रणरणत्या उन्हाचं प्रमाण वाढलं की, आपल्याला सीलिंग फॅनच्या थंडगार हवेखाली बसणं अगदी रिलॅक्स वाटतं. उन्हाळा सुरू होताच घराघरात सीलिंग फॅन दिवस - रात्र फिरत राहातो. अशा परिस्थितीत, सीलिंग फॅनच्या सर्व्हिसिंगसोबतच त्याच्या स्वच्छतेचीही तितकीच काळजी घ्यावी लागते, अन्यथा याचा परिणाम फॅनच्या स्पीड आणि हवेवर होऊ शकतो. दिवस-रात्र अविरत चालणारा हा पंखा आपल्याला थंडावा तर देतो, पण काही दिवसांतच त्याच्या पात्यांवर धुळीचा एक जाड आणि काळा थर जमा झालेला दिसतो. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की, जो पंखा इतक्या वेगाने फिरतोय, ज्याची हवा धुळीला उडवून लावायला हवी, तोच या धुळीला स्वतःकडे चिकटवून कशी घेतो? (why ceiling fan blades get dusty).
सीलिंग फॅन धुळीला स्वतःकडे चुंबकीय शक्तीसारखा खेचून कशी घेतो? बहुतेक घरांमध्ये पंखा साफ करणे हे एक कंटाळवाणे काम मानले जाते, पण या धुळीच्या थरामागे केवळ घराची अस्वच्छता जबाबदार नाही, तर यामागे विज्ञानाचे दोन अत्यंत रंजक नियम दडलेले आहेत. पंख्याच्या पात्यांवर ही धूळ नेमकी कशी चिकटते आणि तिचा फॅनच्या स्पीडवर (what causes dust to stick on rotating fan blades) कसा परिणाम होतो, हे जाणून घेणे जितके रंजक आहे तितकेच ते आपल्या आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. बहुतेकजण याला फक्त घाण समजून साफ करतात, परंतु यामागे विज्ञानाची २ मोठी कारणे आहेत, ती दोन (why do ceiling fan blades get dusty so quickly) कारणे नेमकी कोणती ती पाहूयात.
स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीची कमाल...
जेव्हा पंखा वेगाने हवेत फिरतो, तेव्हा त्याची पाती हवेतील कणांशी घासली जातात. या घर्षणामुळे (Friction) पंख्याच्या कडांवर एक इलेक्ट्रिक चार्ज निर्माण होतो, ज्याला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणतात. हवेत तरंगणाऱ्या धुळीच्या कणांचाही स्वतःचा इलेक्ट्रिक चार्ज असतो. जसे हे कण पंख्याच्या संपर्कात येतात, ते चुंबकाप्रमाणे पात्यांच्या कडांना चिकटतात. याच कारणामुळे पंख्याच्या मधल्या भागाच्या तुलनेत त्याच्या कडांवर जास्त धूळ जमा झालेली दिसते.
डोक्यांत सतत निगेटिव्ह विचार येतात ? रोज करा फक्त ५ गोष्टी - मन शांत ठेवण्याची मॅजिकल ट्रिक...
पंख्याच्या पात्यांवर धुळीचा थर साचून का राहतो ?
जेव्हा पंखा वेगाने फिरतो, तेव्हा आपल्याला वाटते की त्याच्या आजूबाजूची सर्वच हवा वेगाने फिरत असेल. पण विज्ञानानुसार (Fluid Dynamics), पंख्याच्या पात्याला चिकटून असलेला हवेचा एक अतिशय पातळ थर असतो, जो हलत नाही, यालाच 'बाऊंड्री लेयर' म्हणतात. तुम्ही याची तुलना नदीच्या प्रवाहाशी करू शकता; नदीच्या मध्यभागी पाणी वेगाने वाहतं, पण काठावरच्या दगडांना चिकटलेलं पाणी संथ असतं. अगदी तसंच पंख्याच्या बाबतीत होतं. पंख्याच्या पात्याच्या अगदी जवळची हवा 'स्थिर' किंवा 'नगण्य' गतीमध्ये असते. हवेत तरंगणारे धुळीचे छोटे कण जेव्हा या स्थिर थरात शिरतात, तेव्हा ते तिथे अडकून पडतात. पंखा कितीही वेगाने फिरला तरी, बाहेरच्या दिशेने ढकलणारे बल (Centrifugal Force) या स्थिर थरातील कणांना बाहेर फेकू शकत नाही. कारण त्या थरात हवेची हालचालच नसते. एकदा का पहिला धुळीचा कण तिथे चिकटला की, तो त्या जागेला खडबडीत बनवतो. मग त्यावर दुसरे कण सहज चिकटतात आणि हळूहळू धुळीचा एक जाड थर तयार होतो.
गर्दीतही वेगळं दिसायचं, सगळ्यांकडून हवी कौतुकाची थाप, 'या' ६ सवयी बनवतील तुम्हांला सुपर स्मार्ट...
ओलावा (Humidity) हे देखील मोठे कारण आहे...
भारतासारख्या देशांमध्ये जिथे आर्द्रता (Humidity) जास्त असते, तिथे धूळ साचण्याचा वेग अजूनच वाढतो. हवेतील ओलावा धुळीच्या कणांना चिकट बनवतो. जेव्हा हे चिकट कण चार्ज्ड ब्लेड्सना (Charged Blades) धडकतात, तेव्हा ते इतक्या घट्टपणे चिकटतात की पंख्याचा फुल स्पीड देखील त्यांना हलवू शकत नाही. हीच दोन मुख्य कारणे आहेत ज्यामुळे पंख्यावर नेहमी धूळ साचलेली असते.
