Sangli Politics: शिराळ्यात राजकीय भूकंप होणार; मानसिंगराव, शिवाजीराव नाईक महायुतीसोबत जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 19:21 IST2025-02-11T19:20:39+5:302025-02-11T19:21:20+5:30

राष्ट्रवादी, शिंदेसेनेची ताकद वाढणार

Former MLA Mansingrao Naik likely to join Ajit Pawar faction and Shivajirao Naik likely to join Shinde Sena | Sangli Politics: शिराळ्यात राजकीय भूकंप होणार; मानसिंगराव, शिवाजीराव नाईक महायुतीसोबत जाणार?

Sangli Politics: शिराळ्यात राजकीय भूकंप होणार; मानसिंगराव, शिवाजीराव नाईक महायुतीसोबत जाणार?

विकास शहा

शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघात आता पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिराळा मतदारसंघात विरोधक राहणार नसल्याची स्थिती निर्माण होणार आहे. सत्ताधारी महायुतीसोबत शिराळा मतदारसंघातील दोन माजी आमदार जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये माजी आमदार मानसिंगराव नाईक हे अजित पवार गटात व शिवाजीराव नाईक हे शिंदेसेनेत प्रवेशाची मतदारसंघातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

१९७८ पासून शिराळा मतदारसंघात कायम काहींना काही राजकीय घडामोडी होत आहेत. शिराळ्यात शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव नाईक व फत्तेसिंगराव नाईक हे गट कार्यरत होते. यामध्ये नानासाहेब महाडिक यांचा गटही कार्यरत झाला. १९९५ मध्ये मोठी घडामोड होऊन दोन नाईक गट एकत्र आले. यावेळी राजकीय समीकरण बदलून काँग्रेसची सत्ता गेली. यानंतर पुन्हा नाईक, देशमुख, नाईक व महाडिक या राजकीय गटांची युती वेगवेगळ्या पद्धतीने बदलत गेली.

बदलत्या समीकरणाने शिवाजीराव नाईक व मानसिंगराव नाईक यांना आमदारकीची संधी मिळाली. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे सत्यजीत देशमुख निवडून आले. राज्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदेसेना यांची सत्ता आहे. या बदलत्या राजकीय समीकरणाचा फटका मानसिंगराव नाईक व शिवाजीराव नाईक यांना बसला. त्यामुळे दोन्ही नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिंदेसेनेसोबत जाणार असल्याचे चर्चा सुरू झाली आहे.

राजीनामा अन् विधान परिषद..

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक जिल्हाध्यक्षपदाचा विराज नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला. हा राजीनामा म्हणजे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या गळ्यात विधान परिषदेची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे विराज यांनी राजीनामा दिला असावा, अशी राजकीय गोटात चर्चा आहे.

Web Title: Former MLA Mansingrao Naik likely to join Ajit Pawar faction and Shivajirao Naik likely to join Shinde Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.