LokSabha2024: माढ्याच्या शिलेदाराचा माण, फलटणमधील मतदार करणार फैसला! 

By नितीन काळेल | Published: May 6, 2024 06:33 PM2024-05-06T18:33:23+5:302024-05-06T18:33:55+5:30

नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी निवडणूक गाजली 

Highest number of voters in Madha Lok Sabha Constituency Maan, Phaltan Assembly Constituency | LokSabha2024: माढ्याच्या शिलेदाराचा माण, फलटणमधील मतदार करणार फैसला! 

LokSabha2024: माढ्याच्या शिलेदाराचा माण, फलटणमधील मतदार करणार फैसला! 

सातारा : नेत्यांच्या सभा आणि आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान होत असून सुमारे २० लाख मतदार आपला हक्क बजावणाार आहेत. यामध्ये सर्वाधिक मतदान हे माण विधानसभा मतदारसंघात ३ लाख ४८ हजार इतके आहे. तर माढ्यासाठी सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघातील ६ लाख ८२ हजार मतदार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, सांगोला आणि माळशिरस या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण हे दोन विधानसभेचे मतदारसंघ येतात. मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर पहिली निवडणूक राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिकंली होती. तर दुसऱ्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विजय मिळवलेला. तर २०१९ च्या तिसऱ्या निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी विजय मिळवला. त्यामुळे या मतदारसंघात प्रथमच कमळ फुलले. आताची ही चाैथी निवडणूक होत आहे.

माढा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे मंगळवार, दि. ७ मे रोजी मतदान होत आहे. मतदारसंघात १५ मार्चपर्यंत नोंदणी असलेले १९ लाख ८० हजार ८५९ मतदार आहेत. तरीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दहा दिवसांपर्यंत मतदार नोंदणी करता येत होती. त्यामुळे आणखी काही मतदारांचा आकडा वाढलेला आहे.

या निवडणुकीसाठी सर्वाधिक मतदार हे माण विधानसभा मतदारसंघातील आहेत. माणध्ये ३ लाख ४८ हजार २०५ मतदारांची नोंद झालेली आहे. त्यानंतर माळशिरसमध्ये ३ लाख ३५ हजार ८२३ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. तर माढा विधानसभा मतदारसंघात ३ लाख ३५ हजार ४५०, फलटण ३ लाख ३४ हजार ८५५, करमाळा ३ लाख १६ हजार ७४५ आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात ३ लाख १० हजार ५१ मतदार हे १५ मार्चपर्यंत नोंद झालेले आहेत.

८५ वर्षांवरील ३१ हजार मतदार..

दि. १५ मार्चपर्यंत नोंद झाल्यानुसार माढा लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ३१ हजार ७१२ मतदार आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघात ५ हजार २१२, सांगोला ४ हजार ३३४, माळशिरस विधानसभा मतदारसंघ ५ हजार ८, फलटणमध्ये ५ हजार ९४६ आणि माण विधानसभा मतदारसंघात ५ हजार ८२७ मतदार तसेच माढ्यातही पाच हजारांवर मतदार हे ८५ वर्षांवरील आहेत. तर आताच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील हाचाल न करता येणाऱ्या मतदारांसाठी घरीच मतदानाची व्यवस्था केलेली होती. त्यामुळे अनेकांचे मतदान झालेले आहे.

Web Title: Highest number of voters in Madha Lok Sabha Constituency Maan, Phaltan Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.