Lokmat Sakhi >Social Viral > North Indian dosa is better : ट्विटरवर एकजण म्हणाली नॉर्थ इंडियन डोसाच भारी; हे पाहताच नेटीझन्सची सटकली, पाहा पुढे काय झालं...

North Indian dosa is better : ट्विटरवर एकजण म्हणाली नॉर्थ इंडियन डोसाच भारी; हे पाहताच नेटीझन्सची सटकली, पाहा पुढे काय झालं...

North Indian dosa is better Social Viral : डोश्याबाबत एक वादग्रस्त पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 12:17 PM2021-10-08T12:17:48+5:302021-10-08T12:23:42+5:30

North Indian dosa is better Social Viral : डोश्याबाबत एक वादग्रस्त पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. 

North Indian dosa is better Social Viral : North indian dosa is better says twitter user internet debates over viral post | North Indian dosa is better : ट्विटरवर एकजण म्हणाली नॉर्थ इंडियन डोसाच भारी; हे पाहताच नेटीझन्सची सटकली, पाहा पुढे काय झालं...

North Indian dosa is better : ट्विटरवर एकजण म्हणाली नॉर्थ इंडियन डोसाच भारी; हे पाहताच नेटीझन्सची सटकली, पाहा पुढे काय झालं...

डोसा हा आपल्या सगळ्यांचाच आवडता पदार्थ आहे. पोहे, उपमा, चहा चपाती खाऊन कंटाळा आला की नाश्त्याला डोसा खावासा वाटतो. हलका फुलका डोसा आपण कोणत्याही वेळेला चटणी किंवा सांबारसोबत खाऊन  मूड फ्रेश करू शकतो.  जरी  जगभरात सर्वत्र डोसा मिळत असला तरी डोसा, इडली हे पदार्थ दक्षिण भारताची खासियत हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. बहुतेक डोसा विक्रेतेसुद्धा दक्षिण भारतीय तुम्ही  पाहिले असतील. डोश्याबाबत एक वादग्रस्त पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. 

'उत्तर भारतीय डोसा अधिक चांगला आहे', (North Indian dosa is better)'' अशी पोस्ट एका मुलीनं ट्विट केली  आणि हे ट्विट खूप कमीत तुफान व्हायरल झालं.  खुशी नावाच्या मुलीनं डोश्याबद्दल लिहिलेली पोस्ट नेटिझन्सना खटकली. या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होतोय.

हे वाचून एक युजरनं टिका करत म्हटलंय, 'दीदी आपको पॅरासिटामॉल लेना है क्या, अजीब बाते कर रहे हो.' तर काहीजणांनी हा डोसा वाईट असल्याचं म्हटलंय  अजून एका युजरनं कमेंट केली आहे की, "उत्तर भारतीय डोसा - हो हो तुम्हालाही माहीत असेल की चेन्नईची पाव भाजी पण सर्वोत्तम आहे."

उडीद आणि तांदळाच्या आंबलेल्या पिठात बनवलेला डोसा एक पातळ पॅनकेकसारखा पदार्थ आहे जो दक्षिण भारतातून आला आहे. कसलाही विचार न करता खुशीने ठामपणे सांगितले की उत्तर-भारतीय डोसा अधिक चांगला आहे आणि आता ट्विटरवर चांगलंच युद्ध रंगलंय. ३०० पेक्षा जास्त लोकांनी या पोस्टला लाईक केलं असून ५६ रिट्विट्स आले आहेत. 
 

Web Title: North Indian dosa is better Social Viral : North indian dosa is better says twitter user internet debates over viral post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.