उन्हाळ्याचा सिझन जरी नकोसा वाटला तरी, या ऋतूंत येणारा आंबा मात्र सगळ्यांच्याच विशेष आवडीचा. वजन कमी करताना गोड पदार्थ टाळावेत असं अनेकांना वाटतं, त्यामुळे आंब्यासारखं आवडतं फळही अनेकजण डाएटमधून काढून टाकतात. खरंतर, आपल्यापैकी कित्येकांना असा प्रश्न पडतो की, वेटलॉस किंवा डाएट करताना आंबा खावा की खाऊ नये ? शक्यतो आपल्यापैकी कित्येकजण 'डाएटवर असताना आंबा खायचा नाही' हा नियम स्वतःलाच लावून घेतात. आंबा खाल्ल्याने वजन वाढेल किंवा आंबा खाऊन डाएट किंवा कॅलरीजच सगळं गणितच फिस्कटेल अशी भीती मनात ठेवून आंबा खाणं नकोच असं आपण ठरवून टाकतो. परंतु याउलट, आंबा हे केवळ चविष्ट फळ नसून ते पोषक तत्वांनी भरलेलं आहे. आंबा खाल्ल्याने वजन वाढत नाही, तर तो चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने वजन वाढतं(how to eat mango for weight loss).
योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने आंबा खाल्ल्यास तो वेटलॉसमध्ये अडथळा ठरत नाही. आंब्यामध्ये व्हिटॅमिन्स, फायबर आणि नैसर्गिक साखर असते, जी शरीराला ऊर्जा (healthy way to eat mango) देण्यास मदत करते. मात्र, तो कधी, किती आणि कशासोबत खावा हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. योग्य पद्धतीने आंब्याचा समावेश केल्यास वजन वाढणार नाहीच, उलट तो तुमच्या डाएटला हेल्दी ट्विस्ट देऊ शकतो. वजन न वाढवता आंब्याचा आस्वाद नेमका कसा घ्यावा? वेटलॉस करताना आंबा (how to include mango in diet without gaining weight) खाण्याची खास पद्धत कोणती? ते पाहूयात.
डाएट करताना आंबा खाऊ शकतो का ?
डाएटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट अर्चना जैन यांच्या मते, डाएटिंग दरम्यान आपण आंबा खाऊ शकतो, परंतु ते खाण्याचे प्रमाण मर्यादित असणे आवश्यक आहे. विशेषतः रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या लोकांनी अधिक काळजी घ्यावी. मर्यादित प्रमाणात आंबा खाल्ल्याने कॅलरीज नियंत्रित ठेवण्यास मदत होते. प्रत्येक व्यक्तीसाठी 'पोर्शन कंट्रोल' अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास आणि निरोगी राहण्यास मदत मिळते. आंब्यामध्ये कॉपर, फोलेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर तसेच विटामिन- ए, सी, ई आणि बी यांसारखी महत्त्वाची पोषक तत्वे असतात. आंबा खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पचन प्रक्रिया सुधारते, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.
डोक्यांत सतत निगेटिव्ह विचार येतात ? रोज करा फक्त ५ गोष्टी - मन शांत ठेवण्याची मॅजिकल ट्रिक...
डाएटिंगमध्ये आंबा कसा खावा?
डाएटिंग दरम्यान तुम्ही आंब्याचा समावेश पुडिंग किंवा आमरसासारख्या विविध रेसिपीजच्या स्वरूपात करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की, यामध्ये वरून साखर किंवा अतिरिक्त स्वीटनर्स घालण्याऐवजी नैसर्गिकरित्या गोड असलेल्या आंब्याचाच वापर करा. आंब्यामध्ये अधिक साखर घातल्याने वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते.
वेटलॉस करताना आंबा खायचा तर लक्षात ठेवा...
१. पोर्शन कंट्रोल करा :- डाएटिंग करत असताना एखादी व्यक्ती दिवसभरात एक छोटा आंबा खाऊ शकते. हे प्रमाण पाळल्यास तुम्हाला आंब्याची चवही घेता येईल आणि तुमच्या वेटलॉस प्रवासात अडथळाही येणार नाही.
२. योग्य पद्धतीने खा :- आंबा नेहमी ताजा आणि नैसर्गिक स्वरूपात खावा. आंबा खाताना त्यामध्ये साखर किंवा इतर कोणतेही स्विटनर्स घालून तयार केलेला रस खाणं टाळावे. फळ म्हणून आंबा खाणे हे रसापेक्षा केव्हाही आरोग्यदायी ठरते.
३. फायबर आणि प्रोटीनसोबत खा :- आंबा खाताना तो ग्रीक योगर्ट आणि नट्स (सुकामेवा) यांसारख्या प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थांसोबत खावा. यामुळे शरीरातील साखरेचे शोषण संथ गतीने होते, परिणामी रक्तातील साखर अचानक वाढत नाही.
घर -ऑफिस- काम -चिडचिड-हार्मोनल घोळ झाल्यानं स्ट्रेस वाढलाय, ६ सवयी बदला-जगणंच बदलेल...
आंबा खाण्याची योग्य वेळ कोणती?
डाएटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट अर्चना जैन यांच्या मते, आंबा तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळी खाऊ शकता. तसेच, तुम्ही जेवणासोबत देखील आंब्याचा आस्वाद घेऊ शकता.
