Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Shopping > पुरुषांना वाढदिवसाला काय गिफ्ट द्यावं, असा प्रश्न पडतो? पाहा ‘स्पेशल’ गिफ्ट्सचे पर्याय

पुरुषांना वाढदिवसाला काय गिफ्ट द्यावं, असा प्रश्न पडतो? पाहा ‘स्पेशल’ गिफ्ट्सचे पर्याय

Wondering what to gift men ? Check out these 'special' gift options, ideas for creative girts : पुरुषांना काय भेटवस्तू द्यायची असा प्रश्न पडतो ? पाहा पर्याय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2026 16:50 IST2026-04-17T16:49:45+5:302026-04-17T16:50:48+5:30

Wondering what to gift men ? Check out these 'special' gift options, ideas for creative girts : पुरुषांना काय भेटवस्तू द्यायची असा प्रश्न पडतो ? पाहा पर्याय.

Wondering what to gift men ? Check out these 'special' gift options, ideas for creative girts | पुरुषांना वाढदिवसाला काय गिफ्ट द्यावं, असा प्रश्न पडतो? पाहा ‘स्पेशल’ गिफ्ट्सचे पर्याय

पुरुषांना वाढदिवसाला काय गिफ्ट द्यावं, असा प्रश्न पडतो? पाहा ‘स्पेशल’ गिफ्ट्सचे पर्याय

महिलांसाठी गिफ्ट निवडणं तसं सोपं असतं, मात्र पुरुषांसाठी गिफ्ट काय घ्यावं हा प्रश्न पडतो. पण खरं पाहिलं तर पुरुषांना तात्पुरत्या वस्तूंपेक्षा उपयोगी, टिकाऊ आणि त्यांच्या स्टाइलला सूट होणाऱ्या गोष्टी अधिक आवडतात. (Wondering what to gift men ? Check out these 'special' gift options, ideas for creative girts )त्यामुळे गिफ्ट निवडताना त्यांच्या आवडी-निवडी, जीवनशैली आणि रोजच्या वापरातील गरजा लक्षात घेतल्या तर योग्य पर्याय सहज सापडतो.

वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस (anniversary), व्हॅलेंटाईन डे किंवा इतर खास प्रसंगी महिलांनी पुरुषांना घड्याळ देणं हा एक अत्यंत क्लासिक पर्याय मानला जातो. एक चांगलं वॉच त्यांच्या व्यक्तिमत्वात वेगळाच उठाव आणतं. त्याचप्रमाणे  वॉलेट हा देखील रोज वापरात येणारा आणि नेहमी लक्षात राहणारा ठरतो. परफ्यूम किंवा फ्रॅग्रन्स सेटही तितकाच लोकप्रिय आहे, कारण चांगला सुगंध आत्मविश्वास वाढवतो आणि व्यक्तिमत्त्वाला आकर्षक बनवतो.

जर गिफ्ट थोडं खास आणि वैयक्तिक बनवायचं असेल, तर नाव कोरलेले किंवा पर्सनलाइज्ड गिफ्ट उत्तम पर्याय ठरतात. नाव असलेलं वॉलेट, कीचेन किंवा फोटो असलेली फ्रेम यामुळे गिफ्टला एक वेगळीच भावनिक किंमत मिळते. अशाच प्रकारे, तुमच्या दोघांच्या आठवणी जपणारा फोटो फ्रेम किंवा छोटासा मेमरी बॉक्स हेही मनाला स्पर्श करणारे गिफ्ट ठरते.

आजकाल पुरुषांमध्ये स्वतःच्या ग्रूमिंगकडेही लक्ष देण्याची सवय वाढली आहे. त्यामुळे ग्रूमिंग किट, शेविंग सेट किंवा स्किनकेअर प्रॉडक्ट्स देणं हा देखील एक ट्रेंडिंग आणि उपयोगी पर्याय आहे. कपड्यांमध्ये शर्ट, टी-शर्ट किंवा जॅकेट यांसारख्या वस्तू त्यांच्या स्टाइलनुसार निवडल्यास ते नक्कीच आवडेल.

टेक्नॉलॉजी आवडणाऱ्या पुरुषांसाठी गॅझेट्स हा उत्तम पर्याय आहे. इयरफोन्स, स्मार्ट अॅक्सेसरीज किंवा इतर छोटे टेक गिफ्ट्स त्यांच्या रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतात. तसेच, त्यांच्या छंदानुसार गिफ्ट देणं हा सर्वात प्रभावी मार्ग ठरतो. जर त्यांना वाचन आवडत असेल तर पुस्तक, प्रवासाची आवड असेल तर ट्रॅव्हल अॅक्सेसरीज, किंवा खेळांची आवड असेल तर संबंधित वस्तू देणं त्यांना अधिक आनंद देतं.

सध्या गिफ्ट हॅम्परचीही खूप चलती आहे. एका बॉक्समध्ये वॉलेट, वॉच, बेल्ट, परफ्यूम अशा अनेक गोष्टी एकत्र दिल्यास गिफ्ट अधिक आकर्षक आणि पूर्ण वाटतं. हे गिफ्ट दिसायलाही स्टायलिश असतं आणि उपयोगीही ठरतं.
 

Web Title : पुरुषों के लिए उपहार विचार: उनके लिए सही तोहफा खोजें।

Web Summary : पुरुषों के लिए उपहार ढूँढना मुश्किल है? उनकी शैली से मेल खाने वाली टिकाऊ वस्तुएँ चुनें। घड़ियाँ, वॉलेट और परफ्यूम क्लासिक विकल्प हैं। उत्कीर्ण वस्तुओं जैसे व्यक्तिगत उपहार एक भावनात्मक स्पर्श प्रदान करते हैं। ग्रूमिंग किट, गैजेट्स और शौक से संबंधित उपहार भी बढ़िया विकल्प हैं। गिफ्ट हैंपर एक स्टाइलिश समाधान है।

Web Title : Gift ideas for men: Find the perfect present for him.

Web Summary : Struggling to find gifts for men? Consider practical, durable items matching their style. Watches, wallets, and fragrances are classic choices. Personalized gifts like engraved items offer a sentimental touch. Grooming kits, gadgets, and hobby-related presents are also great options. Gift hampers provide a stylish and complete gifting solution.