Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Parenting > मुलांच्या कानातला मळ पटकन कसा काढावा? डॉक्टर सांगतात सोपी पद्धत, लगेच मळ निघेल

मुलांच्या कानातला मळ पटकन कसा काढावा? डॉक्टर सांगतात सोपी पद्धत, लगेच मळ निघेल

How To Remove Ear Wax From Kids Ear : लहान मुलांचे कान खूपच नाजूक असतात म्हणून कान स्वच्छ करताना सावधगिरी बाळगायला हवी.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:03 IST2025-11-02T23:06:29+5:302025-11-03T13:03:49+5:30

How To Remove Ear Wax From Kids Ear : लहान मुलांचे कान खूपच नाजूक असतात म्हणून कान स्वच्छ करताना सावधगिरी बाळगायला हवी.

How To Remove Ear Wax From Kids Ear Advice By Doctors | मुलांच्या कानातला मळ पटकन कसा काढावा? डॉक्टर सांगतात सोपी पद्धत, लगेच मळ निघेल

मुलांच्या कानातला मळ पटकन कसा काढावा? डॉक्टर सांगतात सोपी पद्धत, लगेच मळ निघेल

मुलांच्या कानांची काळजी  घेण्यासाठी त्यांचे कान वेळोवेळी स्वच्छ करणंही महत्वाचं  असतं. लहान मुलांच्या कानात मळ दिसत असेल तर तो साफ करावा लागतो. पण या कामात घाई गडबड केल्यामुळे कानांवर चुकीचा परिणाम होतो.  लहान मुलांचे कान खूपच नाजूक असतात म्हणून कान स्वच्छ करताना सावधगिरी बाळगायला हवी. कान हा संवेदनशील अवयव आहे. कानांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या समस्या उद्भवू शकतात. कानातला मळ काढण्यासाठी काही खास ट्रिक्स वापरल्यास तुमचं काम सोपं होईल. (How To Remove Ear Wax From Kids Ear)

कानात मळ का तयार होतो?

कानात तयार होणारा मळ म्हणजेच इयर वॅक्स शरीरातील एक नॅच्युरल प्रक्रिया आहे. इअर वॅक्समुळे कानांना धूळ, माती आणि किटाणूंपासून बचाव करण्यास मदत होते. पण जेव्हा जास्त मळ कानात जमा होतो तेव्हा त्रास होतो. लहान मुलांना कानात खाज येणं, वेदना, ऐकायला कमी येणं अशा समस्या उद्भवतात. 

या गोष्टींची काळजी घ्या

लहान मुलांचे कान साफ करताना इयर बड्स, बोट, पिंन्स, कापूस असे पदार्थ कानात घालू नयेत. असं केल्यानं वॅक्स आतमध्ये ढकललं जाऊ शकतं. ज्यामुळे कानांचा पडदा खराब होऊ शकतो. याव्यतिरिक्त कानांमध्ये इन्फेक्शन होण्याचाही धोका असतो ज्यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परीणाम होतो आणि मुलांना लहान वयातच कमी ऐकू येऊ लागतं.


कानांचा मळ कसा स्वच्छ करायचा?

 कानात जास्तच मळ साचला आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हा मळ साफ करण्यासाठी तुम्ही सोपा उपाय करू शकता. एक छोटा, स्वच्छ कपडा घ्या.  कोमट पाण्यात भिजवून  हलका पिळून घ्या. कापडानं मुलांच्या कानातील बाहेरचा भाग हळूहळू स्वच्छ करा. ज्यामुळे मळ सैल होईल आणि आपोआप बाहेर निघेल. 

कानात वेदना, खाज, सूज, ऐकायला त्रास होणं अशा समस्या असतील तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. कधी कधी मळ जास्त जमा झाल्यामुळे टुल्स किंवा इयर ड्रॉप्सची आवश्यकता असते.  पीडियाट्रिशियन सांगतात  की लहान मुलांचे कान स्वच्छ करताना सावधगिरी बाळगायला हवी.  कानात कोणतीही वस्तू घालू नये. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title : बच्चों के कान से मैल कैसे निकालें? डॉक्टर का आसान तरीका।

Web Summary : बच्चों के कान को गीले कपड़े से धीरे से साफ करें। रूई या अन्य वस्तुओं से बचें, जो कान के पर्दे को नुकसान पहुंचा सकती हैं और संक्रमण का कारण बन सकती हैं। दर्द, खुजली या सुनने की समस्या होने पर डॉक्टर से सलाह लें।

Web Title : How to quickly remove earwax from children? Doctor's easy method.

Web Summary : Clean children's ears gently with a damp cloth. Avoid cotton swabs or other objects, which can damage the eardrum and cause infection. Consult a doctor for pain, itching, or hearing problems.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.