>सोशल वायरल > Viral Video : बाबौ! लग्न झाल्या झाल्या पठ्ठ्या बायकोच्या पाया पडायला गेला; मग घडलं असं काही, पाहा व्हिडीओ

Viral Video : बाबौ! लग्न झाल्या झाल्या पठ्ठ्या बायकोच्या पाया पडायला गेला; मग घडलं असं काही, पाहा व्हिडीओ

Viral Video : लग्नानंतर गृहप्रवेशाच्यावेळी माप ओलांडणं, नवरा नवरीनं एकमेकांच्या अंगावर गुळण्या फेकणं असे जोडप्यांचे  गमतीदार व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर  तुफान व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 07:09 PM2021-09-15T19:09:35+5:302021-09-15T19:33:08+5:30

Viral Video : लग्नानंतर गृहप्रवेशाच्यावेळी माप ओलांडणं, नवरा नवरीनं एकमेकांच्या अंगावर गुळण्या फेकणं असे जोडप्यांचे  गमतीदार व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर  तुफान व्हायरल होत आहे.

Viral Video : Groom takes brides ashirwaad after wedding watch viral video | Viral Video : बाबौ! लग्न झाल्या झाल्या पठ्ठ्या बायकोच्या पाया पडायला गेला; मग घडलं असं काही, पाहा व्हिडीओ

Viral Video : बाबौ! लग्न झाल्या झाल्या पठ्ठ्या बायकोच्या पाया पडायला गेला; मग घडलं असं काही, पाहा व्हिडीओ

Next

सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओंमधून आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणच्या, विविध धर्मातील लोकांच्या छान परंपरा पाहायला मिळतात. लग्नानंतर गृहप्रवेशाच्यावेळी माप ओलांडणं, नवरा नवरीनं एकमेकांच्या अंगावर गुळण्या फेकणं  असे जोडप्यांचे  गमतीदार व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर  तुफान व्हायरल होत आहे.

आतापर्यंत पत्नी पतीचे आशीर्वाद घेण्यासाठी पाया पडते हे तुम्ही पाहिलं असेल. पण व्हायरल झालेल्या या व्हिडीओ पतीच पत्नीचे पाय पडण्यासाठी खाली वाकत आहे.  Mr_robin_hudd नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, आपण पाहू शकता की वधू आणि वर मंदिरात उभे आहेत आणि दोघांनीही हार घातलेले आहेत. कमाल! फक्त १७ महिन्यात 'ती' नं ३ कोटीचं कर्ज फेडलं; महिलेची 'पैसे वाचवण्याची सुपर टेक्निक'

प्रथम वधू पाया पडते आणि वराच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेते. त्यानंतर वरही नतमस्तक होतो आणि वधूच्या पायाला स्पर्श करू लागतो, पण नंतर वधू परत हसून उडी मारते. व्हिडिओमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. लाल रंगाच्या कपड्यात दोघंहीजण खूप सुंदर दिसत आहेत. 'माणिके मॅगे हिते' गाण्यामुळे तुफान व्हायरल झाली तरूणी; वाचा कोण आहे एयर होस्टेस आफरीन

सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.  लोक म्हणतात की वराने आमची मने जिंकली आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आतापर्यंत 35 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोक व्हिडिओवर अनेक कमेंट्स करत आहेत, तसेच वराचे जोरजार कौतुकही करत आहेत. 

Web Title: Viral Video : Groom takes brides ashirwaad after wedding watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.