
व्यापार: जीएसटी दरांमध्ये बदल: फक्त कारच नव्हे, १७५ वस्तू स्वस्त होणार!
जीएसटी परिषदेच्या बैठकीत १७५ वस्तू स्वस्त होणार, एसी, टीव्ही, सिमेंटच्या किमती घटणार आहेत. दिवाळीपूर्वी हायब्रीड कार, स्कूटरवरील जीएसटी कमी होणार, तर कार्बोनेटेड पेये, तंबाखू महागणार आहेत. या जीएसटी कपातीचा खरा फायदा हा टोयोटा, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या कंपन्यांना होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दर २८% वरून १८% पर्यंत कमी होऊ शकतात. एवढेच नाही तर मोटरसायकल, स्कूटरवरील जीएसटी देखील कमी होणार आहे.

व्यापार: शेतकऱ्यांची दिवाळी! GST कपातीमुळे काय फायदा? वाचा!
जीएसटी परिषदेने कृषी उपकरणे, ट्रॅक्टर पार्ट्स, खते व कीटकनाशकांवरील जीएसटी दर कमी केले. ट्रॅक्टर व कृषी यंत्रांवरील जीएसटी १२% वरून ५% पर्यंत घटवला. खते आणि कीटकनाशके स्वस्त होणार आहेत. शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. ट्रॅक्टरच्या स्पेअर पार्ट्ससह टायर, ट्यूब आदींवरही पैसे वाचणार आहेत.

व्यापार: GST परिषदेकडून मोठी घोषणा! १२% आणि २८% स्लॅब रद्द
सर्व वस्तू आता ५% व १८% स्लॅबमध्ये. आलिशान गाड्या, फास्ट फूड महागणार. विमा, घरे, औषधे स्वस्त होणार आहेत. आज जीएसटी परिषदेची बैठक सुरु होती. पहिल्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. वैयक्तिक विमा पॉलिसी आणि आरोग्य विमा पॉलिसी जीएसटीमुक्त करण्यात आल्या आहेत. मोठी यादीच देण्यात आली आहे.

महाराष्ट्र: आता कारखान्यात १२ तास काम, पण...: कामगारांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
कारखान्यांमधील कामगारांच्या काम करण्याची मर्यादा ९ तासांवरून १२ तास करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. कामगारांना एका आठवड्यात जास्तीतजास्त ४८ तासच काम देता येते. ही मर्यादा कायम राहणार आहे. आधी दररोजच्या कामाच्या तासांची मर्यादा ही नऊ तास इतकी होती. आता ती १२ तास करताना ८ तासांपेक्षा कितीही जास्तीचे काम करवून घेतले तर कामगारांना ओव्हरटाइमचे पैसे द्यावे लागतील.

राष्ट्रीय: दिल्लीत यमुनेचे मदत छावण्यांमध्ये पाणी, 2013 चा उच्चांक मोडला
दिल्लीत यमुना नदी धोक्याच्या पातळीवर! 2013 चा विक्रम मोडला. पुरग्रस्तांच्या मदत छावण्यांमध्ये पाणी शिरल्याने स्थलांतर. वझिराबाद आणि ओखला बॅरेजमधून जर जास्त पाणी सोडले गेले तर दिल्लीत हाहाकार उडण्याची शक्यता आहे. रात्री ८ नंतरही पाण्याची पातळी वाढू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. यमुनेतील पाण्याचा प्रवाह वेगाने वाढला असून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्र: भुजबळ यांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन: तात्पुरते उपोषण, आंदोलन थांबवा, कारण...
मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने एक जीआर जाहीर केला आहे. या शासन निर्णयात काही वाक्ये, शब्द याबद्दल संभ्रम आहे. मी इतर ओबीसी नेत्यांशी चर्चा करत आहे. अनेक कायदेतज्ज्ञ, वकील यांना ही कागदपत्रे देऊन याबाबत जो काही संभ्रम आहे त्याबद्दल त्यांची मते जाणून घेत आहोत. आवश्यक असल्यास निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करून कदाचित सोमवारी, मंगळवारपर्यंत हायकोर्टात जाण्याची आमची तयारी आहे असं भुजबळांनी सांगितले.

महाराष्ट्र: देशात राजकीय भूकंप येणार? 'हायड्रोजन बॉम्ब'नंतर २ बड्या नेत्यांचे दावे
बिहारमधील यात्रेत राहुल गांधींनी 'हायड्रोजन बॉम्ब'चा उल्लेख करत सरकारला इशारा दिला. त्यानंतर संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे. पुढील काही महिन्यात राजकीय बदल होतील असं त्यांनी म्हटलं. त्याशिवाय महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही नागपूर कामठीत बोलताना देशात मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत देत भाजपवर निशाणा साधला. या दोन्ही नेत्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

आंतरराष्ट्रीय: निर्बंधांचा फटका: सौदी अरेबियाकडून भारतीय कंपनीला तेल पुरवठा खंडित!
रशियाकडून तेल खरेदी केल्याने EU च्या निर्बंधामुळे सौदी आणि इराकने नायराला तेल देणे थांबवले आहे. नायराला आता रशियावर अवलंबून राहावे लागेल. भारतासाठी हा मोठा धक्का आहे. वडिनार येथील नायराची ४,००,००० बॅरल/दिवस रिफायनरी आता ७०-८०% क्षमतेने चालू आहे. नायरा एनर्जी ही देशाच्या एकून रिफायनरिच्या क्षमतेपैकी ८ टक्के उत्पादन करते.

राष्ट्रीय: प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभेच्या रिंगणात
सक्रिय राजकारणात उतरलेल्या प्रशांत किशोर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. बिहारमधील रोहतास जिल्ह्यात असलेल्या करगहर विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत. पाटण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात प्रशांत किशोर यांनी याबद्दलची घोषणा केली.

आंतरराष्ट्रीय: ट्रम्प यांचा डाव फसला; पुतिन यांची मोठी ऑफर, भारतानेही केली तयारी
रशियाकडून तेल खरेदीवर नाराज होत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावला. मात्र भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. त्यातच आता रशियाने आणखी सवलत दिल्याने भारत रशियाकडून होणारी तेल खरेदी वाढण्याची शक्यता आहे, अलीकडेच व्लादिमीर पुतिन आणि नरेंद्र मोदी यांची चीनमध्ये भेट झाली. या भेटीनंतर रशियाने भारताला तेल खरेदीत ही ऑफर दिल्याचे पुढे आले आहे.

महाराष्ट्र: भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, राष्ट्रवादीची तातडीची बैठक
ओबीसी आरक्षणावरून नाराज छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची तातडीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बोलवण्यात आली आहे. सरकारच्या भूमिकेमुळे ओबीसी संघटनांमध्ये असंतोष असून कायदेशीर सल्ला घेऊन न्यायालयात जाण्याचा इशारा भुजबळांनी दिला आहे. तर ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही यामुळे धक्का लागणार नाही. त्यामुळे विनाकारण गैरसमज करून घेऊन नये असं मंत्री विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

मुंबई: मंत्रिमंडळ १५ निर्णय: मुंबई-ठाणे मेट्रो, लोकल खरेदी, पुणे-लोणावळा वाढीव मार्गिका मंजूर
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई-ठाणे नवीन मेट्रो मार्ग, मुंबई लोकल खरेदी, पुणे-लोणावळा तिसरी-चौथी मार्गिकेला मंजुरी देण्यात आली. दिव्यांगांना अर्थसहाय्यात वाढ, नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र, आउटर रिंग रोडलाही मान्यता मिळाली.

जालना: हैदराबाद गॅझेट विरोधात ओबीसी समाज आक्रमक; अंतरवालीत जीआरची होळी
मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटच्या जीआरला ओबीसींचा विरोध! अंतरवाली सराटीत जीआरची होळी करत सरकारचा निषेध. 'हा ओबीसींच्या पाठीत खंजीर,' ओबीसी नेत्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देत आरक्षणाचे संरक्षण करणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रीय: वडिलांनी पक्षातून हाकललं, मुलीने आमदारकीवर लाथ मारली
भारत राष्ट्र समिती पक्षात मोठा वाद उफाळला आहे. पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी त्यांची मुलगी आणि आमदार के. कविता यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली. वडिलांनीच पक्षातून बाहेर काढल्यानंतर के. कविता यांनी बुधवारी (३ सप्टेंबर) आमदारकीचा राजीनामा दिला.

आंतरराष्ट्रीय: पुतिन, जिनपिंग, किम यांचं अमेरिकेविरुद्ध षडयंत्र; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
राष्ट्राध्यक्ष शी आणि चीनच्या जनतेला माझ्या शुभेच्छा. पुतिन आणि किम जोंग उन यांनाही माझ्याकडून शुभेच्छा आहेत. कारण तुम्ही सगळे मिळून अमेरिकेविरुद्ध कट रचत आहात असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. चीनच्या मिलिट्री विक्ट्री परेडला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन यांनी हजेरी लावली होती.

बीड: माझ्या लेकाला पुन्हा उपोषण नको; जरांगेंच्या आई-वडिलांची सरकारला कळकळीची विनंती
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर, आई-वडिलांनी सरकारला फसवणूक न करण्याची विनंती केली. मुलाने २५ वर्षे आंदोलने केली असून, आता त्याला उपोषणाला बसवू नका. सरकारने मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावावा.

छत्रपती संभाजीनगर: सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; मनोज जरांगेंनी दिले उत्तर
"पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा... सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार, यात तिळमात्र शंका नाही; कुणी ठेवायची पण नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत म्हणून तर गॅझेट लागू करायचं आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांच्यासाठी गाव पातळीवर आणि तालुका स्तरावर समिती तयार केली आहे", असे मनोज जरांगे म्हणाले. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.

सखी: डॉक्टरांचा सल्ला: तांदळाच्या पाण्याने केसांची वाढ आणि जाडी वाढवा
मजबूत केसांसाठी तांदळाचे पाणी गुणकारी! डॉक्टर एरिक बर्ग यांच्या मते, तांदळाच्या पाण्यात व्हिटॅमिन बी आणि खनिजे असल्याने केस मजबूत होतात. आंबवलेले पाणी लावल्यास कोंडा आणि खाज कमी होऊन केस चमकदार बनतात. आठवड्यातून दोन वेळा वापर करा. लोकमतचा खास सल्ला!

महाराष्ट्र: हैदराबाद गॅझेटचा श्रेयवाद; खासदार श्रीकांत शिंदेंनी लिहिली पोस्ट
खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा आरक्षणासाठी ठोस पाऊले उचलली. शिंदे समितीने मराठा कुटुंबांची कुणबी नोंद शोधली, ज्यामुळे आरक्षणाचा मार्ग सुकर झाला. फडणवीस यांनीही निर्णायक भूमिका बजावली. हा मराठा समाजाच्या न्यायाचा विजय आहे, असे ते म्हणाले.

व्यापार: चीनची बाजी, परंतु भारतच खरा 'किंग'
मार्क मोबियस यांचा भारतावर विश्वास! अमेरिकेच्या शुल्क वाढीनंतरही, भारत गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमधील २०% गुंतवणूक भारतात आहे. भारताचा मजबूत विकास दर, उद्योजकता आणि सरकारी सुधारणा यामुळे भारत पुढे जाईल. शुल्क काही क्षेत्रांना बाधक असले तरी देशांतर्गत बाजारपेठ मोठी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

आंतरराष्ट्रीय: "मी जर टॅरिफ लावला नसता, तर भारताने कधीच..."; डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्कॉट जेनिंग्ज यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना भारतावरील टॅरिफचा मुद्दा काढला. ते म्हणाले, "टॅरिफ लावला म्हणूनच मला भारताकडून शून्य टॅरिफ करण्याची ऑफर दिली गेली होती. आता भारतावर आणखी टॅरिफ लावणार नाही. पण, जर मी भारतावर टॅरिफ लावला नसता, तर त्यांनी ही ऑफर दिली नसती."

छत्रपती संभाजीनगर: मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात, रुग्णालयात दाखल; जल्लोषात स्वागत
मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे यांचे मध्यरात्री संभाजीनगरमध्ये आगमन झाले. घोषणा आणि आतिषबाजीने परिसर दणाणून गेला. पाच दिवसांच्या उपोषणानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले, डॉक्टरांनी १५ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. प्रकृती नाजूक असल्याने तातडीने उपचार सुरू.

व्यापार: रशियाचे तेल स्वस्त, अमेरिकेच्या टॅरिफने भारताला संधी आणि आव्हान
रशियाच्या तेलावरील अमेरिकेचा दबाव वाढत असतानाच भारताला रशियाकडून मोठी सवलत मिळाली. त्यातच भारतीय रिफायनरीसाठी अमेरिकन तेल महाग पडते त्यामुळे अमेरिकेसोबत चर्चा सुरू असल्याचे मंत्री पियूष गोयल यांनी माहिती दिली. टॅरिफमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होत असून भारताला निर्यातीत संधी असल्याचे दिसून आले. भारत-चीन संबंध सामान्य होत असल्याचीही नांदी दिसली.

क्रिकेट: टीम इंडियाच्या प्रायोजकत्वासाठी BCCIने मागवल्या निविदा; गेमिंग कंपन्यांना मनाई
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी बीसीसीआयने निविदा मागवल्या आहेत. ऑनलाइन गेमिंग आणि क्रिप्टो कंपन्यांना मनाई करण्यात आली आहे. बोली सादर करण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर आहे. अधिक माहितीसाठी बीसीसीआयच्या वेबसाईटला भेट द्या.

राष्ट्रीय: माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहार माफ करणार नाही : पंतप्रधान मोदी
काँग्रेसच्या रॅलीत माझ्या आईबाबत अपशब्द वापरले गेले, याबद्दल मला तीव्र वाटते, असे पंतप्रधान मोदीं म्हणाले. माझ्या आईचा अपमान करणाऱ्यांना बिहार माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. राजद आणि काँग्रेसवर त्यांनी जोरदार टीका केली. तसेच, विरोधकांच्या महिलांच्या शोषणाच्या मानसिकतेवर हल्ला चढवला.

राष्ट्रीय: जम्मू काश्मीर: पूंछमध्ये दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न लष्कराकडून हाणून पाडला!
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने उधळला. अमित शाह यांच्या भेटीदरम्यान बालाकोटमध्ये संशयित हालचाल दिसताच जवानांनी ही कारवाई केली. बालाकोटजवळील डब्बी गावाच्या परिसरात ही घटना घडली. सध्या शोध मोहीम सुरू असून लष्कर सतर्क आहे.

महाराष्ट्र: मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय; संयुक्त बैठक.
मराठा आरक्षणावर सरकारने मसुदा तयार केला आहे. कुणबी प्रमाणपत्रावर विचार केला जात असून, सरसकट ओबीसी आरक्षण नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोर्टाच्या निर्देशांचे पालन होणार, असे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे, छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण बचावचा नारा दिला आहे.

महाराष्ट्र: सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण: ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळणार, ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांचे स्पष्ट मत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार, ज्यामुळे ते ओबीसीमध्ये समाविष्ट होतील. गरीब व अल्पभूधारक मराठ्यांना लाभ. प्रमाणपत्र प्रक्रिया सोपी, १९६७ पूर्वीचा पुरावा किंवा शपथपत्रावर आधारित आहे. यामुळे मराठ्यांना गरीब किंवा अल्पभूधारकचा लाभ मिळणार आहे.

राष्ट्रीय: अभिनेत्री रान्या रावला DRI ने ठोठावला 102 कोटींचा दंड
सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी बंगळुरुमध्ये तुरुंगवास भोगत असलेली कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या राव हिला महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) १०२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंगळवारी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी बंगळुरू मध्यवर्ती कारागृहात कैद असलेल्या रान्या रावला २,५०० पानांची सविस्तर नोटीस सोपवली.

महाराष्ट्र: हैदराबाद आणि सातारा गॅझेटचा मराठा आरक्षणाशी काय संबंध?
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर हैदराबाद आणि सातारा गॅझेटची चर्चा सुरू झाली आहे. 1901 च्या हैदराबाद गॅझेटनुसार, मराठवाड्यात ३६% मराठा कुणबी होते. सातारा गॅझेट हे जिल्ह्याचे शासकीय राजपत्र आहे. मराठा आरक्षणासाठी कुणबी दाखले मिळवण्यासाठी ह्या गॅझेटमधील नोंदी महत्त्वाच्या ठरण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग सुकर होऊ शकतो.

महाराष्ट्र: मनोज जरांगेंनी उपोषण सोडले; मराठा आरक्षणावर जीआर निघाला
मराठा आरक्षणावरील जीआरनंतर मनोज जरांगेंनी पाच दिवसांचे उपोषण सोडले. विखे पाटलांनी जरांगे यांना सरबत पाजले. जीआरमध्ये गडबड झाल्यास मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा जरांगेंनी दिला. मागण्या मान्य झाल्याने मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे. तसेच जरांगे यांनी आपण आता हॉस्पिटलमध्ये काही दिवस मुक्काम करणार असल्याचे सांगितले.