Lokmat Sakhi >Social Viral > Elderly woman goes viral : 'मला भीक नको, पण १० रूपयांचं पेन तरी विकत घ्या'; व्हायरल होतोय पुण्याच्या मराठमोळ्या आजींचा फोटो

Elderly woman goes viral : 'मला भीक नको, पण १० रूपयांचं पेन तरी विकत घ्या'; व्हायरल होतोय पुण्याच्या मराठमोळ्या आजींचा फोटो

Pune elderly woman goes viral : या मराठमोळ्या आजींच्या व्हिडीओनं  नेटकऱ्याचं मन जिंकलं आहे. रोज तुम्ही अनेक वयोवृद्ध, निराधार लोकांना भीक मागताना पाहात असाल. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 11:06 AM2021-10-18T11:06:53+5:302021-10-18T11:20:24+5:30

Pune elderly woman goes viral : या मराठमोळ्या आजींच्या व्हिडीओनं  नेटकऱ्याचं मन जिंकलं आहे. रोज तुम्ही अनेक वयोवृद्ध, निराधार लोकांना भीक मागताना पाहात असाल. 

Pune elderly woman goes viral : A salute to this elderly woman she does not beg sells pens and feeds herself | Elderly woman goes viral : 'मला भीक नको, पण १० रूपयांचं पेन तरी विकत घ्या'; व्हायरल होतोय पुण्याच्या मराठमोळ्या आजींचा फोटो

Elderly woman goes viral : 'मला भीक नको, पण १० रूपयांचं पेन तरी विकत घ्या'; व्हायरल होतोय पुण्याच्या मराठमोळ्या आजींचा फोटो

सोशल मीडिया अनेक लोकांच्या जीवनात आशेचा किरण ठरला आहे. सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट व्यतिरिक्त, अशा अनेक गोष्टी वाचल्या जाऊ शकतात, ज्या उत्कृष्ट आणि हृदयस्पर्शी आहेत. अलीकडेच एका कष्टाळू आजींची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मराठमोळ्या आजींच्या फोटोनं (Viral Photo)  नेटकऱ्याचं मन जिंकलं आहे. रोज तुम्ही अनेक वयोवृद्ध, निराधार लोकांना भीक मागताना पाहात असाल. (elderly woman selling pens on pune street goes viral)

या आजीसुद्धा पैसे मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. पण त्यासाठी कष्ट न करता लोकांकडून भीक घेणं त्यांना मान्य नाही. कोरोना काळात अनेकांची नोकरी गेली. तर कोणाला नुकसानाचा सामना करावा लागला, कोणी अजूनही चांगल्या नोकरीसाठी प्रयत्नात आहे. अशा स्थितीत या आजींची जिद्द सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरलीआहे. 

व्हायरल झालेल्या या आजी पुण्याच्या रहिवासी आहेत. त्यांचं  नाव रतन असून या आजी पुण्याच्या एमजी रोडवर पेन विकतात. ही पोस्ट राज्यसभा खासदार विजयसाई रेड्डी व्ही यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. यासह त्याने एक माहितीही शेअर केली आहे. माहितीमध्ये तिने लिहिले आहे- 'मला भीक मागायची नाही. कृपया 10 रुपयांना निळे पेन खरेदी करा. धन्यवाद, आशीर्वाद. '

तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता या आजींच्या हातात पेनांचा एक बॉक्स आहे त्यावर एक फलकसुद्धा आहेत. त्यात त्यांनी मला भीक मागायची नाही. पण १० रूपयांचे पेन तरी विकत घ्या असं म्हटलं आहे. आजींना आपले आयुष्य आदर आणि सचोटीने जगायचे आहे. त्यांच्या हातात वेगवेगळ्या रंगाच्या पेनांची  टोपली दिसली तर त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून अनेकांना त्यांच्या प्रयत्नांची दाद द्यावीशी वाटली. 

या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया दिसत आहेत. ट्विटला उत्तर देताना एका वापरकर्त्याने लिहिले की, 'पाहून खरोखर छान वाटले, ती महिला तिच्या स्वाभिमानाशी तडजोड करत नाही'.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टमुळे या आजींना नक्कीच फायदा व्हायला हवा, असं सोशल मीडियावर युजर्सचं म्हणणं आहे. याआधीही 'बाबा का ढाबा'चे चालक जोडपं प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत होतं. सोशल मीडयावर व्हायरल झाल्यानंतर मदतीचे हात समोर आले आणि ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. 
 

Web Title: Pune elderly woman goes viral : A salute to this elderly woman she does not beg sells pens and feeds herself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.