पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरेंना मिळाली, तर शरद पवार पाठिंबा देतील - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 01:13 PM2024-04-20T13:13:29+5:302024-04-20T13:15:45+5:30

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्राला पंतप्रधान पदाचा मान का मिळू नये, असा थेट सवालही संजय राऊत यांनी केला.

Lok Sabha Election 2024 : If Uddhav Thackeray gets a chance to become Prime Minister, Sharad Pawar will support him - Sanjay Raut | पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरेंना मिळाली, तर शरद पवार पाठिंबा देतील - संजय राऊत

पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरेंना मिळाली, तर शरद पवार पाठिंबा देतील - संजय राऊत

Sangli Lok Sabha Election 2024: सांगली : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधानपदासाठी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा समर्थन केले. सांगलीत मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत, याचा निर्णय इंडिया आघाडीत बसून घेतला जाईल. शरद पवार यांचे कर्तृत्व असताना त्यांना हे पद मिळले नाही. उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केले आहे. आमच्याकडे जास्त चेहरे आहेत. मोदी एके मोदी नाही. पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, महाराष्ट्राला पंतप्रधान पदाचा मान का मिळू नये, असा थेट सवालही संजय राऊत यांनी केला.

देशात इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीत 300 पेक्षा जास्त जागा मिळतील, तर राज्यात 35 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जमा होतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच, दूरदर्शन हे भाजपा प्रणित झाले आहे, अशी टीका त्यांनी केली. लोगो भगवा झाला म्हणून हिंदुत्वव उजळून निघाला असे नाही, असा चिमटा त्यांनी काढला. अजित पवार यांचा एकही खासदार निवडून येणार नाही, भविष्यात ते भाजपात विलीन होईल, असा टोला संजय राऊत यांनी हाणला. तर बारामतीमधून सुप्रिया सुळे या बहुमताने निवडून येतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत - संजय राऊत
अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. विश्वजित कदम तब्येत ठीक नसल्याने उपस्थित राहू शकले नाहीत, पण पुढील सभेला विश्वजित कदम दिसतील. विशाल पाटील हे समजुतदार आहेत, वसंतदादा पाटील यांच्या क्रांतिकारक कुटुंबातील आहेत. विशाल पाटील आपल्या क्रांतीकारक आजोबांच्या विचारांपेक्षा वेगळी भूमिका घेणार नाहीत.विशाल पाटील यांच्याशी आमचा यावेळेला उत्तम संवाद आहे. वसंतदादा आणि बाळासाहेब ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध होते. विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत, ते आमच्या कुटुंबातील आहेत. उद्धव ठाकरे यांचे विशाल पाटील यांच्यावर प्रेम असूनही त्यांचेही असल्याचे संजय राऊत म्हणाले. 
 

Web Title: Lok Sabha Election 2024 : If Uddhav Thackeray gets a chance to become Prime Minister, Sharad Pawar will support him - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.