Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > नेमकी घाईगडबडीत गाडीची चावीच सापडत नाही, समोर असून दिसत नाही? हा विसरभोळेपणा की मेंदूचा अजब खेळ....

नेमकी घाईगडबडीत गाडीची चावीच सापडत नाही, समोर असून दिसत नाही? हा विसरभोळेपणा की मेंदूचा अजब खेळ....

3 easy tips to find lost keys quickly at home : science behind not finding keys even when visible : ऐनवेळी चावी मिळत नाही, शोधाशोध करताना उडते धांदल, पाहा असं नेमकं का होतं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2026 13:50 IST2026-05-02T13:39:04+5:302026-05-02T13:50:26+5:30

3 easy tips to find lost keys quickly at home : science behind not finding keys even when visible : ऐनवेळी चावी मिळत नाही, शोधाशोध करताना उडते धांदल, पाहा असं नेमकं का होतं ?

3 easy tips to find lost keys quickly at home science behind not finding keys even when visible | नेमकी घाईगडबडीत गाडीची चावीच सापडत नाही, समोर असून दिसत नाही? हा विसरभोळेपणा की मेंदूचा अजब खेळ....

नेमकी घाईगडबडीत गाडीची चावीच सापडत नाही, समोर असून दिसत नाही? हा विसरभोळेपणा की मेंदूचा अजब खेळ....

नेमकी सकाळची घाई - गडबडीची वेळ आणि त्यातच ऑफिसला जाण्याची प्रचंड घाई असते. आपण मोबाईल घेतो, पाकीट खिशात टाकतो, अगदी रुमाल सुद्धा विसरत नाही. पण जसं आपण घराला कुलूप लावण्यासाठी हात पुढे करतो, तसं लक्षात येतं - "अरे बापरे! चावी कुठे आहे?" मग सुरू होतो तो खरा 'की-पॅनिक' (Key Panic). अख्खं घर डोक्यावर घेतलं जातं, सोफ्याखालून ते किचनच्या ओट्यापर्यंत सगळं शोधून होतं आणि शेवटी ती चावी कुठल्यातरी अशा कोपऱ्यात सापडते जिथे आपण ती ठेवल्याचं स्वप्नातही वाटलेलं नसतं. जर तुमच्यासोबतही हे वारंवार घडत असेल आणि आयत्या वेळी काय करावं हे सुचत नसेल, तर विश्वास ठेवा, ही केवळ विसरभोळेपणाची गोष्ट नाही. यामागे तुमच्या डेली रुटीन मधील ३ खास सवयी कारणीभूत आहेत(3 easy tips to find lost keys quickly at home).

या सवयींमुळेच तुमची चावी ऐन वेळी गायब होते आणि तुमचा वेळ वाया जातो. जर तुम्ही सुद्धा रोजच्या या 'की-पॅनिक' (Key Panic) मुळे थकला असाल, तर ही तुमची चूक नसून तुमच्या ३ सवयींची चूक आहे. कोणत्या आहेत (science behind not finding keys even when visible ) त्या ३ सवयी आणि या समस्येतून कायमची सुटका कशी मिळवायची ते पाहूयात... 

घाईच्या वेळी तुमची चावी सुद्धा गायब होते का? मग 'या' ३ सवयी आजच बदला... 

१. कुठेही चावी ठेवण्याची सवय :- आपल्यापैकी बहुतेकांना अशी सवय असते की, बाहेरून घरात आल्यावर आपण हातातली चावी कोणत्याही रिकाम्या जागेवर फेकून देतो. कधी ती डायनिंग टेबलवर असते, कधी फ्रिजच्या वर, तर कधी चक्क वॉशिंग मशीनच्या जवळ. आपल्या मेंदूची प्रोग्रामिंग अशा प्रकारची असते की, जेव्हा आपण ती चावी त्या 'रँडम' जागी ठेवतो, तेव्हा आपले लक्ष इतर कामात असते. त्यामुळे त्या क्षणी आपण त्या जागेकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. पण जेव्हा पुन्हा बाहेर निघण्याची वेळ येते, तेव्हा आपला मेंदू ती 'रँडम' जागा पूर्णपणे विसरलेला असतो. यामुळेच ऐन वेळी चावी शोधताना आपली धावपळ उडते.

एवढा गरागरा फिरतो तरी पंख्याच्या पात्यांवर धूळ कशी काय साचते? पाहा पंख्यावरच्या धुळीचं इंटरेस्टिंग कारण...

२. चावीसाठी एक निश्चित जागा न ठरवणे :- घरात चाव्या ठेवण्यासाठी एखादा 'की-होल्डर' (Key Holder) किंवा कोणतीही एक ठराविक जागा आहे का? नसेल, तर हीच तुमच्या त्रासाचे सर्वात मोठे कारण आहे. जेव्हा एखाद्या वस्तूला एका जागी निश्चित ठेवण्यासाठी तिची अशी स्वतःची नेमून दिलेली जागा नसते तेव्हा ती वस्तू इतरत्र घरात कुठेही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली जाते. त्या वस्तूसाठी घरात नेमून दिलेली एक विषेश अशी जागा नसेल तेव्हा वस्तू घरभर मिळेल त्या जागी कुठेही ठेवल्या जातात. चावीसाठी कोणतीही जागा निश्चित नसल्यामुळे, आपण दरवेळी ती नवीन ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे घाई - गडबडीच्या वेळी आपला मानसिक ताण आणि रक्तदाब दोन्ही विनाकारण वाढतात. यासाठी, घराच्या मुख्य दरवाजाच्या अगदी शेजारी एक की-होल्डर लावा. तो अशा उंचीवर आणि अशा ठिकाणी लावा, जिथून घरात येताना आणि बाहेर पडताना तुमचा हात तिथे सहज पोहोचू शकेल. याचबरोबर, घराबाहेर जाता - येता चावी अगदी डोळ्यासमोरच दिसेल त्यामुळे विसरण्याचा प्रश्नच येणार नाही. 

लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना लक्षात ठेवा १० टिप्स! वयात येणाऱ्या मुलीसाठी आवश्यक काळजी...

३. ऐन वेळी केलेली घाई :- चावी न सापडण्यामागील हे सर्वात मोठे कारण आहे. जेव्हा आपण आधीच १० मिनिटे लेट असतो, तेव्हा आपला मेंदू घाईघाईत नीट काम करणे थांबवतो. या घाबरलेल्या अवस्थेत आपल्या समोर असलेली गोष्टही आपल्याला दिसत नाही. विज्ञानानुसार, जेव्हा आपण तणावाखाली असतो, तेव्हा आपली 'व्हिज्युअल सर्च' (Visual Search) म्हणजेच शोध घेण्याची क्षमता कमी होते. म्हणजेच चावी समोर टेबलवरच पडलेली असते, पण 'उशीर' होण्याच्या भीतीमुळे आपला मेंदू ती ओळखूच शकत नाही. दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपली बॅग आणि चाव्या तपासून ठेवण्याची सवय लावा. रात्री केलेली फक्त २ मिनिटांची पूर्वतयारी तुमचे दिवसातले महत्त्वाचे २० मिनिटे वाचवू शकते.

Web Title : चाबियाँ खो जाती हैं? केवल भूलना नहीं, इन आदतों को दोष दें।

Web Summary : क्या आपको अपनी चाबियाँ नहीं मिलती हैं? यह संभवतः बेतरतीब ढंग से रखने, कोई निश्चित स्थान न होने और जल्दबाजी के कारण है। सुबह के आतंक और समय की बर्बादी से बचने के लिए दरवाजे के पास एक की होल्डर नामित करें और पहले से रात में तैयारी करें।

Web Title : Lost keys often? Blame these habits, not just forgetfulness.

Web Summary : Can't find your keys? It's likely due to haphazard placement, lack of a designated spot, and rushing. Designate a key holder near the door and prepare the night before to avoid morning panic and wasted time.