Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Shopping > Adhik Maas 2026: विराट कोहलीच्या हातातली जप अंगठी पाहिली, ५० रुपयांची आंगठी लाख मोलाची - पाहा कुठे मिळते...

Adhik Maas 2026: विराट कोहलीच्या हातातली जप अंगठी पाहिली, ५० रुपयांची आंगठी लाख मोलाची - पाहा कुठे मिळते...

Adhik Maas 2026: अधिक मासात नामजप करण्यासाठी हे बेस्ट गॅझेट सोयीचे ठरेल.किंमतही कमी.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 18:35 IST2026-05-16T16:34:30+5:302026-05-16T18:35:50+5:30

Adhik Maas 2026: अधिक मासात नामजप करण्यासाठी हे बेस्ट गॅझेट सोयीचे ठरेल.किंमतही कमी.

Adhik Maas 2026: Saw the Jap ring on Virat Kohli's hand, the ring worth Rs 50 is worth lakhs - see where it is available... | Adhik Maas 2026: विराट कोहलीच्या हातातली जप अंगठी पाहिली, ५० रुपयांची आंगठी लाख मोलाची - पाहा कुठे मिळते...

Adhik Maas 2026: विराट कोहलीच्या हातातली जप अंगठी पाहिली, ५० रुपयांची आंगठी लाख मोलाची - पाहा कुठे मिळते...

१७ मे पासून अधिक ज्येष्ठ मास(Adhik Maas 2026) सुरू होत आहे. या काळात जास्तीत जास्त नामस्मरण आणि मंत्र जप करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. पण धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये आपण किती वेळा जप केला, याची मोजदाद ठेवणे कठीण होते. यासाठीच शॉपिंग विश्वात सध्या एका छोट्या गॅझेटची प्रचंड क्रेझ आहे, ते म्हणजे Digital Jap Counter Machine (Finger Tally Counter Ring).

हे गॅझेट केवळ उपयुक्तच नाही, तर सध्या चांगलेच ट्रेंडिंग आहे. स्टार क्रिकेटपटू विराट कोहली, त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या बोटातही तुम्ही ही रिंग अनेकदा अडकवलेली पाहिली असेल. इतकेच नाही तर प्रख्यात विचारवंत प्रेमानंद महाराज देखील आपल्या भक्तांना या मशीनचा वापर करून सातत्याने नामजप करण्याचा सल्ला देतात.

या डिजिटल जप काउंटरचे फिचर्स आणि फायदे:

वापरण्यास अत्यंत सोपे: या मशीनवर प्रामुख्याने दोन बटणे असतात. एका मोठ्या बटणाचा वापर करून जप काउंट (मोजणी) केला जातो. तर शेजारी असलेल्या छोट्या बटणाने स्क्रीनवरील नंबर 'रिसेट' (पुन्हा शून्यावरून सुरू) करता येतात.

फिंगर रिंग डिझाईन: ही एक टॅली काउंटर रिंग आहे, जी बोटात सहज फिट होते. तुम्ही ऑफिसमध्ये काम करताना, प्रवास करताना किंवा चालतानाही कोणालाही न कळता याद्वारे तुमचा जप मोजू शकता.

बजेट-फ्रेंडली किंमत: हे डिजिटल यंत्र तुमच्या खिशाला अजिबात जड नाही. स्थानिक बाजारपेठेत किंवा ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर हे यंत्र अवघ्या ५० ते ६० रुपयांना सहज उपलब्ध होते.

सेलवर चालणारे यंत्र: हे मशीन छोट्या बॅटरी (सेल) वर चालते. त्यामुळे याला वारंवार चार्ज करण्याची अजिबात कटकट नसते आणि ते दीर्घकाळ टिकते.

अधिक मासासाठी का आहे परफेक्ट खरेदी?

आपल्याकडे म्हणतात, 'अधिकस्य अधिकं फलम्' म्हणजेच अधिक महिन्यात जेवढे जास्त नाम घ्याल तेवढे कमीच आहे. अशा वेळी दिवसभरात आपल्याकडून किती नामस्मरण झाले, याचे अचूक रेकॉर्ड ठेवण्यासाठी हे गॅझेट खूप मदत करते. जर तुम्ही या अधिक महिन्यात कोणाला अध्यात्मिक आणि उपयुक्त वस्तू भेट देण्याचा विचार करत असाल, तर हा एक सर्वोत्तम आणि बजेट पर्याय आहे.

Web Title : डिजिटल जप काउंटर रिंग: विराट कोहली का किफायती आध्यात्मिक गैजेट?

Web Summary : विराट कोहली की पसंदीदा डिजिटल जप काउंटर रिंग अधिक मास में आसान मंत्र जाप के लिए लोकप्रिय हो रही है। बजट के अनुकूल और कहीं भी जाप को ट्रैक करने के लिए सुविधाजनक, यह उपहार के लिए आदर्श है।

Web Title : Digital Jap Counter Ring: Virat Kohli's Affordable Spiritual Gadget?

Web Summary : Digital Jap Counter Ring, favored by Virat Kohli, gains popularity for easy mantra chanting during Adhik Maas. Budget-friendly and convenient for tracking repetitions anywhere, it's ideal for gifting.