वाढत्या तापमानामुळे एसी आता चैनीची वस्तू न राहता गरज बनली आहे. मे महिन्याचं ऊन आणि घामाच्या धारांपासून वाचण्यासाठी एसी हाच एकमेव आधार वाटतो. उन्हाळा सुरू झाला की वाढत्या तापमानापासून दिलासा मिळवण्यासाठी आपण घरातील ए.सी.चा वापर मोठ्या प्रमाणात करतो. थंडावा मिळत असला तरी महिन्याच्या शेवटी येणारा वीज बिलाचा आकडा मात्र डोक्याला ताप देतो. त्यामुळे “ए.सी. वापर कमी करावा का?” असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. पण खरं म्हणजे, ए.सी. बंद करण्याऐवजी त्याचा योग्य आणि स्मार्ट वापर केला तर थंडावाही मिळू शकतो आणि वीज बिलही नियंत्रणात ठेवता येऊ शकतं(which AC remote button reduces electricity bill the most).
अनेकांना माहिती नसतं की ए.सी.च्या रिमोटमध्येच (which AC mode saves electricity) काही अशा सेटिंग्ज आणि बटणं असतात, ज्यांचा योग्य वापर केल्यास वीजेचा वापर कमी होतो. फक्त एका छोट्या बटणाचा वापर करून तुम्ही ए.सी.चा परफॉर्मन्स कायम ठेवत वीज बिल कमी करू शकता. अनेकजण वीज बिल वाचवण्यासाठी एसी बंद करून ठेवतात, पण आता त्याची गरज नाही. तुमच्या रिमोट कंट्रोलमध्येच वीज बचतीचं गुपित दडलं आहे. रिमोटवरील एका विशिष्ट बटणाचा योग्य वापर केल्यास थंड हवा तर मिळेलच, शिवाय वीज बिलही निम्म्यावर येऊ शकतं. तुमच्या एसीच्या रिमोटवर एक असं 'मॅजिकल' बटण असतं, जे फक्त एकदा दाबल्यास (how to use eco mode in AC to save electricity) तुमच्या बिलात मोठी कपात होऊ शकते. हे बटण नेमकं कोणतं आणि ते कसं काम करतं, ते पाहूयात.
वीज बिल कमी येण्यासाठी एसी रिमोट कंट्रोल मधील 'हे' बटण फायदेशीर...
एसी रिमोटमधील 'ईको मोड' किंवा 'एनर्जी सेवर मोड' हे एक असे वैशिष्ट्य आहे, जे सुरू करताच मशिनच्या कार्य करण्याची पद्धत बदलते. हे बटन एसीला सतत पूर्ण क्षमतेने (Full Power) चालवण्याऐवजी गरजेनुसार कुलिंग ॲडजस्ट करू देते. याचा सरळ अर्थ असा की, यामुळे विजेचा वापर कमी होतो आणि खोलीतील थंडावाही कायम टिकून राहतो.
जेव्हा तुम्ही 'ईको मोड' सुरू करता, तेव्हा एसी खोलीतील तापमान आणि गरजेनुसार स्वतःवर नियंत्रण ठेवतो. यामुळे कॉम्प्रेसर वारंवार पूर्ण क्षमतेने (Full Speed) चालत नाही, तर स्मार्ट पद्धतीने चालू-बंद होतो. परिणामी, विजेची मोठी बचत होते आणि मशीनवर पडणारा ताणही कमी होतो, ज्यामुळे एसीचे वर्षानुवर्षे चांगले काम करुन दीर्घकाळ चांगला चालतो. ईको मोडचा वापर केल्यावर खोली थंड होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो. म्हणजेच, जर तुम्हाला तातडीने अतिशय थंड हवा हवी असेल, तर सुरुवातीला हा मोड संथ वाटू शकतो. परंतु, जर तुम्ही तो काही वेळ चालू राहू दिला, तर हा मोड आरामदायक थंडावा देण्यासोबतच तुमचे वीज बिलही नियंत्रणात ठेवतो. अंदाजानुसार, या मोडचा योग्य वापर केल्यास २० ते ३० टक्क्यांपर्यंत विजेची बचत होऊ शकते. याचाच अर्थ दरमहा येणाऱ्या वीज बिलात तुम्हाला स्पष्ट फरक दिसून येईल.
नेमकी घाईगडबडीत गाडीची चावीच सापडत नाही, समोर असून दिसत नाही? हा विसरभोळेपणा की मेंदूचा अजब खेळ....
अनेक युजर्स एसी खरेदी करताना किंवा इन्स्टॉलेशनच्या वेळी रिमोटवरील प्रत्येक बटनाचे कार्य समजून घेण्याकडे दुर्लक्ष करतात. याच कारणामुळे हा अत्यंत उपयुक्त असा फिचर दुर्लक्षित राहतो. खरं तर, माहितीचा अभाव हेच यामागचे सर्वात मोठे कारण आहे.
जर तुम्ही 'ईको मोड'सोबत काही छोट्या सवयीं स्वतःला लावून घेतल्या, तर त्याचा फायदा अधिक पटीने वाढू शकतो. एसीचे तापमान २४ ते २६ डिग्री दरम्यान ठेवणे सर्वाधिक परिणामकारक मानले जाते. याव्यतिरिक्त, रात्रीच्या वेळी 'स्लीप मोड'चा वापर करणे, वेळोवेळी फिल्टरची स्वच्छता करणे आणि खोली पूर्णपणे बंद ठेवणे - या सर्व गोष्टी मिळून विजेचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी करतात.
ईको मोड हा केवळ वीज बिल वाचवण्याचा मार्ग नाही, तर तो ऊर्जा बचतीची (Energy Efficiency) सवय देखील लावतो. कमी विजेचा वापर म्हणजे केवळ पैशांची बचत नव्हे, तर पर्यावरणावरील ताण कमी करणे देखील आहे.
थोडक्यात सांगायचे तर, रिमोटवरील हे छोटेसे बटण तुमच्या खिशासाठी आणि पर्यावरणासाठी अशा दोन्ही दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. रिमोटमधील हे छोटेसे फिचर तुम्हाला जास्त मेहनत न घेता मोठा फायदा मिळवून देऊ शकते. फक्त गरज आहे ती याचा योग्य पद्धतीने वापर करण्याची.
