीपूर्वी सरकार मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. दिल्लीत झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत १२% आणि २८% जीएसटी स्लॅब रद्द करण्याच्या केंद्राच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. GST च्या दोनच दरांचा (५% आणि १८%) प्रस्ताव आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक वस्तू आणि सेवा स्वस्त होण्याची शक्यता आहे.

पुणे: पुणे: अनर्थ टळला! बसचालकाला ह्रदयविकाराचा झटका, पण पोलिसांनी वाचवले जीव
पुण्यातील लक्ष्मी रोडवर पीएमपीएल बसचा मोठा अपघात थोडक्यात टळला. सोमवारी रात्री बस रस्त्यावरून जात असताना चालकाला ह्रदयविकाराचा झटका आला. वाहतूक पोलीस वेळीच धावून आले. त्यांनी बस चालकाला तातडीने सीपीआर दिला आणि रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे चालकाबरोबर इतरांचेही जीव वाचले आणि अनर्थ टळला.

अन्य क्रीडा: नीरज चोप्रा डायमंड लीगच्या अंतिम फेरीत!
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा हा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकूण ७ खेळाडूंमध्ये नीरजचा समावेश झाला आहे, ज्यात एड्रियन मार्डारे (मोल्डोव्हा), अँडरसन पीटर्स (ग्रेनेडा – गतविजेता), केशॉर्न वॉलकॉट (त्रिनिदाद आणि टोबॅगो), ज्युलियन वेबर (जर्मनी), ज्युलियस येगो (केनिया) आणि सायमन वाईलँड (स्वित्झर्लंड) यांचा समावेश आहे.

फिल्मी: पल्लवी जोशीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
मराठी अभिनेत्री पल्लवी जोशीला वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. एका टीव्ही प्रोजेक्टमध्ये तिला कास्ट करण्यात आलं असता एका सीनिअर व्यक्तीने कमेंट करत 'तिला घेऊ नको, ती काळी आहे...' असे म्हटले होते.

राष्ट्रीय: ट्रम्प यांचा हट्टीपणा, अमेरिकेकडून २५% अतिरिक्त शुल्क; भारताचा ४ पर्यायांवर विचार
ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा भारतावर परिणाम. रशियाकडून तेल खरेदीवर अमेरिका नाराज. अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफला तोंड देण्यासाठी भारतानेही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकार ४ पर्यायांवर विचार करत आहे. त्यात नवीन बाजारपेठ शोधणे, रशियाशी व्यापार वाढवणे, अमेरिकन आयात वस्तूंवर टॅरिफ वाढवणे, स्थानिक उद्योगांना मदत करणे यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या टॅरिफ हल्ल्यावर पलटवार करण्याचा भारताचा प्रयत्न सुरू आहे.

राष्ट्रीय: आप नेत्याच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे
रुग्णालय बांधकाम घोटाळ्याप्रकरणी आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या निवासस्थानासह एकूण १३ ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत.

क्राइम: नांदेड हादरलं: विवाहित मुलीसह प्रियकराची पित्याने विहिरीत ढकलून केली हत्या
नांदेडमध्ये क्रूर 'ऑनर किलिंग'! पित्याने विवाहित मुलगी व तिच्या प्रियकराला विहिरीत ढकलून मारले. प्रेमसंबंधांमुळे हे भयंकर कृत्य. पोलीस तपास सुरू.

व्यापार: बँकिंग-फायनान्स क्षेत्रात मोठी भरती: २.५ लाख नोकऱ्या, लहान शहरांवर लक्ष
बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात २०३० पर्यंत २.५ लाख नोकऱ्यां निर्माण होण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय बाब म्हणजेय यापैकी ४८ टक्के रोजगाराच्या संधी ह्या लहान शहरांमध्ये निर्माण होणार आहेत. ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट तज्ञांची मागणी वाढली असून, त्यांना चांगला पगार मिळू शकतो. स्थानिक भाषेचे ज्ञान आणि प्रत्यक्ष विक्रीचा अनुभव असलेल्यांना नोकरीची शक्यता २.५ पट जास्त आहे.

आंतरराष्ट्रीय: भारताशी जवळीक वाढल्याने ट्रम्प यांची चीनला धमकी!
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला धमकी दिली आहे की त्यांनी काही 'पत्ते' खेळल्यास चीन उद्ध्वस्त होईल. भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या जवळीकीमुळे ट्रम्प चिंतित आहेत. चीनने अमेरिकेला आवश्यक मॅग्नेट दिले पाहिजेत, अन्यथा २०० टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जाईल, असेही ट्रम्प म्हणाले.

महाराष्ट्र: दोन दिवसात निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू: मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून, मागण्या मान्य न झाल्यास २७ ऑगस्टला मुंबईत धडकणार, असा इशारा त्यांनी दिला आहे. सरकारने दोन दिवसात निर्णय घ्यावा, अन्यथा माघार घेणार नाही. तसेच मुंबईत आंदोलकांवर कारवाई झाल्यास सरकार उलथवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

राष्ट्रीय: २६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन थांबले, छाननी सुरू
विविध कारणांनी अपात्र ठरलेल्या २६ लाख ३४ हजार लाडक्या बहिणींचे मानधन आता रोखण्यात आले आहे. या सर्व जणींच्या प्रकरणांची छाननी करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र २.२९ कोटी पात्र बहिणींन मानधनाचा लाभ मिळत राहील.

राष्ट्रीय: २९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल
स्त्यांवर प्रचंड खड्डे पडले असतानाही राष्ट्रीय महामार्गांवर टोलवसुली सुरू असल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) नुकतेच फटकारले आहे. गेल्या पाच वर्षांत झालेले अपघात आणि टोल नाक्यांवरील वादामुळे चिंता निर्माण झाली असून, यावर कोर्टाने कारवाईची मागणी केली आहे.

राष्ट्रीय: कितीही दबाव टाका, आम्ही..; ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
अहमदाबादमधील कार्यक्रमात ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर भाष्य करताना पीएम मोदी म्हणाले, आमच्यासाठी शेतकरी, पशुपालक, लघुउद्योजक महत्त्वाचे आहे. अमेरिकेने कितीही दबाव टाकला तरी, आम्ही आमची ताकत वाढवण्याचे काम करत राहू. आमच्यासाठी देशातील शेतकरी आणि पशुपालकांचे हित सरकारसाठी सर्वोपरी आहे.

महाराष्ट्र: मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकरांनी नितेश राणेंसोबतच्या भेटीबद्दल सोडलं मौन
वैभव खेडेकर यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली. पक्षाकडून अचानक करण्यात आलेल्या कारवाईनंतर खेडेकर यांनी भूमिका मांडली. भाजपमध्ये जाण्याचा कोणताही विचार नव्हता. नितेश राणेंची भेट एका कार्यकर्त्यावरील तडीपारीची कारवाई थांबवण्यासाठी घेतली होती, असे खेडेकर म्हणाले.

राष्ट्रीय: कार चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने क्रिकेटरचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये रस्ते अपघातात क्रिकेटर फरीद हुसेनचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका कार चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने फरीदची स्कूटर धडकली. फरीदला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना पूंछ जिल्ह्यात घडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आंतरराष्ट्रीय: भारताने मोठे मन दाखवत पाकिस्तानला दिला पुराचा इशारा
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले, मात्र आता पाकिस्तानमधील नागरिकांसाठी भारताने मोठे पाऊल उचलले आहे. भारताने जम्मू-काश्मीरमधील संभाव्य पुराबाबत पाकिस्तानला माहिती दिली आणि सतर्क केले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही माहिती पूर्णपणे मानवतेच्या आधारावर शेअर करण्यात आली आहे.

क्रिकेट: ५०० विकेट्स अन् ७००० धावांसह शाकिब अल हसनचा विश्वविक्रम
शाकिब अल हसनने टी २० मध्ये ५०० विकेट्स आणि ७००० धावांसह विश्व विक्रमाला गवसणी घालत इतिहास रचला आहे. कॅरेबियन लीगमध्ये त्याने ५०० विकेट्सचा टप्पा पार केला.