'महाविकास आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेसची मतं असणार'; विश्वजीत कदमांची चंद्रहार पाटलांना साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 04:25 PM2024-04-25T16:25:09+5:302024-04-25T16:27:33+5:30

Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू होती, अखेर ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली.

sangli Lok Sabha Election 2024 thackeray group candidate will have Congress vote Vishwajit Kadam supports Chandrahar Patil | 'महाविकास आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेसची मतं असणार'; विश्वजीत कदमांची चंद्रहार पाटलांना साथ

'महाविकास आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेसची मतं असणार'; विश्वजीत कदमांची चंद्रहार पाटलांना साथ

Lok Sabha Election ( Marathi News ) : सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू होती, अखेर ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली. ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली.  काँग्रेसच्याविशाल पाटील यांनी बंडखोरी केली. यामुळेआता काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे, आज काँग्रेसने सांगलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करण्याचे आदेश दिले, तर आमदार विश्वजीत कदम यांनी या निवडणुकीत शिवसेनेला जेवढी मतं मिळतील ती सर्व काँग्रेसची असतील म्हणाले. 

'कान उघडून ऐका, मोदी जिवंत असेपर्यंत...', OBC आरक्षणावरुन PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

यामुळे आता अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी बोलताना विश्वजीत कदम यांनी विरोधकांचाही समाचार घेतला. 

विश्वजीत कदम म्हणाले, मला काँग्रेस नेत्यांकडून मार्ग काढण्यासाठी फोन येत होते, ते माझ्याकडे १७, १८ तारखेला माझ्याकडे आले. त्यावेळी मी त्यांच्यामागे होतो. काँग्रेस, शिवसेनेचे नेते राहुल गांधींशी बोलून आम्ही राज्यसभेची कबुली घेतली. तेव्हा मी त्यांना अपक्ष लढू नको म्हणून सांगितलं यात फसू नका. राज्यसभा वाईट नाही म्हणून सांगितलं. पुढच्यावेळी आपण जागा सोडायची नाही असं त्यांना सांगितलं.

"या निवडणुकीत शिवसेनेला जेवढी मते मिळतील ती सर्व काँग्रेसची असतील आणि त्यामुळे पुन्हा विधानसभेला त्यांनी आवाज करु नये. गेल्या तीन चार महिन्यांच्या सापशिडीच्या खेळात आम्हाला साप चावला पण अंतिम विजय आमचाच होईल, असंही कदम म्हणाले. 

पतंगराव कदम सरळ होते, विश्वजीत कदमांचे स्वत:चे गुण वेगळे आहेत

पतंगराव कदम यांनी आमच्यावर संस्कार आहेत, काँग्रेसचे संस्कार आहेत की सरळ वाटेने राजकारण करायचं. आम्ही सरळ वाटेनेच राजकारण करत होतो. तुम्ही सगळ्यांनी पतंगराव कदम साहेबांबरोबर काम केले, तुम्ही सांगता कदम साहेब खूप सरळ होते म्हणूनच त्यांना मुख्यमंत्रिपद मिळालं नाही. मी येथे कटकारस्थान कोणी केलं त्यांना सांगतो, पतंगराव कदम यांचे सगळे गुण माझ्यात आहेत पण, विश्वजीत कदम यांचे स्वत:चे पण काही गुण आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा, असा इशाराही विश्वजीत कदम यांनी दिला. 

Web Title: sangli Lok Sabha Election 2024 thackeray group candidate will have Congress vote Vishwajit Kadam supports Chandrahar Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.