घराच्या कोणत्याही कोपऱ्यात पाली दिसल्या की किळस वाटते आणि लहान मुलं पाली पाहून खूपच घाबरतात. पाली घरात आल्यामुळे घरसुद्धा अस्वच्छ होतं. घरात पाली असतील याचा अर्थ असा की घरात किटकसुद्धा आहेत. कारण कीटक खाऊनच पाली जगतात. (Home Remedy To Remove Lizards From House)
पाली पळवण्यासाठी कोणतेही केमिकलयुक्त स्प्रे न वापरता तुम्ही काही घरगुती पदार्थांचा वापर करू शकता. (Lizards Solution For Home) घरातील २ ते ३ पदार्थ मिसळून याचा स्प्रे तयार करून पाली ज्या ठिकाणी जास्त दिसतात तिथे शिंपडला तर पालींपासून सुटका मिळवण्यास मदत होईल आणि पाली न मरता घरातून बाहेर पळतील. (How To Get Rid Of Lizards)
पालींना घालवण्यासाठी घरगुती उपाय
पालींना पळवण्यासाठी तुम्ही कापूर, डेटॉल आणि पाणी हे साहित्य वापरू शकता. हे तिन्ही पदार्थ घरात सहज मिळतात. याचा परिणाम इतका तीव्र असतो की पाली पुन्हा घरात येत नाहीत.
पहिला स्प्रे कापूर आणि डेटॉल
३ ते ४ कापराच्या गोळ्या, १ झाकण डेटॉल, ३ ते ४ झाकण पाणी, आणि स्प्रे बॉटल हे साहित्य तुम्हाला लागेल. जुनं कापड आणि पेस्ट तयार करण्यासाठी कोणतंही चांगलं भांडं घ्या.
स्प्रे तयार करण्याची योग्य पद्धत
सगळ्यात आधी कोणत्याही कापडात कापराच्या गोळ्या घालून व्यवस्थित कुटून घ्या आणि पावडर तयार करा. एका वाटीत ही पावडर ठेवा आणि त्यात १ झाकण डेटॉल मिसळा. नंतर यात ३ ते ४ झाकण पाणी घाला आणि पूर्ण मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. हे मिश्रण स्प्रे बाटलीमध्ये भरा.
ज्या ठिकाणी पाली जास्त येतात अशा ठिकाणी हे द्रावण शिंपडा. जसं की पडद्यांच्यामगे, खिडकीच्या कॉर्नरला, कपाटाजवळ, दरवाजे आणि फरशीच्या कोपऱ्यांवर. हा वास पसरल्यानंतर पाली दूर पळतील. आठवड्यातून कमीत कमी २ ते ३ वेळा हा स्प्रे मारा. काही दिवसांनी तुम्हाला फरक जाणवेल.
लाल मिरची, कांदा आणि कापूर यांचा स्प्रे
लाल मिरची, कांदा आणि कापूराचं मिश्रण हा सुद्धा पालींना पळवण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. १ ग्लास पाण्यात कांदा, लाल मिरची पावडर आणि कापूर घाला. हे पाणी व्यवस्थित उकळवून घ्या जेणेकरून त्यातील सर्व तत्व पाण्यात मिसळतील. नंतर थंड करून, गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरा.
हे मिश्रण पाली ज्या ठिकाणी येतात तिथे स्प्रे करा. या स्प्रेच्या तिखट वासानं पाली दूर होण्यास मदत होईल आणि पाली पुन्हा घरात शिरणार नाहीत. लहान मुलं, पाळीव प्राणी यांपासून हा स्प्रे दूर ठेवा. तोंडाला कापड नक्की बांधा. खासकरून तुम्हाला श्वासांशी संबंधित समसया असतील तर त्वचा आणि डोळ्यांपासून हा स्प्रे दूर ठेवा. या स्प्रे च्या वापरानंतर हात स्वच्छ धुवा.
